Get it on Google Play
Download on the App Store

शिवकालीन दिनविशेष

पौष पौर्णिमा – राजमाता जिजाबाई जयंती (१५९८)

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम…जय जिजाऊ…जय राजे…

एक इतिहास अभ्यासक म्हणून नम्रपणे नमूद करावेसे वाटते की जिजाबाई जयंती ही पौष पौर्णिमेच्या दिवशी आहे असे सांगणारा एकही सबळ पुरावा उपलब्ध नाही. हे आमचे दुर्दैव आहे – पण वस्तुस्थिती सुद्धा आहे.

२ जानेवारी १६६१

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली.
मोरोपंत त्रिमल पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे.
या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा – खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच ‘पेशवे’ झाले (दि.०३/०४/१६६२).

मोरोपंत पेशवे पंतप्रधान – ते हेच. स्वराज्यस्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.

३ जानेवारी १६७१ 
सरदार जसवंतसिंग व महाबतखान यास औरंगजेबाने दख्खनवर स्वारी करण्याविषयी आदेश दिला

५ जानेवारी १६६४, मंगळवार

प्रसंग – सुरतेवरील पहिली स्वारी
शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, “इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.”
सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला.

५ जानेवारी १६७१

शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला.
साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली.

६ जानेवारी १६६४, बुधवार - सुरतेवरील स्वारी

सुरत लुटीचा पहिला दिवस.
सकाळी आकरा वाजता लूटीला सुरूवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. आख्खी जकात लूटली गेली. सुरतचा खुबसूरत सुभेदार इनायद खान “बहाद्दर” शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापार्‍यांना सहकुटूंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायतखानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळता भूई थोडी झाली.

६ जानेवारी १६६५ – सुवर्णतुला….

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते.
या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला. स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्‍या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा ! केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !
उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्‍या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
ही आमची संस्कृती आहे. “मदर्स डे” ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे. अभाग्या हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावा !
सोनोपंतांचे नाव आज खर्‍या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते.

६ जानेवारी १६७३

अनाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला.
शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सर्फराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते.

७ जानेवारी १६६४, गुरूवार (सूरतेवरील प्रथम स्वारी)

सुरतेच्या लुटीचा दूसरा दिवस. सकाळी दहा वाजता सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने वकिलामार्फत शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला. त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला.
ही घटना पाहणार्‍या स्मीथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यावर वृत्तांत सांगितला. इस्कालिअट या व्यक्तिने हा वृत्तांत लंडनला कळवला. त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जसाच्या तसा…..
“गुरूवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरूण मुसलमानाला शिवाजी बोलला की,
” या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुभेदाराला वाटते की काय?”
त्यावर, ” आम्ही पण बायका नाही; हे घे”
असे उलट बोलून तो तरूण शिवाजीच्या अंगावर खंजीर घेऊन धावला. त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसर्‍याने छाटला असताहि तो त्या भरात शिवाजीच्या अंगावर आदळून दोघेही कोलमडून पडले व शिवाजीच्या अंगावर दिसणार्‍या त्या खुनी मुसलमानाच्या रक्तामुळे शिवाजी मेला अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. पण तितक्यात शिवाजीने आपल्यास सोडवून घेतले व दूसर्‍याने त्या खून्याचे डोकेही फोडले. तेव्हा शिवाजीने तत्काळ कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्यांना समोर आणून उभे केले आणी मर्जीप्रमाणे हात, पाय, डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला. जेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला,
” त्यापेक्षा माझे डोकेच उडवा !”
शिवाजीने ते मान्य करून त्याची टोपिही डोक्यावरून काढून ठेवली गेली. पण शिवाजीला काय वाटले कोणास ठाऊक त्याने एकाएकी कत्तल थांबवली व स्मिथ वाचला. तोपर्यंत ४ डोकी व २४ हात कापले गेले होते. त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मिथ वखारीत पाठवण्यात आला.”
कसा भयंकर प्रसंग आहे हा ! गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले. महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या “परवानगीची” वाट न पाहता त्या मुसलमानाचा शिरच्छेद करून टाकला. समिती नेमणे ,पुरावे गोळा करणे, सज्जड दम देणे वगैरे भूरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते. दहशतवादाचे आव्हान अशाच प्रकारे संपूष्टात आणावे लागते.

८ जानेवारी १६५८ -

कल्याणहून शिवाजी महाराज जातीने माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी महाराजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली – भंडारगड – पळसगड , शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.

८ जानेवारी १६६४, शुक्रवार (सुरतेवरील पहिली स्वारी)

लूटीचा तिसरा दिवस.
इनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहारांत आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती, त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडतांच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती ‘ट्रॉय” शहरासारखी झाली होती. प्रचंड आग !
गुरूवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसा धुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते. शुक्रवारीहि आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लूटीला तर खंड नव्हता. लूटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही ते चालूच राहिले. रात्री मात्र लुटीचे काम जवळ जवळ संपत आले; तरीहि उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहानमोठी घरे पेटत होती.

१० जानेवारी १६६४, रविवार (सुरतेवरील प्रथम स्वारी)

शिवाजी महाराजांचे सुरतेहून प्रस्थान. महाबत खान सुरतेच्या रक्षणासाठी येत असल्याची खबर.

१० जानेवारी १७६०

दत्ताजी शिंदे बुर्हाडी घाटाच्या लढाईत पडले.

दताजी शिंदे खरच खुप महान लढवय्ये होते मरणाचा दारात आपल्या जीवाची भिक न मागता “बचेँगे तो और लढेँगे” हा त्यांचा मराठी बाणा वाखाण्याजोगा आहे आजही आपल्या समाजात एखादया गोष्टीत हतबल झालेला किंवा पराभव पत्कारावा लागलेला हेच गौरवदगार म्हणतो “बचेँगे तो और लढेँगे” धन्य ते दताजी शिँदे

११जानेवारी १६८०

खांदेरी दुर्ग बांधून झाला…

रायगड जिल्ह्यातील किल्ला आहे. भौगोलिक स्थान खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने
अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात
घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.

इतिहास
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकार्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला.
मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग- थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने
इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध
करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते; पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये
ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही. वार्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव्ह नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून सागरगडावर डांबले.
या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल- उथळ पाणी, मतलय वारे, इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली. मराठे रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान पोहचते करीत. इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्यावर अवलंबून असत. खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.

१३ जानेवारी

छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर जीवाजी महाले (संकपाळ) यांचा पुण्यदिन आहे….
जीवाजी महाले हे अफज़ल खानला जेंव्हा राजे भेटीला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत जे दोन अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे जीवाजी महाले आणि दुसरे संभाजी कावजी… जेंव्हा अफज़ल चा कोथला शिवरायांनी बाहर काढला तेंव्हा खानाचा अंगरक्षक सयाद्द बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध असताना धावून आला तेंव्हा त्या सयाद्द बंडाला धरतीवर
कायमचा झोपविनारा वीर म्हणजे जीवाजी महाले… अरे म्हणतात ना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी……….
तर अश्या नरवीर जीवाजी महाले यांच्या पुण्यदिनांनिमित्य विन्रंम आभिवादंन… !

१४ जानेवारी १६५८

कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवाजी राजे राजगडावर प्रथम राहावयास आले.
काय वाटले असेल राजगडाला ? कृतज्ञता ! गहीवर !! जन्माला आल्याचे सार्थक !!! राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला, तो हा दिवस. यापूर्वी शिवरायांची राजधानी होती – किल्ले पुरंदर.

१४ जानेवारी १७६१ पौष शु. अष्टमी. बुधवार, पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

“कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!”

पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहीत… करेंगे या मरेंगे… ह्या घोषणेपेक्षा.. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ही दत्ताजी शिंदे यांची बोली खुद्द महाराजांकडून आली होती. हा स्वराज्याचा मूलमंत्र होता…

१५ जानेवारी १६५६.

छापा घालून जावळी काबीच. हणमंतराव मोरे ठार. मग्रूर चंद्रराव मोरे जावळीतून रायरी उर्फ रायगडावर फरार. शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले. या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे.

१५ जानेवारी १९१९

राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्याँना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था सुरु केली.

१६ जानेवारी १६६६, पहाटे ३ वाजता…

शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावर पराभव. १००० मावळे ठार. शिवाजी महाराजांचे विशाळगडाकडे पलायन.
या घटनेने हिंदुपतपातशाहीतील समिकरणे बदलली. नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना वेळेवर कुमक करू शकले नाहीत, म्हणून नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले. कुडतोजी गुजरांना ‘प्रतापराव’ ही पदवी देऊन सरनौबती दिली.

१६ जानेवारी १६८१

संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती “हंबीरराव मोहिते” यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला.

१८ जानेवारी १६७५

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.

त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.”

१९ जाने १६८२

संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून देखील जंजि-याच्या घेऱ्यात मराठ्यांना प्रवेश मिळत नव्हता. या संबधी मुंबईकरांनी सुरातकरांना १९ जाने १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्या मधील नोंदीनुसार – ‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’. काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजि-या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून संभाजी राजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय केला. हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले. आणि याच दरम्यान औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले.

२० जानेवारी १६७४

दिलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी तो उधळून लावला. हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला ? काही माहिती उपलब्ध नाही. या लढाईत दिलेर खानाचे १००० लोक ठार झाले. सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत ठार झाले.

२० जानेवारी १६६३

औरंगजेब बादशहाचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला  उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब बादशहा आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.कल्याणजवळ पारसिक इथे किल्ला बांधण्याची तयारी संभाजीराजांनी सुरु केली असताना पोर्तुगीजांनी तिथे किल्ला बांधून पूर्ण केला.इतकेच नव्हे तर फिरंग्यांच्या प्रांतातून मोघालाना दिवसाढवळ्या रसद. पोहोचू लागली.  फिरंग्यांचा हा दुटप्पीपणा लक्षात येताच त्यांनी उतार कोकण या त्यांच्या मुलखातील गावे बेचिराख केली. मराठे आणि पोर्तुगीज यांच्या संघर्षाची ठिणगी पडली,सन १६८९ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून अल्व्हारो याची नेमणूक झाली होती

२१ जानेवारी १६६२

आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यातसामील करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी कोकण स्वारीस प्रारंभ केला

२३ जानेवारी १६६४ (शालिवाहन शके १५८५, माघ शु.५)

ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी,
ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्याच फर्जंद शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरले
महाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले.

शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ.स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून “सरलष्कर” ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.
शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही – या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ – आदिलशाही
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ – निजामशाही
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ – मुघलशाही
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ – निजामशाही
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ – आदिलशाही
पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान.

२५ जानेवारी १६६५

शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.

सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती.

सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल -
जेव्हा शाहजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना “पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे… आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा”

२६ जानेवारी १६७१ 
महाराजांना वेळो वेळी मोहिमेवर जावे लागे , अशा वेळी आईसाहेब सर्व राज्यकारभार पाहात असे , माञ अता आईसाहेब वुद्ध झालात . आईसाहेब राज्यकारभार योग्य रितीनी सांभाळात असे म्हणून अता त्याच्या मदतीस आजच्या ता . २६ जाने १६७१  रोजी संभाजीराजांची निवड महाराजांनी केली.

 

२६ जानेवारी १६७४
अकबर २६ जाने १६७४ रोजी तो आसदखाना बरोबर काबुलच्या स्वारीवर गेला .
शिवाजी महाराजांनी २६  जानेवारी रोजी ला पहाटे उंदेरीच्या आरमार जवळ आले .

२६ जानेवारी १६६२
शास्ताखान सोबत आलेल्या मोगली फौजेचे पवनमावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या परिसरात चढाया

२६ जाने १६४५ गुरूवार

रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकर्‍याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण शिवरायांच्या काही ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंग केला. चौरंग करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे सार्‍या मावळ खोर्‍यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमक शिवरायांच्या ठायी होती.

याच दिवशी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरूवात झाली..

२८ जानेवारी १६४५

शिवरायांनी रांझ्याचा पाटिल – बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली.

२८ जानेवारी १६४६

शिवाजीराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र.
रांझ्याच्या पाटलाचे तोडले हातपाय

२८ जानेवारी १८५१

दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन

२८ जानेवारी १६८१

शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे , दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला .

उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.

राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला.

रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले.

आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली .

३० जानेवारी १६८१

संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे लुटून अलोट संपत्ती मिळविली. त्यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूरचे दरवाजे बंद करून घेतले

 

१ फेब्रुवारी १६८९
मराठा इतिहासातील अत्यंत काळा दिवस
‘स्वराज्याचा दुसरा छत्रपती, शिवरायांचा छावा आणि आऊसाहेबांचा शंभूबाळ, छत्रपति संभाजी महाराज’ संगमेश्वरला संगमेश्वरला कैद झाले

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” या ऊक्तीला सदैव जागले ते महाराज. त्यांना अजुन थोडे आयुष्य लाभता इंग्रज, पोर्तुगीज, मुगल, हशबी आणि कोण कोण यांची पार धुलाई करीत, साता समुद्रापार त्यांना पोचवले असते. त्यांच्या विषयी पुर्ण माहीती फार कमी ऊपलब्ध आहे. पण श्री. विश्वास पाटील यांची ‘संभाजी’ नामक कादंबरी त्यांच्या जीवनावर बर्‍यापैकी प्रकाश टाकते. बालपणी लाभलेला जिजाऊंचा सहवास, त्यांच्याकडुन घेतलेले संस्कार व शिक्षण या पायावर ही कर्तुत्वाची विशाल ईमारत ऊभी राहीली. छत्रपतींनी पुरंदरच्या तहात त्यांना राजकारणात ओढले तेव्हा त्यांची उमर ८ वर्षांची, त्या वयात दिलेरखानाशी शाब्दीक चकमक करण्याचे चातुर्य, अभ्यास आणि धाडस त्यांच्यात होते. आग्र्यात बादशहाशी चतुर संभाषण, रायगडावरुन भरधाव घोडा फेकणे, भाल्याने वाघाची शिकार करणे, वडीलांच्या आज्ञेला अनुसरुन लाखो लोकांच्या रोषाला कारणीभुत ठरणे आणि मोगलांना मिळणे, पोर्तुगीजाच्या मागावर जाऊन संगमेश्वराच्या खाडीत भर प्रवाहात घोडा घालणे, जंजिर्‍यासमोर पद्मदुर्ग बांधणे आणि तिथुन जंजिर्‍यावर मारा करणे असे अनेक रोमहर्षक प्रसंग ह्या लढवय्याने जगले.
ह्या सार्‍या धामधुमीत सुध्दा त्यांचे कवीत्व जाग्रुत होते, संस्कृत (देवबोली) चा अभ्यास अव्याहत चालु होता.
सर्जा रणमर्द छत्रपती संभाजी महाराज्यांचा विजय असो.

२ फेब्रुवारी १६६१

शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते.
महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला ‘सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -’ असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला.
मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे ‘तुंगारण्य’. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती – २ फेब्रुवारी १६६१.
प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.

३ फेब्रुवारी १८३२

नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.

पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा.

४ फेब्रुवारी १६६०

कोकणातील दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले

४ फेब्रुवारी १६७५

शिवाजी महाराजांनी संभाजी राजांची रायगडावर मुंज पार पाडली.

फेब्रुवारी १६७०
नरवीर तान्हाजी मालुसरे लढता लढता धारातीर्थी पडले पण सिंहगडावर भगवा फडकावूनचं.

राजानी हा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती. तानाजीने पुरंदरचे युद्ध, प्रतापगडाचे युद्ध, राजांची कोकणातील मोहिम यावर चांगली कामगिरी केली होती. तो हजार पायदल हशमांचा सरदार होता. जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता. सिंहगडाची तानाजीला चांगलीच माहिती होती. त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची १६७० संध्याकाळ. या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी. चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता. त्या आधी मिट्ट अंधारच…!!
४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावल्यांसह राजगड सोडला. गुंजवणी नदी ओलांडली, सर्वजन विंडसई खिंडित पोचले. तोपर्यंत अंधार पडला होता. मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते. अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले. दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता. कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले. मात्र यावेळी कडा चढताना सहा मावले कड्यावरुन पडून मरण पावले. त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत. कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले. दोराच्या आधाराने सारे मावले वर आले अन घात झाला. उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय. एकच गोंधळ उडाला. चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता. गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले. काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले. थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते. सहाजिकच त्यांचा आवेश विलक्षण होता.

तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते. उदय भानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला. दोघानाही जखमा होत होत्या. उदयभानुच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली. आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला. मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला. उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता. थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले ……..
विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली……शेवटी काय
गड आला पण सिंह गेला……
आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि ५ फेब्रुवारी १६७० ची पहाट

५ फेब्रुवारी १६६४ नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान

६ जानेवारी – ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली. बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र.
वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.

५ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७

शिवाजी महाराजांचे भागानगर (हैद्राबाद) येथे आगमन. शिवाजी महाराजांची व कुतुबशाहाची भेट. एक महिना मुक्काम. (दक्षिण दिग्विजय प्रसंग)

माघ शुद्ध नवमी – दासबोध जयंती

माघ शुद्ध नवमी हा पवित्र दिवस आम्हाला खूप मोठी आणि शाश्वत देणगी देऊन गेला. आजच्या दिवशी समर्थ रामदासांनी शिष्योत्तम कल्याण स्वामींच्या शूभ हस्ते दास बोध लिखाणाचे काम पूर्ण केले. त्यामूळे हा दिवस दास बोध जयंती म्हणून ओळखला जातो. हे लिखाणाचे सत्कार्य शिवथर घळीत पूर्ण झाले. त्याची तेजस्वी आठवण म्हणून शिवथर घळीत दास बोध जयंती उत्सव दर वर्षी थाटामाटात साजरा केला जातो.

७ फेब्रुवारी १६९८

झुल्फिकार खानच्या ताब्यात जिंजी किल्ला आला.छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी जिंजीस वेढा दिला होता.

८ फेब १६६५

शिवाजी महाराजांनी पहिलीच आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बसनूर (वसुपूर कर्नाटक)या श्रीमंत शहराच्या रोखणे निघाली. स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील’बिदनूर’वर काढली. या मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.

८ फेब्रुवारी १६६५ माघ वद्य नवमी (दास नवमी)

संत रामदास स्वामींनी सज्जनगडावर समाधी घेतली.

उमरठ्याचे तानाजी राव मालुसरे सुभेदार म्हणजे एक बडे प्रस्थ. शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा मैतर. तानाजीरावांचे वर्णन करावे ते शाहिरांनीच ! इतरांना नाही साधायचे ते. सेवाचाकरीत अट नाही आणी निष्ठेत कधी फट नाही. सुभेदारांचा दरारा जगात राजगडावरील बालेकिल्ल्याइतकाच भारदस्त होता.
मुलाचे लगीन ठरवल्यानिमित्त राजास निमंत्रण देण्यास गेलेल्या रावांनी राजाची बेचैनी ओळखली. आउसाहेबांचे मनोगत ताडले आणि सिंहगडाच्या लगीनघाईचा मान आपल्या ताब्यात घेतला.
रावांचा डाव म्हणजे अस्सल हनुमंती डाव. घाल झडप की कर गडप. फुकटची मोगली मिजास दिसणार नाही त्यात. तानाजी रावांनी निवडली रात्र माघ वद्य नवमीची (दि.०४ फेब्रुवारी १६७०) !
सिंहगडाच्या पश्चिमेकडील डोणागिरीच्या कड्याजवळ तानाजी राव ससैन्य प्रगटले. दोघे जण सरसर करीत तो बेताल डोणागिरीचा कडा “जैसे वानर चढोन जाताती” तसे चढून गेले. वर जाऊन त्यांनी दोर सोडले. स्वतः तानाजी राव फौजेसह गडावर दाखल झाले.
इतक्यात उदयभान राठोड या मोगली किल्लेदाराच्या पहारेकर्‍यांनी हा हल्ला हेरला. गडावर एकदम हलकल्लोळ उडाला. तानाजी रावांनी गडावर जीव खाऊन कापणी चालवली. त्यांना ठावकी होते, की हा हल्ला फसला तर पुन्हा कधीही गडावर भगवा झेंडा लागू शकणार नाही. गडावर लगीन घाई उडाली. हिलालांच्या अक्षता उडू लागल्या. मशालींच्या पदन्यासात सिंहगड डोलू लागला. राजगडावरून ही सिंहगडावरची धांदल महाराज डोळ्यांत जीव ओतून बघत होते. आता मध्य रात्र उलटून गेली होती. चंद्र आस्मानी उगवला होता.
अन् उदयभान व तानाजी राव अचानक एकमेकांसमोर आले. दोघेही कमालीचे शूर. एकाच्या अंगी इंद्राच्या ऐरावताचे बळ होते, तर एकाच्या अंगी यमराजाच्या रेड्याचे बळ होते. दात खाऊन दोघेही रणास पेटले. चित्यांसारख्या झेपा टाकून एकमेकाला ठार करण्याचा यत्न करू लागले. अन् घात झाला. तानाजी रावांची ढाल तूटली. समयास दूसरी ढाल मिळाली नाही. कुठून येणार ? तानाजी रावांनी आपले भवितव्य ओळखले. त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडासे काढून ढाली सारखे धरले. व त्यावर घाव झेलू लागले. उदयभान चेकाळून उन्मादाने सुभेदारांवर वेगात घाव घालू लागला. घनगर्जन धडधडधडते, धुरा घालिती भरडत चिरडत. आणि उदयभानचा एक घाव खाडकन तानाजी रावांवर पडला. मरता मरता सुभेदारांनिही आपल्या ठेवणीतला एक अवघड वार वैर्‍यावर घातला. दोघेही धाडकन जमिनीवर पडले व गतप्राण झाले.

मराठ्यांमध्ये हाकाटी पेटली, “सुभेदार पडले, सुभेदार पडले” अन् मराठे रण सोडून पळत सुटले. सुर्याजीने ते पाहिले अन् त्याचे काळीजच मुळी थरारून गेले. मिट्ट काळोखात सुर्याने आपले तेज प्रगट केले. कडक शब्दात त्यांनी सैन्याची हजेरी घेतली. ” अरे तूमचा बाप इथे मरून पडला आहे, अन् तूम्ही नामर्दासारखे पळून चालला आहात ? आऊ साहेब काय म्हणतील ? मागे फिरा ! मी तो दोर केव्हाच कापून काढला आहे. एकतर कड्या खालते उड्या मारून जीव द्या, नाही तर वैर्‍याचा जीव घ्या !”
आणी काय आश्चर्य ? सुर्याजी रावांनी फुटलेले धरण सावरले. मराठ्यांनी कडोविकरोळीचे रण मांडले आणि सिंहगड जिंकला.
महाराजांचा अन् आऊसाहेबांचा लाडका सिंहगड. जिथे उमरठ्याच्या तानाजी राव सुभेदारांनी आपले रक्त सांडले व जीव अर्पण केला. तीर्थक्षेत्र सिंहगड ! जिथे आपले अभागे हिंदू प्रेयसीच्या गळ्यात मिठ्या घालून बसतात. जिथे दारूच्या अड्याची मैफल अन् जुगाराचा फड सजतो. जिथे रेव्ह पार्टिची बदफैली साजरी होते. आमच्या अधःपतनाची सुद्धा कमाल आहे ! तीर्थक्षेत्राचे मोल आम्ही कधी जाणलेच नाही.

९ फेब्रुवारी १६८९

औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजीमहाराजांना कैद केल्यानंतर रायगडच्या किल्ल्यावर महाराणी येसूबाई व किल्ल्यावरील मराठे सरदारांच्या सल्ल्याने राजाराम- महाराजांनी मंचकारोहण केले. स्वराज्याचे ३ रे छत्रपती राजाराम महाराज ह्यांचा राज्याभिषेक दिन.

९ फेब्रुवारी १६६५

शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे ‘बसनूर’ छापा घालून लूटले. महाराजांनी बसनूरवरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली. राजाने नौकाप्रवास करून सागर उलंघू नये ही हिंदू धर्मातील खूळचट रूढी उडवून लावली. शिवराय किंवा सावरकर काय ! दोघेही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते, पण धर्मातील खूळचट रूढींना दोघांनिही आपल्या चरित्रात मूळीच थारा दिला नाही.

१० फेब्रुवारी १६७१

सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती.

१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.
१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.
जंजिऱ्या च्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्या वरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला, जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तराफा जंजिऱ्याच्या सभोवती तरंगत तरत्या तोफखान्याचे काम करत होत्या. सिद्दि संबूळ जो ह्या वेढाच्या वेळेस वेंगुर्ल्याच्या बाजूस गेला होता तो आपल्या आरमारासह परतला पण मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला.
ऑगस्ट १६७६, मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या-मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता, तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला, जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी. विचार अगदी घातकी होता पण अजून उपाय तरी काय होता. तरीही बरेच प्रश्न पुढ्यात होते. तटावर शिड्या कश्या लावायच्या? कुणी लावायच्या? तटाखालच्या समुद्राचे काय? तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसे कसे पोहोचवायचे?
लाय पाटील ह्याने हा मनसुबा,ही जबाबदारी स्वतः वर घेतली. लाय पाटील ह्याने तटावर शिड्या लावून द्यायच्या व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारां बरोबर लहान होड्यां मधून शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटाजवळ ते पोहोचले. अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लाय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता मोरोपंतांच्या तुकडीचा. वेळ भरभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील ह्याचा नेम नव्हता. अशक्य कोटीतली कामगिरी तर लाय पाटलाने निभावली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली, शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असतेच पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लाय पाटील आणि त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आला. नेमका काय घोटाळा झाला? कोणाची चूक होती? हे केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. माहाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास “पालखी” असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा. थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.

२४ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्र – प्रतापराव गुजर पुण्यतिथी

मराठ्यांच्या गनिमी काव्याने स्वराज्यावर चालून आलेला बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे प्रतापराव गुजर या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली व तो गनीम जिव वाचवून गेला.

पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणाऱ्या बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांची पत्र पाठवून कानऊघडणी केली.
“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.
भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका.
सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव !
शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका
बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.”

 

तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते, महाशिवरात्रीचा दिवस उगवला. प्रतापराव गुजर हे विसाजी बल्लाळ, दीपोजी राउतराव, विट्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धि हिलाल, विठोजी शिंदे या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय.
काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतीचा मुजरा झडणार नव्हता, का  तर “बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता.
बहलोलखानाच नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या, विजेच्या चपळाईने प्रताप रावांनी घोड्यावर मांड टाकून टाच मारली. ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले.

फक्त सात. हो फक्त सात! सात घोडेस्वारांची मात चालली होती काळावर. जणू सुर्यरथाचे सात अश्वच पृथ्वी गिळंकृत करण्या करता सुसाट वेगाने निघालेले होते.
बहलोल खानाने घटप्रभा नदी ओलांडली. नदी ओलांडल्यावर त्याला व त्याच्या फौजेला अपरंपार आनंद झाला. कारण ते आता शिवाजीच्या मुलखात घुसत होते. शिवाजीच्या मुलखात त्यांच्या घोड्याची टाप पडत होती. त्याचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे आघाडीला फडकत होते. उंटांचा व घोड्यांचा रिसाला दोन बाजूंनी दौडत सुटला होता. स्वतः बहलोल खान हत्तीवर बसला होता. आपल्या फौजेला जोश देत होता.

अन् अचानक प्रतापराव बहलोल खानावर तुटून पडले, विसाजी बल्लाळ, दीपोजी राउतराव, विट्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धि हिलाल, विठोजी शिंदे.. या आपल्या ६ जणांच्या “प्रचंड सैन्यानिशी” आणी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली. नेसरीचे तीर्थ क्षेत्रात रूपांतर झाले.

१३ फेब्रुवारी १६६०

शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस ‘गिफर्ड’ व त्याचा माल सोडून दिला.

१७ फेब्रुवारी १७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी जिजाबाई (करवीर)यांचे पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर)येथे निधन

 

१७ फेब्रुवारी १७७४
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर रघुनाथराव हे पेशवे झाले

१९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वद्य तृतीय, शुक्रवार
राजमाता जिजाऊ आणि शाहजीराजे यांच्या पोटी किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला.
शिवरायानी आपल्या आतुलनीय पराक्रमाद्वारे आणि बुद्धिकौशल्याचा बलावर प्रस्थापित सर्व पातशाह्याना उपडे करत, यवनांचा जुल्मी राजवटीला चोख उत्तर देत, सुल्तानांचा छाताडावर स्वराज्याचा भगवा झेंडा रोवला. या साम्राज्याचा पाया इतका मजबूत होता की नंतर संपूर्ण भारतभर याला कोणी आव्हान देवू शकले नाही. ज्या दिल्ली दरबारात महाराजांचा अपमान झाला होता, त्याच दरबाराला पुढे या सम्राज्यासमोर झुकावे लागले. जो दरबार महाराजांचा जिवावर उठला होता, त्याच दरबाराला पुढे स्वतःच्या प्राणंचा रक्षनासाठी या साम्राज्यसमोर गुडघे टेकावे लागले. इस्लामी आक्रमण स्वराज्याने नुसते पचवलेच नाही तर कटक ( दक्षिण भारत ) पासून अटकेपर्यन्त (पाकिस्तान ) या साम्राज्याचा विस्तार झाला. स्वराज्यमंदिराचा पाया शिवाशाहित घातला गेला तर पेशवाईत त्यावर कलस चढविला गेला.
शिवरायांचा युद्ध कौशल्याचा सर्वात महत्वाच गुण म्हणजे उपलब्द्ध साधनांचा पुरेपुर उपयोग, कोणतेही युद्ध खेलताना पुरेपुर नियोजन, सुसुत्रता, शत्रुचा कच्चेदुवे-बलस्थानाची संपूर्ण माहिती, धाडस, आणि परिस्थितीनूसार स्वतः नेत्तृत्व करुन कमीतकमी स्वताची हनी करुन जास्तीतजास्त शत्रु सैन्याचे नुकसान करणे.
शिवाय, धोरणी व मुत्सद्दी राजनीतीतज्ञ, संघटनकुशल, उत्तम प्रशासक, दूरदर्शीपणा व त्याला आभ्यासाची जोड़ हे सारे गुण त्यांच्या व्यक्तीमत्वात एकवटले होते. आपल्या याच अलौकिक व्यक्तिमत्वाने त्यानी उत्तम स्वामीनिष्ठ / स्वराज्यनिष्ठ सेवकांची संघटना बांधली.

२१ फेब्रुवारी १६६५ (रात्री)

कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवाजी महाराज छापा घालणार असल्याची खबर. इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ला भर रस्त्यावर ठार मारले होते कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.

२१ फेब्रुवरी १७०७

औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू. खुल्दाबाद येथे कबर.

श्री शिवछत्रपतिंच्या मृत्यूनंतर दख्खनेमध्ये उतरलेला मुघल पादशहा अखेर २७ वर्षे झूंझुन महाराष्ट्राच्या माती मध्येच दफ़न झाला.

२२ व २३ फेब्रुवारी १६६५

शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली.

२३ फेब. १७३९

चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.

चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

२४ फेब्रुवारी १६६५

मग मात्र शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, ” आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !”
नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस “तिथीने” साजरा झालेला होता.

२४ फेब्रुवारी १६७०

छत्रपति शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी “सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब” यांना पुत्र लाभ झाला,”रामराजे” नाव ठेवण्यात आले,रामराजे पालथे उपजले,राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले…
राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले.
“रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील.”

२४ फ़ेब्रुवारी १६७०
राजगड येथे शिवबा राजेंच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी राजाराम यांचा जन्म .

पालथे जन्मल्यामुळे राजांनी “पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले …! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील … !” असे उद्गार काढून अशुभ शंकेचे सावट दूर केले.

पुढे १६८९ मध्ये श्री शंभू छत्रपति महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.

२४ फ़ेब्रुवारी १८१२
पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग

२४ फ़ेब्रुवारी १६७४
कुड्तोजी म्हणजेच मराठ्यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना नेसरी येथे वीरमरण आले आणि पुन्हा एकदा मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हाच संदेश जगाला दिला..!!  बेहलोल खान नावाच्या बांडगुळाला पुन्हा पुन्हा माफ करून सुधा परत स्वराज्यावर चालून आल्यामुळे सातच मराठ्यांनी त्यावर हल्ला केला..!!
याच पराक्रमाचे वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात “वेडात मराठे वीर दौडले सात”

२५ फ़ेब्रुवारी १८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब. ला चाकणचा किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.

२७ फ़ेब्रुवारी १७३१

शाहू महाराज (सातारा गादी) आणि संभाजी महाराज (कोल्हापुर गादी ) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

२ मार्च १६६०

सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. .

२ मार्च १७००

औरन्गजेबाने शंभुराजांची अमानुष हत्या केली…आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं…

पण घडलं भलतचं….शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला…राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरन्गजेबाला टक्कर देवू लागले…दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले…

या काळात राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली…मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते…म्हणून राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले…वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले..संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले…आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले..

मुघलंनी जिन्जिला वेढा दिला…पण राजाराम पसार होवून विशालगडावर गेले…तेथून सातारा,कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या..महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते.. त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता..परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही.. २ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मरण पावला..निधन झाले तेंव्हा राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिन्धुदुर्गावर शिवरायांचे मंदिर उभारन्यात आले.

२ मार्च १८१८

इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्र्यात आल्यवर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.

३ मार्च १६७९

मोरोपंत पेशव्यांनी विजापूरकरांकडून कोप्पळ जिंकले.

३ मार्च १६६५

मोगल सरदार मिर्झाराजा १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहिस्तेखानाची बोटे कापली, सुरत बेसुरत केली आणि त्यावर पत्र पाठवून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळविले, आता औरंगजेबाला सर्वात जिगरबाज सरदार दख्खन मध्ये पाठवणे भाग होते.

३ मार्च शिवजयंती – फाल्गुन वद्य तृतीया (शके १५५१)

शिवजयंती.
हिंदुपदपादशाहीच्या ‘मंत्राची’ जयंती.
जिजाऊ आऊसाहेबांच्या ‘शिवबाची’ जयंती.
तानाजी रावांच्या ‘मैतराची’ जयंती.
बाजी प्रभूंच्या ‘प्राणाची’ जयंती.
कवीराज भूषणाच्या ‘सरजा शेर शिवराजाची’ जयंती.
सह्यदेवतेच्या अन् दर्या भवानीच्या ‘उपासकाची’ जयंती.
समर्थ रामदास स्वामींच्या ‘शिवकल्याण राजाची’ जयंती.
शंभुबाळाच्या आबासाहेबांची ‘म्लेंछक्षयदीक्षितांची’ जयंती.
राष्ट्रपुरूषाची जयंती.
“राष्ट्रपित्याने” वर्णिलेल्या ‘वाट चूकलेल्या देशभक्ताची’ जयंती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुनृसिंहाची’ जयंती.
शाहिराच्या डफावर कडाडणार्‍या वीररसाची जयंती.
कलियुगातील भगिरथाची जयंती.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानच्या अस्मितेची जयंती.
छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती.
नव्हे – नव्हे ही तर महाराष्ट्र मनाच्या महादेव ईश्वराचीच जयंती

४ मार्च १६६०

सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला. शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले.

४ मार्च १८१८

विसापूरचा किल्ला कर्नल पर्थारणे तोफा डागून उध्वस्त केला. आज किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे .

५ मार्च १६६६, सोमवार

औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!!

६ मार्च १६७०

जिंका आदेश दिधला शिवभूपातींनी (कोंडाजी फर्जंद)

६ मार्च १६७३, रात्री

महाराजांचा अतिशय आवडता व तेवढाच महत्वाचा पन्हाळगड अद्यापपावेतो स्वराज्यात आलेला नव्हता. कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फर्जंद हे केवळ साठ जवानांसह गडाचा कडा चढून गेले आणी त्यांनी आदिलशाही फौजेवर त्या काळोख्या मध्यरात्री हल्ला चढविला. किल्लेदार ठार झाला ! गड मिळाला ! महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची अस्मानी फते झाली.

७ मार्च १६४७

शिवाजी महाराजांचे राजकारणातील, विद्येच्या प्रांगणातील व क्षात्रकारणातील गुरू दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.

७ मार्च १६६५

सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करित बसला होता. त्याने शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंत सिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.

८ मार्च १६७०

पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला.

ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.

पौर्णिमा शके १५८६ : कारवारहून इंग्रज मास्टर ह्याने चैत्र शुध्द ८ शके १५८७ मधील सुरतेला लिहिलेल्या पत्राच्या आधारें छत्रपतीशिवाजीराजे गोकर्ण महाबळेश्वर येथें होते.
शके १५९१ : छत्रपतीशिवाजीराजे ह्यांची कनिष्ठ धर्मपत्नि राज्ञी सोयराबाईसाहेब ह्यांना राजारामराजे पुत्र झाला.
शके १५९२ : सिद्धी कासीमने दांडा – राजपुरीवरील छत्रपतीशिवाजीराजांचा दारू कोठार असेलेला सामराजगड घेतला.

९ मार्च १६५०

तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१ प्रथम प्रहर.

९ मार्च १६७३

कोंडाजी फर्जंदांनी जिंकलेला पन्हाळगड पाहण्यासाठी शिवाजी महाराज प्रतापराव गुजरांसह रायगडाहून निघाले.

१० मार्च १६७३
रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा.

 

१० मार्च १६७७
५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.

१० मार्च १६७९
शिवाजी महाराजांचे सरदार थोरले आनंदराव यांनी विजापूरकरांकडून बाळापूर जिंकले.

१० मार्च १७०४

औरंगजेबाने स्वतःच्या ८९ व्या वाढदिवशी तोरणा उर्फ प्रचंडगड जिंकला.

११ मार्च १८१८

कर्नल पोर्थेरणे कोरीगडावर हल्ला केला, ४ दिवसांनी दारू कोठार तोफेने नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

११ मार्च १६८९ – छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस … !

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला छत्रपति संभाजी महाराजांचा वधु – तूळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला.

१ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. बहादुर गड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्या दिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. अखेर शेवटी ११ मार्च १६८९ ला धर्मं आणि राज्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.

११ मार्च १८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला.

४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

१४ मार्च १६४९

शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ – २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१५ मार्च १६६१
शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या.

१५ मार्च १६६५
मिर्झा राजे व दिलेरखान पठाण यांनी पुण्याहून पुरंदराकडे कूच केली.

 

१५ मार्च १६७०
शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.

१५ मार्च १६८०
राजाराम महाराजांची मुंज व लग्न. मुलगी वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई / ताराबाई. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.

फाल्गुन अमावस्या – छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी

हिंदुं नववर्ष दिन. उद्याच्या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची ‘याद’ मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना – काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी – भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.
अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.
कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. “दीन दीन” “अल्लाहो अकबर” च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे ‘हलाल’ करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो…..!!!
शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून २ साधी फुलेही वाहात नाही.
उलट आमच्यातीलच काही हिंदु तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही आभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत. आम्हाला क्षमा करा. आम्हाला नर्कातही जागा मिळणार नाही….आम्हाला क्षमा करा.

१५ मार्च १६६९
पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे समान देवून. त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले ते लग्न १५ मार्च १६६९ ला झाले

१६ मार्च १६७३

शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. कोंडाजी फर्जंदाने नूकताच काबीच केलेला पन्हाळगड !
गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकेनिवीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले. दक्षिण दरवाजावरील भालदारांनी ललकार्‍या दिल्या. गडावरचे झाडून सारे स्त्रीपुरूष त्यांचे उत्साहाने स्वागत करीत होते व दर्शन घेत होते.
नंतर महाराजांनी संबंध गडाचे अति प्रेमभराने दर्शन घेतले. कोंडाजी फर्जंदाचे व गड जिंकणार्‍या सर्व चित्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक कौतूक केले. त्यांना सर्वांना खूप खूप धनदौलत देऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांची धाडसी करामत पाहून महाराजांना धन्य धन्य वाटले अन् असा मायावंत राजा मायभवानीने आपल्याला दिला म्हणून त्यांही सर्वांस धन्य धन्य वाटले.

१२ वर्ष नंतर पन्हाळा स्वराज्यात सामील झाला. त्या नंतर शिवाजी महाराज पन्हाळ्या वर पोहचले. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने जिंकला.

१७ मार्च १८६३

दिन दलितांचे कैवारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन

नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी जन्मलेले गोपाळ काशीराम गायकवाड, बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्यामध्ये दत्तक म्हणून गेले. पुढे ते महाराजा सयाजीराव गायकवाड नावाने उदय यास आले.  सयाजीराव एक प्रजाहितदक्ष, आदर्श, लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी आपल्या छोट्याश्या संस्थानात विविध सामाजिक सुधारणा केल्या. काळाच्या पुढे असणारे राजे म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला.
सयाजीरावानी न्यायव्यवस्थेत सुधारणा केली, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब, गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण व कला शिक्षणाची सोय, संस्कृत ग्रंथ प्रदर्शन, दलितांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण याचबरोबर स्त्रियांना वारसा हक्क, बालविवाह बंदी, विधवा विवाह, कन्या विक्रीय बंदी अशा असंख्य सुधारणा त्यांनी घडवून आणल्या आणि आपल्या संस्थानात स्त्रीमुक्तीची पहाट घडवून आणली. प्रगाढ विचारवंत आणि अत्यंत पुरोगामी असणाऱ्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थानही भूषविले. १८८६ साली एका समारंभात सयाजीरावानी मुंबई येथे ज्योतीराव फुलेना महात्मा ही पदवी बहाल केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली. अशा या लोकमंगल राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ साली निधन झाले.

१८ मार्च १६७९

मराठ्यांनी विजापूरकरांकडून बहादूरबिंडा जिंकले.

१८ मार्च १६८०
सर्जाखानाला विजापुरी सेन्याचा मुख्य सेनापती केले .
.
१८ मार्च १६८८
हरजीराजे महाडिक ञिणामल्लीहून कंचीवर गेले .

१९ मार्च १६४६

शिवाजी महाराजांनी पुण्यात कसबा गणपतीचा जिर्णोद्धार करून, मंदीरास नंदादीप दिला.

१९ मार्च १६७४

शिवरायांची धाकट्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा रायगडावर मृत्यू.

२० मार्च १६६६

नेतोजी पालकर मिर्झाराजांच्या विनंतीमुळे विजापूरकरांना सोडून मोगलांना सामील.

२१ मार्च १६८०

शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले

२२ मार्च १६८२ – तब्बल पाच वर्षे मराठ्यांची झुंज

औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.
त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला – रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !

संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे उधळून लावले.

किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.

किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले रामसेजच्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले.

इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.

संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुर खानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. ७००० मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.

मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव  अचूक ओळखला.

ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगारे, नौबती, कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येऊ लागले आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.                                        बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.

बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वार झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता. रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार, त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासालाच्या पानात सापडत नाही हे दुर्दैव. त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.

किल्लेदाराच्या आणि मराठ्यांच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले.

(डॉ. कमल गोखले लिहितात की या किल्लेदाराचे नाव होते रंभाजी पवार)

२२ मार्च १७५५

इंग्रज – पेशवे यांचा तह. यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.

२३ मार्च १६७८

ऑक्टो १६७६ मध्ये महाराजांनी दक्षिण स्वारीसाठी प्रस्थान केले. महाराजांनी शंभूराजांवर प्रभावळीचा कारभार सोपवला. आणि जे घडायला नको होते ते आक्रीत घडले. स्वतःचे वडील आणि राज्याचे राजे श्रीशिवछत्रपती हयात असताना शंभूराजांनी स्वत:स शृंगारपुर येथे कलशाभिषेक करवून घेतला. एवढे मोठे पाऊल उचलताना कवी कलश हे शंभूराजांसोबत होते.

दि. २४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७

दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम. भाग्यनगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्रस्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास ‘श्री शिवाजी गोपुर’ असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.

२५ मार्च १६८९

झुल्फिकारखानने मराठ्यांच्या राजधानीस (रायगडास ) वेढा दिला.

२७ मार्च १६६७

मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली.

नेतोजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले.

जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला ‘प्रतिशिवाजीची’ आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या ‘मुहंम्मद कुलीखानास’, दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.

१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

२८ मार्च १६७०
आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी उठवलेल्या वादळी झंझावताला रोखण्यासाठी औरंगेबाने दाऊदखानाला दक्षिणेत धाडले टो २८ मार्च रोजी नगरला पोहचला

२९ मार्च १६६७

सिंधुदुर्ग पूर्णत्वास आला

३० मार्च १६४५

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे – कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर
आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले.
हे फर्मान छ ११ सफर सु || खमस अर्बैन अलफ म्हणजे ३० मार्च १६४५ यां तारखेचे आहे

जी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. ‘हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे’ या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढविले.

३१ मार्च १६६५

मिर्झा राजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु.

 

१ एप्रिल १७३१

श्रीमंत सरसेनापती त्रिंबकराव खंडेराव दाभाडे डभोईच्या युद्धात धारातीर्थी पडले.

१ एप्रिल १६७३

मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला.
पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड.
सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे.
पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग. मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले ‘नवरसतारा’. पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा ‘सज्जनगड’ म्हणून नामकरण विधी केला.

२ एप्रिल १६७९ जिझिया कर

आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय? असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण “अकबराने जिझिया कर बंद केला” इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्‍या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन “जिम्मी” म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
शेख हमदानीने लिहिलेल्या “जसीरात-ए-मुल्क” प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.
१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.
२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.
३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.
४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.
५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.
६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.
७) त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.
८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.
९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.
१०) अंगठी वापरू नये.
११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.
१२) त्यांनी जुना पोषाख बदलू नये.
१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.
१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.
१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.
१६) त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.
१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.
यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्‍याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.

२ एप्रिल १६७९

दिलेरखान व संभाजी राजांचा भूपालगडावर कब्जा. ७०० मराठ्यांचे हात तुटले.

संभाजी राजे या कालखंडात दिलेरखानास मिळाले होते. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान.

भूपालगडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.

शंभू राजानी फिरंगोजी नरसाळे यांना एक पत्र धाडले होते त्यात लिहले होते की “स्वराजाचा युवराज म्हणून किल्ला खाली करण्याची अर्जी करत आहोत.” (उल्लेख “स्वराजाचा युवराज” म्हणून केला होता दिलेरखानचा सरदार म्हणून नाही)

फिरंगोजी नरसाळे यांनी संभाजी राज्यांविरूद्ध त्यांनी तलवार उचलली नाही.

भूपालगड संभाजीराज्यांच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच सर्व गडांवर निरोप धाडले की संभाजीराजे जातीने आले तरी तलवार चालवणे. गड ताब्यात न देणे.

इकडे, आजू बाजूच्या परगण्यातील मराठ्यांना या हल्ल्याची माहिती कळाली तर ते मदतीस येऊन पोहोचतील या भीतीने दिलेरखानने  लगेच इखलासखान, जसवंतसिंग बुंदेला व रशीदअली रोशनाई यांना रक्षणाकरिता नामजाद केले, किल्ल्यावरील सर्व मनुष्यास कैद केले गेले.

जी ७०० मावळे कैद झाले होते त्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यास सोडून दिले, बरीच मनुष्ये गर्दीत ठार झाली.

यानंतर दिलेरखानाने आपला मोर्चा विजापुरकडे वळवला. त्याच्या जवळ २० हजार फौज होती. विजापूरला त्याने डिसेंबर १६७९ मधे विजापूरला वेढा घातला पण विजापूरकरांनी दिलेरखानास चांगला प्रतिकार केला

२ एप्रिल १७२०

छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले पेशवे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ यांचे सासवड येथे निधन झाले.

सरुवातीला बाळाजी विश्वनाथ यांनी रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा “अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी” स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होते. १७०५ च्या दरम्यान त्यांनी देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजी विश्वनाथना पुण्याची सुभेदारी मिळाली,  १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे –

“श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।”

३ एप्रिल १६६२

मोरोपंत पिंगळे हे आतापर्यंत मुजुमदारी करीत होते. त्यांची ही मुजुमदारी निळोपंत सोनदेवांस दिली. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पेशवे पद दिले.

३ एप्रिल १६६७

आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला.
आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.

३ एप्रिल १६८०- चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२

शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते,तारणहार राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मी अलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापी महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले.. ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक,अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम..

 

अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय
पण गद्दरानो ख़बरदार,हा झंझावत पुन्हा जागृत होईल,
लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल,
ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल .व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल..
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय

४ एप्रिल १६७०

नगर मध्ये मराठे घुसलेले पाहून दाऊदखान कुरेशी हा खानदेशातून त्वरेने अहंमदनगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
मग नगर मध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊद खान त्यांच्या मागे हात धूऊन पळत सुटला. जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पूरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.
पुढे दाउद खान नगरहून औरंगाबादेस गेला आणि मराठे पुन्हा नगरमध्ये घुसले व त्यांनी तेथील ५१ गावे लुटली.

४ एप्रिल १७७२

पेशवे माधवराव यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिहरेश्वर येथे गेल्या.

एप्रिल१६६३
शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली.
सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती. ५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस.
चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले
महाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा
असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned
ऐन मध्यरात्र.
…सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला.
आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.
या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते.
रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते.
सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.
दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले…

५ एप्रिल १७१८

मराठा सरखेल ‘कान्होजी आंग्रे’ यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.

पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. “तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही.”

६ एप्रिल १७५५

पेशव्यांनी (खरे तर इंग्रजांनी) तूळाजी आंग्रे याच्याकडून फत्तेगड आणि कनकदुर्ग जिंकुन घेतले.

२२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज – पेशवे तहाप्रमाणे इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.

७ एप्रिल १८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.

८ एप्रिल १६५७

२७ वर्षीय शिवाजीराजे यांचा जाधवरावांच्या काशीबाई यांच्याशी विवाह.

 

८ एप्रिल १६६३

नबाब शाईस्तेखान पुणे सोडून औरंगाबादला बोंबलत गेला.

८ एप्रिल १६७४

चिपळूण येथे शिवाजी महाराजांनी लष्कराची पाहणी केली.

राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद हंभिरराव मोहिते यांस बहाल.

८ एप्रिल १६७८

‘दक्षिण दिग्विजय’ मोहिम जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांचे पन्हाळगड येथे आगमन.

८ एप्रिल १७८३

आनंदराव धुळूप यांनी इंग्रज आरमाराविरुद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.

९ एप्रिल १६३३

मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.

९ एप्रिल १६६९

उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात.

सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला या पाशवी हुकुमाने जणू निसर्ग थरारला होता.

९ एप्रिल १६७०
औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा ही ९ एप्रिल १६७० ला वारली.

९ एप्रिल १६६०
पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तशामखान हा मेला; यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली.

१० एप्रिल १६६०

राजापूरचा प्रसंग विसरून इंग्रज पन्हाळ्याच्या वेढ्यात मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात ब्रिटिश निशाण उभारून स्वतःच्या तोफा डागायला सुरूवात केली.

१० एप्रिल १६९३

१६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज ‘जिंजी’ (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते.

तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी कोल्हापुर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.

११ एप्रिल १७३८

वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय ‘डेम लुइ बोतेलुइ’ याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी ‘पेद्रा दे मेलु’ याची नियुक्ती.

१२ एप्रिल १७०३

मुघल फौजांचा सिंहगडावर तोफांचा मारा सुरु. औरंगजेब स्वतः जातीने सिंहगड जिंकून घेण्यास हजर.

१३ एप्रिल १६६३

नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले. ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले.

१३ एप्रिल १७०४

संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकड़े निघाला.

१३ एप्रिल १७३१

छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.

१३ एप्रिल १७००

राजाराम राजे जाउन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिल च्या पहाटे मोग्लांनि किल्ल्याच्या तटा खली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले.

गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

१४ एप्रिल १६६४

जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.

१४ एप्रिल १६६५

इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता.

१४ एप्रिल १८९५

लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने रायगडावर पहिला २ दिवसीय शिवस्मरण दिन साजरा.

१५ एप्रिल १६७३

स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.

प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले.

आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची.
राजांनी प्रतापराव गुजरांना चांगलेच फ़ैलावर घेतले. “सरसेनापती असूनही हा कोणता न्याय केलात? हाती आलेल्या गनीमास धर्मवाट दिलीत? गनीमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका”.
होय, राजांचे शब्द म्हणजे अंगार होते. एखाद्या निखार्‍याप्रमाणे ते शब्द रावाच्या कानांमध्ये घुसले.प्रतापरावाचा विजयाचा उन्माद क्षणात मावळला आणि बहलोलखानाला पराभूत करण्यास नव्या जोमाने योजना आखू लागला.

१५ एप्रिल १६४५

शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या १५ एप्रिल रोजी, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवाजी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली.

१५ एप्रिल १६६७

शिवाजी राजे आणि पुतळाबाई यांचा विवाह.

१५ एप्रिल १७३९

वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.

१६ एप्रिल १६४०

शके १५६२ विक्रमनाम संवत्सरी वैशाख शुद्ध पंचमीस म्हणजे गुरुवार दि. १६ एप्रिल १६४० रोजी निंबाळकर पवार घराण्याच्या सईबाईंशी शिवाजी महाराजांचे पहिले लग्न झाले.

१६ एप्रिल १७७५

आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.

१७ एप्रिल १६७५

फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपति शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.

१७ एप्रिल १७२०

बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.

१७ एप्रिल १७३९

छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट.

१८ एप्रिल १६७७

त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन.

आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार, सोमवार २० ऑगस्ट १६६६ रोजी फुलौतखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून ‘ब्र’ ही निघाला नाही. जर बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.

या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले , कुठे गेले , कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल , छळवणूक.

या दोघांची सुटका कशी करता येईल , याची चिंता महाराज करीत होते.

महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. त्यातील मुख्य विषय असा की ,

‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘

औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्याने त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.

सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल?  येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता , ना सांगता , ना दाविता , अनुभव चित्ता चित्त जाणे! १८ एप्रिल १६७७ रोजी त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले.

१८ एप्रिल १७०३

महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता.

१८ एप्रिल १७७४

पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरावर जन्म.

त्यांचा अधिकारकाळ इ.स. १७८२ – इ.स. १७९५ हा इतका होता , त्याचे पूर्ण नाव माधवराव नारायणराव भट (पेशवे) त्याचा जन्म इ.स.१७७४ १८एप्रिल रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.

हे मराठा साम्राज्याचा पेशवा, अर्थात पंतप्रधान होते. यानी इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरावाचा हे पुत्र होते.

सातारा दरबाराच्या संकेतांनुसार पदारूढ पेशव्याचा पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे, माधवराव नारायणाचा पेशवेपदावर कायदेशीर त्याचा हक्क होता. परंतु नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाईवर हक्क सांगणाऱ्या रघुनाथरावाला पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवेपदापासून दूर ठेवले व माधवराव नारायणास सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होतेवेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.

१९ एप्रिल १८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १७ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.

२० एप्रिल १६६५ ची रात्र

शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळी पुरंदर मिर्झा राजे जयसिंह व दिलेर खान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. कशी कुणास ठाऊक? पण केदार दरवाज्याने ही कुमक गडावर पोचली.

२० एप्रिल १७४०

रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेशयेथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.

२० एप्रिल १७७५

नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहाँगीर देउन सत्कार. नारों शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात् त्यांचा मुलाला जहाँगीर दिली गेली.

२० एप्रिल १७५८

तापी, नर्मदेच्या सलीलाने तहान न भागलेल्या आमच्या अभिमानी अश्वांना आता गंगा,यमुना आणि सिंधू माईचे ते तीर्थ आकंठ प्यावयाचे होते.साम्राज्य स्वप्नाची इर्ष्या मनी बाळगणारा तो सूर्य आपल्या मध्यान्ही तळपू लागला होता. दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढणाऱ्या या स्वराज्याला आता नवीन ओळख निर्माण झाली होती आणि त्याला एक नवे नाव मिळाले होते …. मराठा साम्राज्य !

शिवाजीराजांचे ‘अहत तंजावर ते तहत पेशावर’ चे स्वप्न आज पूर्ण झाले होते. स्वकर्तुत्ववान अभिमानी मराठी जरीपटका अटकेवर फडकत होता आणि याची जबाबदारी सांभाळत होते अत्यंत हिशेबी आणि चाणाक्ष असणारे बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ थोरले नानासाहेब पेशवे.नानासाहेब पेशव्यांनी शिवाजी राजांच्याच धोरणांचा अवलंब करून स्वराज्याला साम्राज्यात रुपांतरीत करण्याची खटपट केली, यामागे छत्रपतींचे विचार होते, बाजीराव व चिमाजीअप्पांची मेहनत होती आणि साथ होती लाल मातीत अंग घुसळणाऱ्या अन् आपल्या माथी तीच माती अभिमानाने लावणाऱ्या शूर मराठमोळ्या सरदारांची. नावे तरी किती घ्यावीत नेमाजी शिंदे, मानाजी पायगुडे, राघोबादादा, साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, बळवंतराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव, दामाजी गायकवाड, यशवंतराव पवार, समशेरबहाद्दूर, मल्हारराव होळकर, विसाजी कृष्ण बिनीवाले, रामचंद्र गणेश कानडे, अंबाजी इंगळे, इब्राहिमखान गारदी, कुठे गोविंदपंत बुन्देल्यासारखी मुरब्बी हाडे तर कुठे सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, महादजी, जनकोजी, तुकोजी सारखे तरणेबांड फाकडे गडी !

हा काळ ठरला सार्थ पराक्रमाचा …. मराठा साम्राज्याचे स्वप्न साकारणारा !

ज्यांनी बाहुबले रणांत सगळे जिंकूनियां हो अरि

कीतींचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,

त्यांचे पुत्र अम्हांस आज सहसा सोडूनिया चालतां.

खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां?                १

राणोजी – परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,

मल्हारी – परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,

हा ! हा ! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना !

हा! हा! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना!              २

वृत्त-शार्दूलविक्रीडित जुलै १८८६

‘यथामूल आवृत्ती’, १९६७, पृ.६

२१ एप्रिल १७००

अजिंक्यतारा गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल रोजी शरणागती पत्करली.

आता त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले.

२१ एप्रिल १७७९

सवाई माधवराव पेशवे यांची पुण्यामधील पर्वती येथे मुंज संपन्न.

२२ एप्रिल १६६७

महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले

“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे” (शि.प.सा.सं.ले – ११५८)

हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला – “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर” (ए.फा.सा.खं-६-ले-५०)

अश्या प्रकारे संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले. औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.

२२ एप्रिल १८१८

कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले.

२३ एप्रिल १६५७

रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.

२४ एप्रिल १६७४

शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता शिवरायांचा दोन महिन्यांनी राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण महाराजांनी तसे केले नाही व जिजाबाई साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.

२४ एप्रिल १८१८ 

कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश, २२ एप्रिल १८१८ मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.

२८ एप्रिल १७३१

नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.

२९ एप्रिल १६६१

शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.

शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.

३० एप्रिल १६५७

शिवाजी महाराजांनी जुन्नर हे मोगली ठाणे लुटले.
काही दिवसांपूर्वीच शिवाजी राजांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही महाराजांना आपला “प्रेमाचा” खलीता पाठविलेला होता. त्या खलित्यात शिवाजी महाराजांनी “मोगलांचे अधिकारी” या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती. या संमती पत्राची तारीख आहे २३ एप्रिल १६५७.
जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहाजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवाजी नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाला. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयाची खंडणी गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही.

 

१ मे १६६५

पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले.

१ मे १८१८

रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.

३ मे १८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.

४ मे १६४९
मोगलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर हिंदू राजपूत छत्रसाल बुंदेला याचा जन्म. औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला. छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रसालाची भेटही इतिहासात झाली होती.

४ मे १७३९

वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा ‘सरसुभेदार शंकराजी केशव’ यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.

४ मे १७५८

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे –

आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे.” 
मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले होते.

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एक अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, अटक मोहिमेचे नेतृत्व राघोबा पेशव्याकडे असल्याने त्याने याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे –

“आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे.”

बाजीरावापासुन राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले. याच मोहिमेमुळे राघोभारारी अशी ओळख राघोबा पेशव्याला मिळाली..

५ मे १६५८

विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड शिवाजी राजांनी जिंकली.

५ मे १६६३

गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.

१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.

६ मे १६५६

रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले.

रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

६ मे १६७५

छत्रपति शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकला.

६ मे १९२२

राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.बहुजन समाजाला राजकिय निर्णयप्रक्रियेत समावून घेण्यासाठी त्यांनी इ स १९१६ साली निप्पाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष शाहू महाराजांच्या काळात झाला. इ स १९१७ साली पुन्रविवाहाचा कायदा करुन विधी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अस्पृष्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ स १९१९ साली सवर्ण व अस्पृष्याच्या वेगळ्या शाळा असण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.

अशा प्रकारे शाहूनी समाजात महत्वाचे बदल घडवून आणले.

९ मे १६६०

शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे – सासवड ताब्यात घेतले.

९ मे १६७४

शिवाजी महाराज चिपळूणहून रायगडावर परतले.

१० मे १८१८ रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली.
रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज.
पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.

११ मे १७३९

मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले.

१२ मे १६६६
शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची ‘ऐतिहासीक भेट’. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.

१३ मे १६७०

मराठ्यांनी मळवली जवळील लोहगड व विसापूर हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

१३ मे १६७४
इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला. आगरकोट हे ठिकान रेवदांडा,,जि. रायगड येथे आहे, त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून १६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काही कामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती.
हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आत घेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की ‘ अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे. गव्हर्नरने उत्तर दिले की , ‘ अहो, तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजी केव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही ही दक्षता घेतो. यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती हे व्यक्त होते.

१३ मे १६७७

शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकली.

१३ मे १८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी ‘मॅन्रो’ ने वसंतगड जिंकला.

१४ मे १६५७ जेष्ठ शुध्द द्वादशी, गुरुवार,संवत्सर शके १५७९

छत्रपति संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित साईंबाई राणीसाहेब यांचा पोटी किल्ले पुरंदर येथे दुपारी २ वाजता जन्म झाला व स्वराज्यास पहिला युवराज मिळाला. शिवाजी महाराजांचा मोठ्या भावाचे नाव संभाजी होते त्यांची हत्या अफजलखानाने दगाबजिने केलि होती. त्यांचा नावावरून याना संभाजी नाव दिले गेले.

राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचे निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होते. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचे नाव आहे ‘केदारेश्वर’ तर दुसर्‍या टेकडीचे नाव आहे ‘राजगादी’.

‘राजगादी’ हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता.
या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.

शंभूराजाना त्यांचा अयुशाची अवघी ३२ वर्षे मिळाली, त्यात छत्रपति पद त्याना अवघे ८ वर्षे लाभले (राज्याभिषेक १६. ०१. १६८१ व मृत्यु ११. ०३. १६८९) पण ही ८ वर्षे त्यानी अपल्या परक्रमाने अशी काही गाजवली की आजही ते एक शौर्यचे, त्यागाचे, बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हनून ओलखले जातात. जगाचा इतिहासात अशी नोद आहे की शंभूराजे हें असे एकमात्र सेनानी होवून गेले आहेत की ज्यानी त्यांचा अयुशात जेवडया लढाया केल्या त्यासर्वात त्यानी विजय मीळावला होता. अपल्या छोट्याशा कार्यकाळात त्यानी मोगल, सिद्धि, इंग्रज, पोर्तुगीच, डच, व इतर अनेक आशा एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पर्ध्यास नामोहरण केले होते. सर्वानी शंभू राजांचा पराक्रमापुढे हात टेकले होते.
अशा महापराक्रमी परमप्रतापी योध्या चरनी शतषा नमन.

१५ मे १७२९

मराठे शाहितिल पराक्रमी सेनापती खंडेराव दाभाडे यांचे निधन.

१५ मे १७३१

छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

१६ मे १६४०

शिवाजी राजांच्या फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी पुणे येथे विवाह.

१६ मे १६४९ (ज्येष्ठ पौर्णिमा)

शिवाजी राजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी फर्रादखानाचा पराभव केला. शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शाहजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सशर्त सुटका केली. त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१६ मे १६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण

दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,
“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !”
पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.
आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.

१६ मे १७३९ – वसई मोहिम
पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सूरू केलि.

३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.

चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.

१७ मे १६६६
दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने आग्र्याच्या कैदेत असताना शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला!त्याचे असे झाले की, दि. १६ मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले.त्यांचा मुद्दा एकच.या सीवाला ठार मारा.त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण.तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की,या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरतशहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, ‘ होय. मी सीवाला ठार मारणार आहे!’ हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले.बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते.पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला.
त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने
मीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन
सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेचतयार केला. दिला तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही!त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.

मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की,’ आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात.
आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ‘ मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ‘ याचा अर्थ असाही
उघडउघड दिसतोय की , मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ‘ रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. भेटला. बादशाह रामसिंगला म्हणाला, ‘ तुझा अर्ज मिळाला.मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ‘ भाईजी, तुम्ही
बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ‘

राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj

गणेश पावले
Chapters
ते आम्ही---! शिवकालीन दिनविशेष छातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना. शिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं! शिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली… शिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा? शिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची… शिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है! शिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला! शिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ! शिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’ शिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण शिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते. शिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे! शिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल. शिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला. शिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला शिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं? शिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे शिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव. शिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे! शिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे. शिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही. शिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! शिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे. शिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती. शिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले. शिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. शिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा शिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा! शिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. शिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते. शिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ. शिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे. शिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत. शिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. शिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच. शिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर. शिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा…….. शिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा. शिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान! शिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव. शिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर. शिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण. शिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील. शिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी! शिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत. शिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत शिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते शिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही. शिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही. शिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ शिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा. शिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक. शिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज… शिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे शिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह शिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच शिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव शिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन शिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश शिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली… शिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर… शिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात? शिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान शिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव शिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था. शिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे शिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप शिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच शिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले शिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच शिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण शिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली शिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन शिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती… शिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड शिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर शिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त शिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ शिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी शिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला शिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ शिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र शिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर शिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र शिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान शिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका शिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार शिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड शिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी शिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच! शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा शिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व शिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती शिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र शिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य शिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप शिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली. शिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे. शिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा. शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा. शिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन शिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास. शिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना शिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच शिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा. शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा. शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे. शिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच. शिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा . शिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले… शिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान. शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे. शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक. शिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड. शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना . शिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती. शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी. शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर. शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे. शिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास . शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा. शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक. शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ. शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस. शिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते. शिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे. शिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही शिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे. शिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श शिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान. शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर! शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे? शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी. शिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी शिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय शिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास शिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला शिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा शिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले! शिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ शिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा शिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान! शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !