भाग ३ रा 43
३९
सागत
“तेजोधातुकुशल १ भिक्षुश्रावकांत सागत श्रेष्ठ आहे.” (१- समाधि साधल्यानंतर आपल्या तेजानें दुसर्याला दिपवून टाकण्याचें किंवा दुसर्याचें तेज हरण करण्याचें सामर्थ्य असणार्याला तेजोधातुकुशल म्हणतात.)
हा श्रावस्ती येथें ब्राह्मणकुळांत जन्मला, व पुढें वयांत आल्यावर भिक्षु झाला. अर्हत् होण्यापूर्वींच ह्याला योगसिद्धि प्राप्त झाली होती व त्यायोगें भद्दवतिका गांवांत त्यानें एका भयंकर नागाचें तेज हरण केल्याची गोष्ट दुसर्या भागांत (कलम १००) आलीच आहे.
४०
राध
“वक्त्या भिक्षुश्रावकांत राध श्रेष्ठ आहे.”
हा राजगृहांत एका ब्राह्मणकुळांत जन्मला. राध हें त्यांचे नांव. म्हातारपणीं बायकोमुलांकडून हेळसांड होऊं लागली म्हणून त्यानें भिक्षु होण्याचा विचार केला. पण त्याला म्हातारा म्हणून प्रव्रज्या देण्यास कोणी तयार होईना. शेवटीं सारिपुत्त स्थविराकडून भगवंतानें त्याला प्रव्रज्या देवविली. त्याला भगवंतानें उपदेशिलेलीं पुष्कळ सुत्तें मज्झिम आणि संयुत्तनिकायांत आहेत. संयुत्तांत तर राध संयुत्त नांवाचें एक प्रकरणच आहे. त्यांत एके ठिकाणीं भगवान् म्हणतो, “राध, लहान मुलगे आणि मुली धुळीचीं घरें करून खेळत असतात; आणि जोंपर्यंत त्या घरांत त्यांची आसक्ति असते, तोंपर्यंत ते त्या घरांवर अत्यंत प्रेम करतात. पण जेव्हां त्या घरांचा त्यांना कंटाळा येतो, तेव्हां हातांनीं आणि पायांनीं तीं मोडून टाकून धूळ जिकडे तिकडे फैलावतात. त्याचप्रमाणें, हे राध, तुम्ही रूपवेदनादिक स्कंधांचा विध्वंस करा (त्यांच्यावर आसक्ति ठेवूं नका).”
४१
मोघराज
“रुक्ष चीवर धारण करणार्या भिक्षुश्रावकांत मोघराज श्रेष्ठ आहे.”
बावरी नांवाचा एक प्रसिद्ध ब्राह्मण श्रावस्तीहून दक्षिण देशांत गोदावरीच्या कांठीं जाऊन राहिला, व तेथें त्यानें एक महायज्ञ २ केला. (२ - ही कथा सुत्तनिपातांतील पारायणवग्गाच्या आरंभीं आहे.) त्या यज्ञाच्या शेवटीं एक ब्राह्मण येऊन त्यानें बावरीजवळ पांचशें नाणीं मागितलीं. पण बावरी म्हणाला, “जें कांहीं मजपाशीं होतें, तें यज्ञांत खर्चिले; आतां माझ्या जवळ कांहीं राहिलें नाहीं.” तेव्हां त्या ब्राह्मणानें क्रोधाविष्ट होऊन, ‘सातव्या दिवशीं तुझ्या डोक्याचे सात तुकडे होवोत’ असा शाप दिला. त्यायोगें बावरी फार घाबरला. त्याची हितचिंतक देवता तेथें प्रकट होऊन त्याला म्हणाली, “डोकें कोणतें व तें फुटतें कसे, हें त्या ढोंगी, लोभी ब्राह्मणाला माहीत नाही!”
बा० :- मग देवते, हें तूं आम्हांला सांगशील काय?
देवता :- मलाहि हें माहीत नाहीं. पण कपिलवस्तूहून निघालेला व इक्ष्वाकु राजाच्या कुळांत जन्मलेला सर्वज्ञ बुद्ध हें तुला सांगूं शकेल.
बुद्ध हें नांव ऐकिल्याबरोबर बावरीला अतिशय आनंद झाला. पण वृद्धपणामुळें त्याला स्वतःला श्रावस्ती येथें जातां येणें शक्य नव्हतें. म्हणून त्यानें आपले सोळा शिष्य तिकडे पाठविले. ते सर्व बुद्धाचे शिष्य झाले. त्यांपैकीं मोघराज हा एक होता. तो अत्यंत साधें चीवर धारण करीत असे, म्हणून त्याला रुक्ष चीवर धारण करणार्यांत अग्रस्थान मिळालें.