Get it on Google Play
Download on the App Store

गरूड पक्षी व बाण

एक गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससा टेहळीत असता, एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला. तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला. मरता मरता शरीरात घुसलेल्या बाणाकडे त्याने पाहिले तो त्या बाणांचा पिसारा गरुडाची पिसे लावून केला होता असे त्याला दिसले. तेव्हा तो म्हणाला, 'माझ्या पंखातल्या पिसाने ज्याचा पिसारा सज्ज झाला, अशा बाणाने मी मरावं, याचंच मला जास्त वाईट वाटतं.'

तात्पर्य

- आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने निर्माण झालेले पाहून, त्याबद्दल जास्त दुःख होते.

इसापनीती कथा १५१ ते २००

इसाप
Chapters
लांडगा, कोल्हा व वानर लांडगा आणि घोडा लांडगा आणि बकरा कुत्रा आणि घंटा कोळी व मासा कोळी व रेशमाचा किडा कोल्हा व मुखवटा कोल्हा आणि लांडगा कोल्हा कावळा आणि सुरई हरिणी व तिचे पाडस हंस व बगळे घार व कबुतरे गरूड पक्षी व बाण चित्ता आणि कोल्हा स्वार आणि त्याचा घोडा खूप मित्र असलेला ससा कुत्रा व सुसर पारवा व कावळा वानर आणि कोल्हा घोडा आणि गाढव कोकीळ, पोपट व घार लांडगा आणि करडू मांजर व वटवाघूळ वानर आणि सुतार वाघ आणि चिचुंद्री सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा सापाचे शेपूट वेडावणारा पक्षी म्हातारा सिंह मेंढी व धनगर मत्सरी काजवा माणूस आणि दगड मांजर आणि चिमण्या माकड आणि मधमाशी कोल्हा आणि म्हातारी कोल्हा, लांडगा व घोडा करढोक आणि मासे हरिण आणि द्राक्षाचा वेल घुबडे, वटवाघुळे आणि सूर्य घार आणि शेतकरी दोन घोरपडी बोकड आणि काटेझाड बेडकी आणि तिचे पोर टोळ आणि मुंग्या सोन्याची अंडी देणारी हंसी सिंह, अस्वल, माकड व कोल्हा सिंहाची गुणज्ञता