Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३ रा 24

२०
राहुल

“नियम शिकण्याची आस्था बाळगणार्‍या भिक्षुश्रावकांत राहुल श्रेष्ठ आहे.”

राहुलची गोष्ट पहिल्या भागांत (कलम ३२-३४) आलीच आहे. त्याला उद्देशून भगवंतानें उपदेशिलेलीं अंबलट्ठिकराहुलोवाद, महाराहुलोवाद व चूळराहुलोवाद, अशीं मज्झिमनिकायांत तीन सुत्तें आहेत. तीं अनुक्रमें शील, समाधि आणि प्रज्ञा ह्या ज्या बुद्ध शासनाच्या तीन पायर्‍या आहेत, त्यासंबंधानें आहेत. शीलांत भगवंतानें सत्याला अत्यंत महत्व दिलें आहे, आणि ह्याचसंबंधानें पहिल्या सुत्तांत उपदेश आहे. अशोक राजानेंहि आपल्या बाभ्रा येथील शिलालेखांत त्या सुत्ताच्या उल्लेख केला आहे. त्याचा सारांश बुद्धलीलासारसंग्रहाच्या तिसर्‍या भागांत (प्र. २१) आलाच आहे. बाकी दोन सुत्तांचा सारांश येथें देण्यांत येत आहे :-

(१) भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडकाच्या आरामांत रहात होता. एके दिवशीं आपलें पात्रचीवर घेऊन भगवान् श्रावस्तींत भिक्षेला गेला. त्याच्या मागोमाग राहुलहि जाऊं लागला. त्याला पाहून भगवान् म्हणाला, “राहुल, सर्व प्रकारचें रूप माझें नाहीं, तें मी नाहीं व तें माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें.”

राहुल म्हणाला, “भगवन्, रूपच तेवढें आपला आत्मा नाहीं, असें जाणावें काय?”

भगवान् :-  राहुल, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञानहि असेंच समजावें.

भगवंतानें उपदेश केला असतां, ‘आज कशाला भिक्षेला जा,’ असा विचार करून राहुल श्रावस्तींत न जातां बाहेरच एका झाडाखालीं बसला. त्याला पाहून सारिपुत्त म्हणाला, “राहुल आनापानस्मृतीची (प्राणायामाची) भावना वृद्धिगंत केली असतां फार फायदेशीर होते.”

संध्याकाळीं तेथून उठून राहुल भगवंतापाशीं गेला, आणि ‘आनापानस्मृतीची भावना कशी करावी?’ असा त्यानें भगवंताला प्रश्न केला. भगवान् म्हणाला, “पूर्वजन्मींच्या कर्मापासून उत्पन्न झालेले केशलोमादिक कठीण शरीरावयव ही आध्यात्मिक पृथ्वीधातु आहे. आध्यात्मिक पृथ्वीधातु काय कीं बाहेरची पृथ्वीधातु काय, सर्व सारखीच. ती माझी नाहीं, ती मी नाहीं, ती माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें. राहुल, पित्तश्लेष्मादिक आध्यात्मिक आपोधातु काय, कीं बाहेरची आपोधातु काय, ती सर्व सारखीच. ती माझी नाहीं, ती मी नाहीं, ती माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें. अन्नाचें पचन करणारी, दाह करणारी इत्यादी आध्यात्मिक तेजोधातु काय कीं बाहेरची तेजोधातु काय... श्वासोच्छ्वासादिक आध्यात्मिक वायुधातु काय कीं बाहेरची वायुधातु काय... आध्यात्मिक आकाशधातु काय, कीं बाहेरची आकाशधातु काय, ती सर्व सारखीच. ती माझी नाहीं, ती मी नाहीं, ती माझा आत्मा नाहीं, हें प्रज्ञेनें यथार्थतया जाणावें.

बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी
Chapters
बौद्धसंघाचा परिचय 1 बौद्धसंघाचा परिचय 2 बौद्धसंघाचा परिचय 3 भाग १ ला 1 भाग १ ला 2 भाग १ ला 3 भाग १ ला 4 भाग १ ला 5 भाग १ ला 6 भाग १ ला 7 भाग १ ला 8 भाग १ ला 9 भाग १ ला 10 भाग १ ला 11 भाग १ ला 12 भाग १ ला 13 भाग १ ला 14 भाग १ ला 15 भाग १ ला 16 भाग १ ला 17 भाग १ ला 18 भाग १ ला 19 भाग १ ला 20 भाग १ ला 21 भाग १ ला 22 भाग १ ला 23 भाग १ ला 24 भाग १ ला 25 भाग १ ला 26 भाग २ रा 1 भाग २ रा 2 भाग २ रा 3 भाग २ रा 4 भाग २ रा 5 भाग २ रा 6 भाग २ रा 7 भाग २ रा 8 भाग २ रा 9 भाग २ रा 10 भाग २ रा 11 भाग २ रा 12 भाग २ रा 13 भाग २ रा 14 भाग २ रा 15 भाग २ रा 16 भाग २ रा 17 भाग २ रा 18 भाग २ रा 19 भाग २ रा 20 भाग २ रा 21 भाग २ रा 22 भाग २ रा 23 भाग २ रा 24 भाग २ रा 25 भाग २ रा 26 भाग २ रा 27 भाग २ रा 28 भाग २ रा 29 भाग २ रा 30 भाग २ रा 31 भाग २ रा 32 भाग २ रा 33 भाग २ रा 34 भाग २ रा 35 भाग २ रा 36 भाग २ रा 37 भाग २ रा 38 भाग २ रा 39 भाग २ रा 40 भाग २ रा 41 भाग २ रा 42 भाग २ रा 43 भाग २ रा 44 भाग २ रा 45 भाग २ रा 46 भाग २ रा 47 भाग ३ रा 1 भाग ३ रा 2 भाग ३ रा 3 भाग ३ रा 4 भाग ३ रा 5 भाग ३ रा 6 भाग ३ रा 7 भाग ३ रा 8 भाग ३ रा 9 भाग ३ रा 10 भाग ३ रा 11 भाग ३ रा 12 भाग ३ रा 13 भाग ३ रा 14 भाग ३ रा 15 भाग ३ रा 16 भाग ३ रा 17 भाग ३ रा 18 भाग ३ रा 19 भाग ३ रा 20 भाग ३ रा 21 भाग ३ रा 22 भाग ३ रा 23 भाग ३ रा 24 भाग ३ रा 25 भाग ३ रा 26 भाग ३ रा 27 भाग ३ रा 28 भाग ३ रा 29 भाग ३ रा 30 भाग ३ रा 31 भाग ३ रा 32 भाग ३ रा 33 भाग ३ रा 34 भाग ३ रा 35 भाग ३ रा 36 भाग ३ रा 37 भाग ३ रा 38 भाग ३ रा 39 भाग ३ रा 40 भाग ३ रा 41 भाग ३ रा 42 भाग ३ रा 43 भाग ३ रा 44 भाग ३ रा 45 भाग ३ रा 46 भाग ३ रा 47 भाग ३ रा 48 भाग ३ रा 49 भाग ३ रा 50 भाग ३ रा 51 भाग ३ रा 52 भाग ३ रा 53 भाग ३ रा 54 भाग ३ रा 55 भाग ३ रा 56 भाग ३ रा 57 भाग ३ रा 58 भाग ३ रा 59 भाग ३ रा 60 भाग ३ रा 61 भाग ३ रा 62 भाग ३ रा 63 भाग ३ रा 64 भाग ३ रा 65 भाग ३ रा 66 भाग ३ रा 67 भाग ३ रा 68 भाग ३ रा 69 भाग ३ रा 70 भाग ३ रा 71 भाग ३ रा 72 भाग ३ रा 73 भाग ३ रा 74 भाग ३ रा 75 भाग ३ रा 76 भाग ३ रा 77 भाग ३ रा 78 भाग ३ रा 79 भाग ३ रा 80