Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३ रा 53

५१
भद्दा कापिलानी२ (२- कपिलानी असाहि पाठ आढळतो.)

“पूर्वजन्माची आठवण करणार्‍या भिक्षुणीश्राविकांत भद्दा कापिलानी श्रेष्ठ आहे.”
हिची हकिगत महाकाश्यपाच्या गोष्टींत (प्र.४) आलीच आहे. महाकाश्यपाला उजव्या रस्त्यानें पाठवून भद्दा डाव्या रस्त्यानें थेट भिक्षुणींच्या उपाश्रयांत गेली व भिक्षुणी झाली. थेरीगाथेंत सांपडणार्‍या तिच्या चार गाथांपैकीं शेवटली गाथा आहे ती अशी :-

दिस्वा आदीनवं लोके उभो पब्बजिता मयं।
त्यम्ह स्त्रीणासवा दन्ता सीतिभूतम्ह निब्बुता।।


अर्थ :- ह्या प्रपंचांत दोष दिसून आल्यावरून आम्हीं उभयतांनीं प्रव्रज्या घेतली. आतां आमच्या वासनेचा क्षय झाला आहे, आम्ही दान्त झालों आहों, शांत झालों आहों; आम्ही निर्वाणाप्रत पोंचलों आहों.

५२
भद्दा कच्चाना

“अभिज्ञालाभिनी १ भिक्षुणीश्राविकांत भद्दा कच्चाना श्रेष्ठ आहे.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- नानातर्‍हेच्या सिद्धि दाखविणें, दिव्यश्रोत्र, दुसर्‍याचें चित्त जाणणें, पूर्वजन्म आठवणें, दिव्यचक्षु व आर्यसत्यांचें ज्ञान अशा सहा अभिज्ञा आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
ही आमच्या बोधिसत्त्वाची पत्‍नी; राहुलाची आई. महाप्रजापती गोतमी बरोबर हिनेंहि प्रव्रज्या घेतली. थेरी गाथेंत हिच्या गाथा सांपडत नाहींत. पण थेरी अपदानांत यशोधरेचें एक मोठें अपदान आहे. त्यावरून यशोधरा हीच असली पाहिजे, असें वाटतें. तें सर्व अपदान येथें देण्यास सवड नाहीं. हिच्या चरित्राशीं जुळणार्‍या कांहीं वाक्यांचा सारांश मात्र येथें देतों.

पुष्कळ भिक्षुणींना बरोबर घेऊन ती ऋद्धिमती (यशोधरा) संबुद्धाजवळ आलीं, व त्याला नमस्कार करून म्हणाली, “आतां माझें वय ७८ वर्षांचें आहे. आतां जीवित थोडें राहिलें आहे. तुम्हांला सोडून मी जाणार आहें, माझा मोक्ष मी मिळविलेला आहे. ह्या संसारांत जर माझ्याकडून तुमचा कांहीं अपराध झाला असेल तर त्याची क्षमा करा... ‘उपकार करणारी, सुखदुःखांमध्यें समानतेनें वागणारी, सदर्थ दाखविणारी व अनुकंपा करणारी अशी जी तीच खरी नारी होय,’ अशी तुम्हीं जिची स्तुति केली, ती मी तुमची पूर्वाश्रमांतील स्त्री आहें.”

काळुदायीच्या गोष्टींत (प्र.३२) राहुलमाता व बोधिसत्त्व एकाच दिवशीं जन्मल्याचें सांगितलें आहे. तें जर गृहीत धरलें, तर भगवंताच्या परिनिर्वाणापूर्वीं दोन वर्षें तिनें हें अपदान म्हटलें असावें, असे म्हणावें लागतें. त्याच वर्षी ती परिनिर्वाण पावली.

बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी
Chapters
बौद्धसंघाचा परिचय 1 बौद्धसंघाचा परिचय 2 बौद्धसंघाचा परिचय 3 भाग १ ला 1 भाग १ ला 2 भाग १ ला 3 भाग १ ला 4 भाग १ ला 5 भाग १ ला 6 भाग १ ला 7 भाग १ ला 8 भाग १ ला 9 भाग १ ला 10 भाग १ ला 11 भाग १ ला 12 भाग १ ला 13 भाग १ ला 14 भाग १ ला 15 भाग १ ला 16 भाग १ ला 17 भाग १ ला 18 भाग १ ला 19 भाग १ ला 20 भाग १ ला 21 भाग १ ला 22 भाग १ ला 23 भाग १ ला 24 भाग १ ला 25 भाग १ ला 26 भाग २ रा 1 भाग २ रा 2 भाग २ रा 3 भाग २ रा 4 भाग २ रा 5 भाग २ रा 6 भाग २ रा 7 भाग २ रा 8 भाग २ रा 9 भाग २ रा 10 भाग २ रा 11 भाग २ रा 12 भाग २ रा 13 भाग २ रा 14 भाग २ रा 15 भाग २ रा 16 भाग २ रा 17 भाग २ रा 18 भाग २ रा 19 भाग २ रा 20 भाग २ रा 21 भाग २ रा 22 भाग २ रा 23 भाग २ रा 24 भाग २ रा 25 भाग २ रा 26 भाग २ रा 27 भाग २ रा 28 भाग २ रा 29 भाग २ रा 30 भाग २ रा 31 भाग २ रा 32 भाग २ रा 33 भाग २ रा 34 भाग २ रा 35 भाग २ रा 36 भाग २ रा 37 भाग २ रा 38 भाग २ रा 39 भाग २ रा 40 भाग २ रा 41 भाग २ रा 42 भाग २ रा 43 भाग २ रा 44 भाग २ रा 45 भाग २ रा 46 भाग २ रा 47 भाग ३ रा 1 भाग ३ रा 2 भाग ३ रा 3 भाग ३ रा 4 भाग ३ रा 5 भाग ३ रा 6 भाग ३ रा 7 भाग ३ रा 8 भाग ३ रा 9 भाग ३ रा 10 भाग ३ रा 11 भाग ३ रा 12 भाग ३ रा 13 भाग ३ रा 14 भाग ३ रा 15 भाग ३ रा 16 भाग ३ रा 17 भाग ३ रा 18 भाग ३ रा 19 भाग ३ रा 20 भाग ३ रा 21 भाग ३ रा 22 भाग ३ रा 23 भाग ३ रा 24 भाग ३ रा 25 भाग ३ रा 26 भाग ३ रा 27 भाग ३ रा 28 भाग ३ रा 29 भाग ३ रा 30 भाग ३ रा 31 भाग ३ रा 32 भाग ३ रा 33 भाग ३ रा 34 भाग ३ रा 35 भाग ३ रा 36 भाग ३ रा 37 भाग ३ रा 38 भाग ३ रा 39 भाग ३ रा 40 भाग ३ रा 41 भाग ३ रा 42 भाग ३ रा 43 भाग ३ रा 44 भाग ३ रा 45 भाग ३ रा 46 भाग ३ रा 47 भाग ३ रा 48 भाग ३ रा 49 भाग ३ रा 50 भाग ३ रा 51 भाग ३ रा 52 भाग ३ रा 53 भाग ३ रा 54 भाग ३ रा 55 भाग ३ रा 56 भाग ३ रा 57 भाग ३ रा 58 भाग ३ रा 59 भाग ३ रा 60 भाग ३ रा 61 भाग ३ रा 62 भाग ३ रा 63 भाग ३ रा 64 भाग ३ रा 65 भाग ३ रा 66 भाग ३ रा 67 भाग ३ रा 68 भाग ३ रा 69 भाग ३ रा 70 भाग ३ रा 71 भाग ३ रा 72 भाग ३ रा 73 भाग ३ रा 74 भाग ३ रा 75 भाग ३ रा 76 भाग ३ रा 77 भाग ३ रा 78 भाग ३ रा 79 भाग ३ रा 80