सार्वजनिक कामगिरी 2
''हे लोक आतां नाकें मुरडताहेत, परंतु यांच्यावर रेड इंडियन लोकांचा एक हल्ला येऊं दे, म्हणजे माझ्या या स्वयंसेवकदलांशिवाय यांचें कोण रक्षण करील ? मग आपण होऊन मुकाटयानें या गोष्टीस संमति देतील. ''बेंजामिन यानें आपल्या पत्राद्वारें या विषयाची चर्चा केली. लोकांस ही गोष्ट पटली व स्वयंसेवकांचीं दलें स्थापन झाली. या सर्व पथकांचा नायक बेंजामिन यानेंच व्हावें असें लोक म्हणत होते. परंतु बेंजामिन म्हणाला, ''मी या कामास लायक नाहीं. ''असें म्हणून हें नायकाचें काम त्यानें दुस-या एका योग्य पुरुषाफिलॅडेल्फिया विद्यापीठ म्हणजे बेंजामिनचें तें एक अक्षयस्मारकच आहे. अशोकानें आपल्या एका स्तंभावर लिहिलें आहे कीं, ' लोकांस ज्ञानदान करणें यासारखें उदारपणाचें कृत्य दुसरें कोणतेच नाहीं. ' Learning is the greatest alms that can be given - ' शिक्षणदान हें महादान ' अशा अर्थाचें हें इंग्रजी वाक्य आहे. बेंजामिननें हें शिक्षणाचें महत्वाचें काम अंगावर घेऊन सुरूं केल्यावर त्यानें तदनुषंगिक दुसरी चळवळ होतीं घेतली. ती म्हणजे ग्रंथालयाची. प्रथम बेंजामिननें जो संघ स्थापन केला होता, त्या संघातील सभासद आपल्या जवळचे ग्रंथ एकमेकांस आणून देत. पुढें मासिक वर्गणी कांहीं तरी असावी असें ठरलें. शहरातील व्यापा-यांनीं पैसे दिले, ग्रंथालय स्थापन झालें. हीच संस्था वाढत वाढत आज तिला केवढें भव्य स्वरूप मिळालें आहे. या प्रचंड ग्रंथालयांत १ लाख ग्रंथ हल्लीं आहे. १६0 वर्षापूर्वीचे ४0 ग्रंथ यांत अद्याप आहेत. याप्रमाणें आपल्या या संघाच्याद्वारे लोकसेवा बेंजामिन करीत होता.
या सुमारास इंग्लंडमधील प्रख्यात धर्मोपदेशक व्हिटफील्ड हा अमेरिकेंत आला. हा मोठा धर्मोपदेशक ३४ वर्षे उपदेशकार्य करीत होता. जवळजवळ दर आठवडयास दहा याप्रमाणें ३४ वर्षे त्यानें व्याख्यानें दिलीं. त्याचा आवाज मेघगर्जनेप्रमाणें गंभीर होता. दा हजार श्रोत्यांसही त्याचें भाषण स्पष्ट ऐकूं जाई. त्याच्या व्याख्यानाचा परिणाम टिकाऊ होत असे. एखादा साधा शब्दही तो अशा भावनांनी उच्चारी कीं, तो ऐकून श्रोत्यांस रडूं कोसळे. व्हिटफील्ड इंग्लंडमधून अमेरिकेंत आपल्या आयुष्यांत १२ वेळां आला होता. ज्या वेळेस तो पहिल्यांदाच फिलॅडेल्फिया येथें आला त्या वेळेस मेथॉडिस्ट पंथी व्हिटफील्ड यास तेथींल प्रार्थनामंदिरात बोलावयास परवानगी मिळेना. त्याचीं मतें लोकांस कठोर वाटत; पापी लोकांसंबंधीचे विचार निष्ठुर असे वाटत. फ्रँकलिन फिलॅडेल्फिया येथें एक स्वतंत्र प्रार्थनामंदिर उभारण्याचा प्रयत्नास लागला. वर्गणी करून हें सार्वजनिक प्रार्थनामंदिर उभारलें गेलें. या प्रार्थनामंदिरांत वेल्सली, व्हिटफील्ड वगैरे उपदेश करूं लागलें. पुढें ज्या वेळेस शाळेमध्यें विद्यार्थ्याची संख्या वाढूं लागली, त्या वेळेस हें प्रार्थनामंदिर शाळेच्या उपयोगासाठीं म्हणून देण्यांत आलें.
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक प्रश्रांकडे वळला. या वेळेस अमेरिकंतील पूर्व किना-यांवरील ब्रिटिश वसाहतवाल्यास फ्रेंच व स्पॅनिश वसाहतवाल्यांची भीती होती. रेड इंडियन लोक हे सुध्दां फ्रेंचांचे मित्र होते. या रेड इंडियनांची स्वारी केव्हां येईल याचा नेमच नसे. इतर वसाहती संरक्षणार्थ कसून प्रयत्न करीत होत्या. परंतु फिलॅडेल्फिया ही वसाहत अगदीं शांत होती. येथें कशासच ठिकाण नव्हता. त्या वेळेस या सर्व ब्रिटीश वसाहतीचें एकीकरण झालेलें नव्हतें. प्रत्येक वसाहत आपापल्यापुरतें पाही. बेंजामिन यानें हा आत्मसंरक्षणाचा प्रश्र आपल्या संघासमोर मांडला. स्वयंसेवक - दलें निर्माण करावयाचीं, शस्त्रास्त्रें सिध्द ठेवावयाचीं, शिस्त शिकवावयाची, शस्त्रांचा उपयोग नीट शिकावयाचा वगैरे प्रश्र चर्चेत निघाले. या फिलॅडेल्फिया वसाहतींत लढाई करणें ही गोष्ट सैतानी व पापी समजत असत. येथील धर्मोपदेशक अहिंसावादी होते. परंतु बेंजामिन म्हणाला, "मी या कामास सायक नाही." असें म्हणून हें नायकाचे काम त्यानें दुस-या एका याग्य पुरुषास दिलें. १८ तोफा विकत घ्यावयाच्या असें ठरलें. हे पैसे सोडतीच्या साधनानें उभे करावे असें ठरून त्या द्वारें पैसे मिळविण्यांत आले. याप्रमाणें फिलॅडेल्फिया वसाहत इतर वसाहतींप्रमाणं आत्मसंरक्षण करण्यास समर्थ अशी त्यानें बनविली. ज्यामुळें सर्वाच्या मनोवृत्ति एक होतील असा एक राष्ट्रीय उपवासदिनही त्यानें सुरू केला.