Get it on Google Play
Download on the App Store

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 14

आश्वलायन म्हणाला "कोणत्याहि वर्णाचा मनुष्य या पापाकर्मांपासून निवृत्त झाला असतां स्वर्गाला जाईल. पुण्याचरणाचें फल ब्राह्मणाला आणि ब्राह्मणेतराला सारखेंच मिळणार आहे."

बुद्ध म्हणाला "या प्रदेशांत ब्राह्मणच काय तो द्वेषवैरविरहित मैत्रीभावना करूं शकतो; क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे करूं शकणार नाहींत, असें तुला वाटतें काय?"

आश्वलायन म्हणाला "चारहि वर्णाला मैत्रीभावना करतां येणें शक्य आहे."

बुद्ध म्हणाला "तर मग ब्राह्मणच श्रेष्ठवर्ण आणि इतर वर्ण हीन आहेत, या म्हणण्याला आधार काय?"

आश्वलायन म्हणाला "आपण कांहीं म्हणा. पण ब्राह्मण आपणाला श्रेष्ठ समजतात व इतरांनां हीन समजतात, ही गोष्ट खरी आहे."

बुद्ध म्हणाला "हे आश्वलायन, एकादा मूर्धाभिषिक्त राजा सर्व जातींच्या शंभर पुरुषांनां एकत्र करील. त्यांपैकीं क्षत्रिय, ब्राह्मण आणि राजकुलांत जन्मले असतील, त्यांनां तो असें म्हणेल, कीं, 'अहो, इकडे या, व शाल किंवा चंदनवृक्षांसारख्या उत्तम वृक्षांची उत्तरारणी घेऊन अग्नि उत्पन्न करा.' परंतु त्यांपैकीं चांडाळ, नैषाद इत्यादि हीन कुलांमध्यें जन्मले असतील, त्यांनां तो असें म्हणेल, कीं, 'अहो, इकडे या, व कुत्र्याला खावयाला घालण्याच्या डोणींत, डुकराला खावयाला घालण्याच्या डोणींत, किंवा रंग देण्याच्या डोणींत एरंडाची उत्तरारणी घेऊन अग्नि उत्पन्न करा.' हे आश्वलायन, जो ब्राह्मणादिक उच्च वर्णाच्या मनुष्यानें अग्नि उत्पन्न केला, तोच भास्वर आणि तेजस्वी होईल, आणि चांडालादिक हीन वर्णांच्या मनुष्यानें उत्पन्न केलेला अग्नि होणार नाहीं, व त्यापासून अग्नीचीं कार्ये होणार नाहींत, असें तुला वाटतें काय?"

आश्वलायन म्हणाला "भो गौतम, कोणत्याहि जातीच्या माणसांनीं वाईट किंवा बर्‍या लांकडाची उत्तरारणी करून कोणत्याहि ठिकाणीं अग्नि उत्पन्न केला, तरी तो सारखाच तेजस्वी होईल; व त्यापासून सारखींच अग्निकार्ये घडतील."

बुद्ध म्हणाला "एकाद्या क्षत्रिय कुमारानें ब्राह्मणकन्येबरोबर शरीरसंबंध केला व त्या संबंधापासून जर त्याला पुत्र झाला, तर तो पुत्र आईसारखा आणि बापासारखा मनुष्य होईल, असें तुला वाटत नाहीं काय? त्याचप्रमाणें एकाद्या ब्राह्मणकुमारानें क्षत्रियकन्येशीं शरीरसंबंध केला, तर त्या संबंधापासून होणारा पुत्र त्या दोघांसारखा न होतां भलत्याच जातीचा होईल असें तुला वाटतें काय?"

आश्वलायन म्हणाला "अशा मिश्रविवाहानें जो मुलगा होईल, तो त्याच्या आईबापांप्रमाणें मनुष्यच होईल. त्याला ब्राह्मण म्हणतां येईल किंवा क्षत्रियहि म्हणतां येईल."

बुद्ध म्हणाला "पण आश्वलायन, एकाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधापासून जें शिंगरूं होईल, त्याला त्याच्या आईसारखें किंवा बापासारखें म्हणतां येईल काय? त्याला घोडाहि म्हणतां येईल किंवा गाढवहि म्हणतां येईल काय?"

आश्वलायन म्हणाला "भो गौतम, त्याला घोडा किंवा गाढव म्हणतां येणार नाहीं. तो एक तिसर्‍याच जातीचा प्राणी होतो. त्याला आपण खेचर असें म्हणतों. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संबंधापासून झालेल्या मुलामध्यें असा प्रकार आढळून येत नाहीं."

बुद्ध म्हणाला "हे आश्वलायन, दोघां ब्राह्मण बंधूंपैकीं एक वेदपठन केलेला चांगला सुशिक्षित असेल, व दुसरा अशिक्षित असेल, तर त्यांत ब्राह्मण कोणत्या भावाला श्राद्धामध्यें किंवा यज्ञामध्यें प्रथम आमंत्रण करितील?"

आश्वलायन म्हणाला "जो सुशिक्षित असेल, तो जरी वयानें लहान असला, तरी त्यालाच यज्ञयागांत प्रथम आमंत्रण केलें जाईल."

बुद्ध म्हणाला "आतां असें समज, कीं, त्या दोघां भावांपैकीं एकजण मोठा विद्वान् आहे, पण अत्यंत दुराचारी आहे; दुसरा फारसा विद्वान् नाहीं, पण अत्यंत सुशील आहे. तेव्हां त्यांत प्रथमत: कोणाला आमंत्रण दिलें जाईल?"

आश्वलायन म्हणाला "भो गौतम, जो शीलवान् असेल, त्यालाच प्रथमत: आमंत्रण दिलें जाईल. दुराचारी मनुष्याला दिलेल्या दानापासून काय फल मिळणार आहे?"

बुद्ध म्हणाला "हे आश्वलायन, प्रथमत: तूं जातीला महत्त्व दिलेंस; नंतर वेदपठणाला महत्त्व दिलेंस, आणि आतां तर तूं शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात् मी जी चातुर्वर्णी शुद्धि सांगत असतों, तिचाच तूंहि अंगीकार केला आहेस!"

हें बुद्धाचें भाषण ऐकून आश्वलायन मान खालीं घालून उगाच बसला. पुढें काय बोलावें हें त्याला सुचेना!

तेव्हां बुद्ध म्हणाला "हे आश्वलायन, प्राचीन कालीं सात ब्रह्मर्षि अरण्यामध्यें पर्णकुटिकेंत रहात असतां त्यांची अशी एक पापी समजूत झाली होती कीं, 'ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे, आणि इतर वर्ण हीन आहेत; ब्राह्मणच काय ते ब्रह्मदेवाचे खरे दायाद आहेत.' असितदेवल ऋषीला ही बातमी जेव्हां समजली, तेव्हां आपली हजामत करून घेऊन मंजिष्ठवर्णाचीं वस्त्रें परिधान करून चांगल्या वहाणा पायांत घालून आणि हातांत सोन्याची काठी घेऊन तो त्या सात ब्राह्मणऋषींच्या स्थंडिलावर आला; व तेथें चंक्रमण करीत असतां म्हणाला 'वाहवा! हे ब्रह्मर्षि कोठें दिसत नाहींत ते!'

"हें त्याचें उद्धटपणाचें वर्तन पाहून त्या सात ब्रह्मर्षींनां फार राग आला, व 'हे चांडाला, तूं भस्म हो!' असा त्यांनीं देवलाला शाप दिला. पण त्याच्या शापाचा देवलावर वाईट परिणाम न होतां तो अधिक सुंदर आणि अधिक तेजस्वी दिसूं लागला!

"तेव्हां ते ब्राह्मणऋषि परस्परांनां म्हणाले 'अरेरे! आमचें तप व्यर्थ आहे, आमचें ब्रह्मचर्य निष्फल आहे; पूर्वी ज्यालां आम्ही शाप देत असूं, त्याचें ताबडतोब भस्म होत असे; पण याला जसजसा शाप देत जातों, तसतसा हा अधिकाधिक सुंदर होत आहे!'

"असितऋषि म्हणाला 'तुमचें तप व्यर्थ नाहीं किंवा तुमचें ब्रह्मचर्यहि निष्फल नाहीं; परंतु माझ्यावर विनाकारण रागावण्याचें तुम्हीं सोडून दिलें पाहिजे.'

" 'तूं कोण आहेस?' त्या सात ब्राह्मणऋषींनीं विचारलें.

"असितानें 'मी असितदेवलऋषि आहें' असें सांगितल्यावर त्या सात ब्राह्मणऋषींनीं त्याला नमस्कार केला. तेव्हां तो म्हणाला 'ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे व इतर वर्ण हीन आहेत, ब्राह्मणच काय ते ब्रह्मदेवाचे दायाद आहेत, अशी तुमची खरी समजूत झाली आहे, असें मी ऐकतों. पण तुमच्या सर्व पूर्वजांनीं ब्राह्मणस्त्रीशींच विवाह केला होता, याची तुम्हांला खात्री आहे काय? तुमच्या आज्यापणज्या वगैरे पूर्वजस्त्रियांनीं ब्राह्मणपुरुषांशींच संबंध ठेवला होता, याजबद्दल तुम्हांला खात्री आहे काय?'

" 'भो, आम्हांला यासंबंधानें कांहींच सांगतां येणार नाहीं.' त्या सात ऋषींनीं उत्तर दिलें.

"असित म्हणाला 'तर मग ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ,' व इतर वर्ण हीन आहेत, या म्हणण्यामध्यें अर्थ काय राहिला?"

"हें आश्वलायन, त्या सात ब्रह्मर्षींनां देखील असितानें निरुत्तर केलें. मग त्याच जातिवादासंबंधानें तूं माझ्याशीं कसा बोलूं शकशील?"

हें भाषण ऐकून आश्वलायन बुद्धाचा उपासक झाला.

बुद्धलीला सारसंगह

धर्मानंद कोसंबी
Chapters
प्रस्तावना (धर्मानंद कोसंबी) प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 1 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 2 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 3 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 4 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 5 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 1 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 2 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 3 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 4 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 5 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 6 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 7 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 8 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 9 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 10 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 11 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 12 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 13 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 14 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 15 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 16 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 17 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 18 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 19 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 20 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 21 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 22 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 23 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 24 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 25 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 26 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 27 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 28 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 29 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 30 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 31 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 32 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 33 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 34 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 35 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 36 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 37 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 38 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 39 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 40 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 41 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 42 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 43 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 44 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 1 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 2 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 3 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 4 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 5 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 6 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 7 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 8 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 9 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 10 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 11 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 12 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 13 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 14 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 15 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 16 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 17 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 18 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 19 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 20 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 21 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 22 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 23 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 24 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 25 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 26 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 27 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 28 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 29 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 30 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 31 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 32 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 33 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 34 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 35 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 36 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 37 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 38 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 39 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 40 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 41 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 42 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 43 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 44 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 45 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 1 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 2 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 3 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 4 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 5 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 6 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 7 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 8 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 9 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 10 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 11 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 12 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 13 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 14 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 15 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 16 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 17 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 18 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 19 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 20 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 21 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 22 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 23 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 24 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 25 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 26 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 27 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 28 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 29 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 30 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 31 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 32 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 33 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 34 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 35 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 36 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 37 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 38 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 39 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 40 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 41 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 42 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 43 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 44 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 45 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 46 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 47 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 48 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 49 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 50 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 51 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 52 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 53