Get it on Google Play
Download on the App Store

राम काळातील महत्वपूर्ण लोक

गुरु वसिष्ठ आणि ब्रम्हदेव यांच्या परवानगीनेच रामाला विष्णूचा अवतार घोषित करण्यात आले होते. रामाच्या काळात त्या वेळी विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यात अढी चालू होती. त्याच्याच काळात भगवान परशूराम देखील होते. त्याच्या कळतीलच एक महान ऋषी वाल्मिकी यांनी त्याच्यावर रामायण लिहिले.
रामाने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी संपाति, जटायु, हनुमान, सुग्रीव, बिभीषण, मैन्द, द्विविद, जांबुवंत, नल, नील, तार, अंगद, धूम्र, सुषेण, केसरी, गज, पनस, विनत, रम्भ, शरभ, महाबली कंपन (गवाक्ष), दधिमुख, गवय आणि गन्धमादन इत्यादींचे सहाय्य घेतले. रामाच्या काळात पाताळ लोकांचा राजा होता अहिरावण. अहिरावण राम आणि लक्ष्मणाला अपहरण करून घेऊन गेला होता.
रामाच्या काळात जनक राजा होता, जो रामाचा श्वसुर होता. जनकाचे गुरु होते अष्टवक्र ऋषी. जनक आणि अष्टवक्र यांच्यातील संवादाला 'महागीता' नावाने ओळखले जाते.