जातिभेद 14
'' तथा जाति-कर्म-शरीरादिभिर्दूषितो जुंगित: । तत्र मातंग -कोलिक-बरूड-सूचिक-छिंपादयोऽस्पृश्या जातिजुंगिता:। स्पृश्या अपि स्त्री-मयूर-कुक्कट-शुकादिपोषका वंशवरत्रारोहण -नखप्रक्षालन
* बौध्द भिक्षुसंघातील प्रवेशविधीसंबधी 'बुध्द, धर्म आणि संघ, पृ.५६-६० बौध्दसंघाचा परिचय, पृ.- १७-१९ पहा.
लन - सौकरिकत्व-वागुरिकत्वादिनिंदिंतकर्मकारिण: कर्मजुंगिता:। करचरणवर्जिता: पंगु-कुब्ज-वामनक-काणप्रभृतय: शरीरजुंगिता:। तेऽपि न दीक्षार्हा लोकेऽवर्णवादसंभवात्।''
'त्याचप्रमाणें जाति, कर्म, शरीर इत्यादिकांनी दूषित जुंगित समजावा. त्यांत मांग, कोळी, बुरूड, शिंपी, रंगारी इत्यादिक अस्पृश्य जातिजुंगति होत. स्पृश्य असून देखील स्त्री, मोर, कोंबडीं, पोपट वगैरे पाळणें बांबूवरची व दोरीवरची कसरत करणें, नखें साफ करणें, डुकरें पाळणें पारध्याचें काम करणें इत्यादि निंद्य कर्में करणारे कर्मजुंगित होत. हातपाय नसलेले, पंगु, कुबडे, ठेंगणे, तिरवे इत्यादिक शरीरजुंगित होत. लोंकांत टीका होण्याचा संभव असल्यामुळे ते देखील दीक्षा देण्यास योग्य नाहीत.'*
बौध्द भिक्षुसंघांत प्रवेश करण्याला जाति मुळीच आड येत नाही. कर्में निंद्य असलीं, तर तीं त्याला सोडावींच लागतात, पण त्यांमुळे तो दीक्षेला अयोग्य ठरत नाही.
अहिंदूचा हिंदुसमाजांत प्रवेश
असें जरी आहे, तरी बौध्द आणि जैन या दोनही संप्रदायांनी परकीय लोकांना हिंदुसमाजांत दाखल करून घेण्याचें महत्त्वाचें कार्य केलें. ग्रीक, शक, हूण, मालव, गुर्जर इत्यादिक बाहेरच्या जाती हिंदुस्थानांत आल्या, आणि या दोन धर्माच्या महाद्वारांनी त्यांनी हिंदुसमाजांत प्रवेश केला. प्रथमत: हे लोक जैन किंवा बौध्द होत असत, आणि मग यथारूचि ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य बनत. एकाच घराण्यांतील एका भावाच्या संततीने क्षत्रियत्व व दुसर्या भावाच्या संततीने ब्राह्मणत्व पत्करल्याचा दाखला सापडला आहे *
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* प्रवचनसारोद्वार द्वार १०७. हा उतारा मुनि श्री जिनविजयजी यांनी काढून दिला, ह्याबद्दल त्यांचे आभार मानतों.

अस्पृश्यतेचा परिणाम
याप्रमाणें जेते लोक हिंदुसमाजांत मिसळून गेले, तरी अस्पृश्यांची परिस्थिति सुधारली नाही. जैन आणि बौध्द श्रमणांनी त्यांची हेळसांड केली, आणि त्यामुळे उत्तरोत्तर अस्पृश्याविषयी तिटकारा वाढत गेला; नाहक त्यांचा छळ होऊं लागला; आणि त्याचा परिणाम हळूहळू सर्व समाजाला व खुद्द जैनांना आणि बौध्दांना भोगावा लागला.