प्रस्तावना 5
४ प्रज्ञापारमिता
एकान्तवासाच्या योगें तुम्ही ज्ञान मिळविण्यास समर्थ झालें पाहिजे. लोकोपयोगी ज्ञान मिळवून तें पूर्णत्वाला नेणें यालाच प्रज्ञापारमिता म्हणतात. तुमच्या वाचनांत येणार्या पुस्तकांत आणि तुमच्या रोजच्या व्यवसायांत पुष्कळ ज्ञान भरलेलें आहे. पण तें कसें ग्रहण करावें हें जर तुम्हास माहीत नसलें तर त्यापासून फायदा न होतां नुकसान होणार, व तें तुमच्या घाताला कारण होणार. पै पैशाच्या लोभानें जे ज्ञान संपादन करतात, ते एक तर आजन्म कारकुनी किंवा असाच कांहीं पोटाचा धंदा करून असंतुष्टाणें काळ कंठीत असतात; अथवा लबाडीनें आणि चोरीनें पैसा कमावण्यास शिकून आपला सर्वस्वीं घात करून घेतात. अशा लोकांच्या ज्ञानाला प्रज्ञा म्हणत नाहींत, प्रज्ञा म्हणजे लोककल्याणाची तीव्र अपेक्षा धरून मिळविलेलें सात्त्विक ज्ञान. आणि तें मिळविण्यास तुम्हाला लहानपणापासूनच शिकलें पाहिजे.