Get it on Google Play
Download on the App Store

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 18

ज्या दिवशीं बोधिसत्व सुवर्णभूमीस जाण्याला निघाला, त्याच दिवशीं पौलजनक मरण पावला. त्याला सीवली नांवाची एकुलती एक कन्या होती. पौलजनकाची अशी इच्छा होती, कीं, ती ज्या पुरुषाला वरील त्यालाच आपल्यामागून राजा करावें. परंतु तिचें मन वळविण्यास कोणीहि समर्थ झाला नाहीं. राज्यांतील मोठमोठ्या अधिकार्‍यांनीं तिची मर्जी संपादण्यासाठीं पुष्कळ उपाय केले; परंतु ते सर्व व्यर्थ झाले. एकादा अधिकारी तिची मर्जी संपादन करण्यासाठीं राजवाड्यांत आला असतां ती त्याला "तूं माझें पादसंवाहन करशील, तर मी तुजवर प्रसन्न होईल," असे म्हणे, आणि त्यानें त्या विधीला आरंभ केल्याबरोबर "तुझ्या अंगीं कांहींच दम नाहीं, तूं अगदीं लाचार आहेस; तूं राजा होण्यास योग्य नाहींस," असें म्हणून त्याला लाथेनें झिडकारून राजवाड्यांतून हांकून देत असे.

राजाशिवाय राज्यव्यवस्था नीट चालेनाशी झाली, तेव्हां सीवलीच्या अनुमतीशिवाय कोणाला तरी राजा निवडावें, असा नागरिकांनीं निश्चय केला. निरनिराळे पण लावून ते पण जो जिंकील त्याला राज्यपद द्यावें, असें ठरलें. परंतु ते पण जिंकणारा कोणी माणूस सांपडला नाहीं. आतां राजा कोणाला करावें, अशी सर्व लोकांनां मोठी चिंता उत्पन्न झाली. तेव्हां राजाचा वृद्ध पुरोहित लोकांनां म्हणाला "तुम्ही काळजी करूं नका. आम्ही एक मंगल रथ तयार करूं, व त्या रथाला मंगल अश्व जोडून त्याला मोकळा सोडूं. तो ज्या ठिकाणीं जाऊन उभा राहील, त्या ठिकाणीं आम्हांला राज्यपदाला योग्य असा मनुष्य सांपडेल."

ही पुरोहिताची कल्पना सर्व लोकांनां पसंत पडली. त्याप्रमाणें त्यांनीं रथ तयार केला, व त्याला चार श्यामकर्ण अश्व जोडून तो मोकळा सोडला. त्याच्या मागोमाग पुरोहित, राजाचे प्रधान वगैरे नागरिक जन व मोठी फौज निघाली.

नगराला प्रदक्षिणा करून तो रथ थेट राजाच्या उद्यानांत शिरला. त्या वेळीं महाजनक तेथील मंगल शिलेवर निजला होता. तो रथ तेथें जाऊन त्या शिलेला प्रदक्षिणा करून तेथेंच उभा राहिला. पुरोहितानें तेथें निजलेल्या बोधिसत्वाला पाहिलें, व तो आपल्या लोकांनां म्हणाला "गृहस्थ हो, हा जर सत्पुरुष असेल तर गांभीर्यानें वागेल; नसेल, तर आम्हांला घाबरून इतस्तत: पळत सुटेल. एकदम सर्व वाद्यें वाजतील अशी व्यवस्था करा. आम्ही या मनुष्याची परीक्षा करूं."

पुरोहिताचें भाषण ऐकून मुख्य प्रधानानें बरोबर असलेल्या वादकांनां एकदम सर्व वाद्यें वाजविण्याचा हुकूम केला. त्या वाद्यांचा एवढा मोठा घोष झाला, कीं, सामान्य मनुष्य असता, तर नि:संशय गांगरून गेला असता; परंतु बोधिसत्वानें डोक्यावरील पांघरूण काढून या मोठ्या जनसमूहाकडे एकवार पाहिलें व उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर वळून पुन: डोळे मिटले. पुरोहितानें जवळ जाऊन हळूच त्याचे पाय उघडून पाहिले. त्याच्या पायांवरील लक्षणें पाहून पुरोहित आपल्या लोकांना म्हणाला "गृहस्थ हो! हा सामान्य मनुष्य नव्हे. हा सार्वभौमपदाला देखील योग्य आहे!"

बोधिसत्व उठून बसला, आणि सभोंवतीं जमलेल्या लोकांनां उद्देशून म्हणाला "तुम्ही माझ्याभोंवतीं कां जमलां आहां?"

पुरोहित म्हणाला "आम्ही मिथिलेचे नागरिक आहोंत. आमचा राजा पौलजनक परलोकवासी झाला. त्याच्या जागीं दुसर्‍या राजाची निवड करण्यासाठीं आम्ही निघालों आहों. आमचा मंगल रथ येथें येऊन उभा राहिला; तेव्हां आम्हां सर्वांची मनीषा अशी आहे, कीं, आपण या देशाचें राज्यपद स्वीकारावें."

बोधिसत्व म्हणाला "तुमच्या इच्छेला मान देण्यास मी तयार आहें."

तेव्हां लोकांनीं तेथेंच त्याला अभिषेक केला, व मोठ्या समारंभानें त्याजसहवर्तमान नगरामध्यें प्रवेश केला.

बुद्धलीला सारसंगह

धर्मानंद कोसंबी
Chapters
प्रस्तावना (धर्मानंद कोसंबी) प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 1 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 2 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 3 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 4 प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 5 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 1 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 2 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 3 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 4 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 5 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 6 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 7 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 8 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 9 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 10 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 11 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 12 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 13 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 14 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 15 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 16 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 17 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 18 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 19 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 20 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 21 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 22 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 23 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 24 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 25 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 26 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 27 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 28 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 29 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 30 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 31 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 32 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 33 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 34 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 35 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 36 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 37 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 38 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 39 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 40 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 41 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 42 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 43 बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 44 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 1 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 2 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 3 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 4 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 5 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 6 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 7 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 8 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 9 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 10 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 11 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 12 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 13 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 14 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 15 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 16 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 17 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 18 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 19 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 20 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 21 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 22 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 23 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 24 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 25 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 26 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 27 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 28 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 29 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 30 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 31 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 32 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 33 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 34 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 35 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 36 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 37 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 38 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 39 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 40 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 41 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 42 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 43 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 44 बुद्धचरित्र (भाग दुसरा) 45 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 1 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 2 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 3 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 4 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 5 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 6 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 7 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 8 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 9 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 10 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 11 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 12 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 13 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 14 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 15 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 16 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 17 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 18 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 19 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 20 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 21 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 22 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 23 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 24 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 25 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 26 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 27 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 28 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 29 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 30 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 31 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 32 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 33 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 34 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 35 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 36 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 37 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 38 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 39 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 40 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 41 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 42 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 43 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 44 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 45 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 46 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 47 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 48 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 49 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 50 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 51 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 52 बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 53