Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

रामाचा जन्म

https://i.ytimg.com/vi/Xq7cJ4d7HaA/maxresdefault.jpg

राम एक ऐतिहासिक महापुरुष होते आणि याची अनेक उदाहरणे आहेत. निकष आहेत. शोधानुसार समजते की रामाचा जन्म आजपासून ७१२८ वर्षांपूर्वी अर्थात ई. स. पू. ५११४ मध्ये झाला होता. अन्य काही तज्ञांचे म्हणणे आहे की रामाचा जन्म ९००० वर्षांपूर्वी म्हणजेच ई. स. पू. ७३२३ मध्ये झाला होता.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमी या तिथीला रामाचा जन्म झाला होता. प्रो. तोबायस नुसार वाल्मिकी रामायणात उल्लेख असल्याप्रमाणे ग्रह नक्षत्रांची स्थिती लक्षात घेता अयोध्येमध्ये १० जानेवारी रोजी १२ वाजून २५ मिनिटांनी, ई. स. पू. ५११४ मध्ये रामजन्म झाला होता. आकाशातील ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती वाल्मिकी रामायणात १/१८/८९ मध्ये वर्णिलेली आहे. प्लैनेटेरियम सॉफ्टवेयरच्या माध्यमातून कोणाच्याही जन्माची तिथी शोधून काढणे आता एकदम सोपे झाले आहे.