Get it on Google Play
Download on the App Store

हें काय उगीचच ?

'' .... पन्नास - नाहीं शंभर वर्षाचें असतों म्हणून काय झालें असतें ? आहे काय त्यांत ? आणायचा अवकाश, तेव्हांच नीट करुन दिलें असतें ! - एकदा नीट पहाल तर खरें ! ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे ! - अलवत् ! आमचें इस्पितळच असें आहे ! आला रोगी कीं बरा झालाच पाहिजे ! - ती पाहा ! ती बाजाची पेटी दुरुस्त करायला आणली, तेव्हां एक सूर धड असेल तर शपथ ! हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं ! पण तीच आतां ? अशी गोड गाते आहे कीं, ज्याचें नांव तें ! - सांगतो ना ! एकदां जिथल्या तिथं ठाकठीक होऊन जेव्हां तिचे सूर निघायला लागले, तेव्हां किती मनस्वी आनंद झाला म्हणून सांगूं तुम्हांला ! - मालक तर उड्या मारायला लागला ! - बरोबरच आहे ! करावयाचें कांहीं, तर असेंच केलें पाहिजे ! नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला ? - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं ? अन् खरी मौज यांतच ! नाहीं का ? - तेव्हां एकंदर क्रमच असा आहे कीं, बिघडलेले म्हणून कांहीं राह्यचेंच नाहीं - हो मग ! शंका आहे काय ? - तें जें प्रेत चाललें आहे, तें सुद्धां पुन्हा धड व्हायलाच ! - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण ? - झालें तर ! हें जसें माणसाचें, तेंच आपल्या निर्माणकर्त्याचें ! तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत ? पुनः कुठें तरी चालू होतातच ते ! - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों ! - हें काय उगीचच ?.... ''

१२ जुलै, १९२४

दिवाकरांच्या नाट्यछटा

दिवाकर
Chapters
परिचय महासर्प एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! असे कां बरें रडतां ? तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ? किती रमणीय देखावा हा ! - पण इकडे ? अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! मुंबईत मजा गमतीची । जीवाची हौस करण्याची ॥ म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ?