Get it on Google Play
Download on the App Store

जातिभेद 1

प्रकरणे दहावें
जातिभेद
जातिभेदाचा उगम

'ब्राह्मणोऽस्य मुखमासीदबाहू राजन्य: कृत:।
उरू तदस्य यद्वैश्य पद्भयां शूद्रो अजायत॥'
ऋ. १०। ९०। १२

हिंदुस्थानांतील जातिभेदाचें मूळ ह्या पुरूषसूक्ताच्या ऋचेंत आहे असें समजले जातें. परंतु ही समजूत चुकीची आहे. वेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशांत आणि मध्यहिंदुस्थानांत अहिंसा धर्माप्रमाणे जातिभेदधर्म देखील अस्तित्वांत होता. आर्यांच्या आगमनामुळे आणि वैदिक संस्कृतीच्या प्रसारामुळे अहिंसाधर्माला अरण्यवास कसा पत्करावा लागला हें पहिल्या प्रकरणांत दाखविण्यांत आलेंच आहे. (पूर्वाध पृ. १८ - २१). पण जातिभेदाची अशी स्थिति झाली नाही. त्यांत थोडा फेरफार होऊन तो तसाच चालू राहिला .

क्षत्रियांचें वर्चस्व

सुमेरियांत बहुधा पुजारीच राजा होत असे आणि तसाच प्रकार सप्तसिंधु प्रदेशांत होता. ह्या प्रदेशांत जीं लहानसहान संस्थाने होतीं त्यांचा प्रमुख वृत्र याला इंद्राने ठार मारलें, आणि त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचें पाप लागलें, असें वर्णन महाभारतांत आढळतें.* आर्य येण्यापूर्वी कोणती स्थिति होती हें वरील ऋचेंत सांगितलें आहे. ऋषि म्हणतो, ''एके काळीं विराट पुरूषाचें मुख ब्राह्मण होता. बाहू राजन्य असे; त्याच्या मांडया वैश्य, आणि त्याच्यापासून शूद्र झाला.'' आर्याच्या आगमनामुळे क्षत्रियांना महत्त्व आलें, आणि ब्राह्मणांचें वर्चस्व नष्ट झालें. तथापि पुरोहिताचें काम त्यांजकडे राहिलें. ही स्थिति बुध्दकाळापर्यंत चालू होती. पालि वाड:मयांत जिकडे तिकडे क्षत्रियांना प्रमुख स्थान देण्यांत आलें आहे. आणि उपनिषदांत देखील त्याचाच प्रतिध्वनि उमटलेला दिसून येतो. उदाहरणार्थ खालील मजकूर पहा.

ब्रह्म वा इदमग्न आसीदेकमेव। तदेकं सन्न व्यभवत्तच्छेयोरूपमत्ससृजत क्षत्रं यान्येतानि देवत्रा क्षत्राणीन्द्रो वरूण: सोमो रूद्र:पर्जन्यो यमो मृत्युशीरान इति तस्मात् क्षत्रात्पंर नास्ति। तस्माद् ब्राह्मण: क्षत्रियमधस्तादुपास्ते । (बृहदारण्यक १।४।११)

'पूर्वी ब्रह्म तेवढें होतें. पण तें एक असल्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. म्हणून त्याने उत्कृष्टरूप् क्षत्रियजाति उत्पन्न केली. ते क्षत्रिय म्हणजे देवलोकांत इन्द्र,वरूण, सोम, रूद्र, पर्जन्य, यम, मृत्यू आणि ईशान. यास्तव क्षत्रियजातीहून श्रेष्ठ दुसरी जात नाही. आणि म्हणूनच ब्राह्मण आपणाकडे कमीपणा घेऊन क्षत्रियाची उपासना करतो.'

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23