भाग ३ रा 63
६२
उग्गत गृहपति हस्तिग्रामक
“संघाच्या उपस्थायक उपासकांत उग्गत गृहपति हस्तिग्रामक श्रेष्ठ आहे.”
त्याचा जन्म हस्तिग्रामांतील एका श्रेष्ठिकुलांत झाला. उग्गत हें त्याचें नांव. ह्याच्या आणि वैशालिक उग्ग गृहपतीच्या गोष्टींत फार थोडा फरक आहे. ह्याची गोष्ट अट्ठकनिपाताच्या बाविसाव्या सुत्तांत आली आहे. त्या सुत्ताचा सारांश असा :-
भगवान् वज्जींच्या देशांत प्रवास करीत हस्तिग्रामाला आला. तेथें भिक्षूंना उद्देशून तो म्हणाला, “भिक्षुहो, उग्ग १ (१ येथे उग्गतालाच उग्ग म्हटलें आहे, असें मनोरथपूरणीवरून दिसून येतें.) गृहपति हस्तिग्रामक आठ उत्तम गुणांनीं समन्वित आहे.” एवढें बोलून भगवंतानें विहारांत प्रवेश केला. एका भिक्षूनें उग्गाच्या घरीं जाऊन त्याला हें वर्तमान सांगितलें व तो कोणत्या आठ गुणांनी समन्वित आहे, ह्याची चौकशी केली, उग्ग म्हणाला, “भगवंतानें कोणते गुण सांगितले असतील, हें मला माहित नाहीं. तरी माझ्या अंगीं असलेले आठ चांगले गुण सांगतों. (१) मी जेव्हां भगवंताला नागवनांत २ (२- हें उद्यान त्याच्या स्वतःच्या मालकीचें होतें, असें अट्ठकथाकाराचें म्हणणें आहे.) प्रथमतः पाहिलें, तेव्हां एकदम माझी त्याच्यावर श्रद्धा जडली, व माझी दारूची धुंदी उतरली. हा पहिला चांगला गुण माझ्यामध्यें आहे. (२ ते ५ गुण वरच्या सूत्रांतल्या प्रमाणेंच आहेत.) (६) मी जेव्हां संघाला आमंत्रण करतों, तेव्हां अमूक भिक्षु समाधिप्रज्ञापारंगत, अमुकप्रज्ञाविमुक्त, अमुक समाधिकुशल, अमुक दृष्टिप्राप्त, अमुक श्रद्धाविमुक्त, अमुक धर्मानुसारी, अमूक श्रद्धानुसारी, अमुक शीलवान् व अमूक दुःशील, पापी आहे ३ असें देवता मला सांगतात. (३- येथें नऊ प्रकारचे भिक्षु सांगितले आहेत. त्यांत शीलवान् व दुःशील (दुराचारी) हे स्पष्टच आहेत. श्रद्धानुसारी येथपर्यंत पहिल्या सातांची सविस्तर माहिती माज्झिमनिकायांतील कीटागिरिसुत्तांत सांपडते. Call the labourers and give them their hire, beginning from the last unto the first. (Matthew. 20.8.) ह्या बायबलांतील गोष्टीची येथें आठवण होते.) असें देवता मला सांगतात. पण संघाला अन्नदान देत असतां त्यांच्या मध्यें मी भेदभाव ठेवीत नाहीं. सगळ्यांना समानतेनें वागवितों. हा माझा सहावा उत्तम गुण आहे. (७वा पूर्वीं प्रमाणेंच.) (८) जर मी भगवंतापूर्वीं मरण पावलों, तर ‘उग्ग गृहपति हस्तिग्रामक पुन्हां या लोकाला येणार नाहीं,’ असें भगवन्तानें म्हटल्यास नवल नाहीं. हा माझा आठवा उत्तम गुण आहे.”
नंतर तो भिक्षु भगवंताजवळ गेला व उग्गाचें म्हणणें त्यानें भगवंताला कळविलें. तेव्हां भगवान् म्हणाला, “जें उग्ग गृहपति बोलला तें ठीकच बोलला.”
उग्ग वैशालिक आणि उग्ग हस्तिग्रामक हे दोन निराळे गृहस्थ होते, यांत शंका नाहीं. परंतु ह्या दोन सूत्रांत सांगितलेले त्यांच्या आंगचें गुण जवळ जवळ एकसारखेच आहेत. तेव्हां ते यांपैकीं दोघांच्याहि अंगीं होते किंवा एकाच्याच अंगीं होते हें सांगणें कठीण आहे. कोणी ह्या उग्गासंबंधानें तर कोणी त्या उग्गासंबंधानें ही गोष्ट थोड्याबहुत फेरफारानें ऐकिली असावी; व दोघांच्या बोलण्यांत फरक झाल्या कराणानें पहिल्याला पहिली गोष्ट, व दुसर्याला दुसरी गोष्ट लागू करण्यांत आली असल्याचाहि संभव आहे.