भाग ३ रा 21
१५
कांक्षारेवत
“ध्यानरत भिक्षुश्रावकांत कांक्षारेवत श्रेष्ठ आहे.”
ह्याचा जन्म श्रावस्तींतील एका धनाढ्य कुटुंबांत झाला. इतर लोकांबरोबर तो भगवंताचा उपदेश ऐकण्यास जात असे. कांहीं काळानें प्रपंचाविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळें तो भिक्षु झाला. कोणती गोष्ट करणें योग्य व कोणती अयोग्य, ह्याविषयीं त्याला फार शंका वाटे, व वृद्ध भिक्षूंपाशीं ह्यासंबंधी तो नीट विचारपूस करी. लहानसहान गोष्टींतहि याला शंका वाटते, म्हणून भिक्षु त्याला ‘कांक्षारेवत’ असें म्हणूं लागले, व ह्याच नांवानें पुढें तो प्रसिद्धीला आला. तो समाधिभावनेमध्यें अत्यंत दक्ष असे व त्यांतच आनंद मानी. म्हणून ध्यानरत भिक्षूंत त्याला अग्रस्थान मिळालें.
१६
सोण कोळिविस
“उत्साही भिक्षुश्रावकांत सोण कोळिविस श्रेष्ठ आहे”
सोण हें त्याचें नांव व कोळिविस आडनांव. कालचंपा नगरांत त्याचा जन्म झाला. तो घरचा अत्यंत सधन होता. त्याच्या सुकुमारपणाची ख्याति त्या वेळीं सर्व मगधदेशांत पसरली होती; आणि म्हणूनच बिंबिसार राजानें त्याला मुद्दाम बोलावून नेलें. याच्या पुढची सर्व हकिकत पहिल्या भागांत (कलम ४६-५०) आलीच आहे.
१७
सोण कुटिकर्ण
“प्रेमळ भाषण करणार्या भिक्षुश्रावकांत सोण कुटिकर्ण श्रेष्ठ आहे.”
राजगृह येथील काली १ नांवाची एक तरुणी अवंतीराष्ट्रांतील कुरुरघर नांवाच्या शहरांत एका मोठ्या धनाढ्य कुटुंबांत दिली होती. केवळ बुद्धाची कीर्ति ऐकून ती बुद्धोपासिकां झाली. तिचा हा मुलगा. एक कोटी किंमतीचीं कुंडलें त्याच्या कानांत असत, म्हणून कोटिकर्ण म्हणण्याच्या जागीं सामान्य लोक त्याला कुटिकर्णच म्हणत; व ह्याच नांवानें तो पुढें प्रसिद्धीला आला.
-----------------------------------------------------------------------------------------------------
१ हिची गोष्ट ह्या भागाच्या ७५ व्या प्रकरणांत पहावी.

महाकात्यायन कुरुरघर येथें एका पर्वतावर वारंवार रहात असे, व सोण त्याचा उपदेश ऐकण्यासाठी त्याजपाशीं जात असे. सोणाच्या प्रपंचांत कोणत्याहि प्रकारे कमतरता नव्हती. तरी महाकात्यायनाचा उपदेश ऐकून त्याचें मन प्रपंचांत रमेनासें झालें, व त्यानें वारंवार विनंति करून महाकात्यायनाकडून प्रव्रज्या घेतली. ह्याचें वर्णन पहिल्या भागांत (कलम ५१-५४) आलेंच आहें.