Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तारणहार रामाचे नाम

राम हा शब्द दिसायला जेवढा सुंदर आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी महत्वाचा आहे तो त्याचा उच्चार. राम म्हटले मात्र की शरीरावर आणि मनात त्याची एक वेगळीच प्रतिक्रिया उमटते, जी आपल्याला आत्मिक शांती देते. या शब्दाच्या ध्वनवर खूप संशोधन झाले आहे आणि त्याचा चमत्कारिक परिणाम सिद्ध झालेला आहे म्हणूनच म्हटले जाते की रामापेक्षा देखील श्रेष्ठ असे श्रीरामाचे नाम आहे.
श्रीरामाच्या नामाचा जप करत करत अनेक साधू संत मुक्तीच्या पदाला पोचले आहेत. प्रभू श्रीराम नामाच्या उच्चाराने जीवनात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. ज्या लोकांना ध्वनी विद्या अवगत आहे त्यांना माहिती आहे की "राम" या शब्दाचा महिमा अपरंपार आहे.
जेव्हा आपण 'राम' असे म्हणतो, तेव्हा हवा किंवा रेतीवर एका विशिष्ट आकृतीची निर्मिती होते. त्याचप्रमाणे चित्तात देखील विशिष्ट लय येऊ लागते. जेव्हा व्यक्ती सतत राम नामाचा जप करत राहते तेव्हा रोमारोमात प्रभू श्रीराम वास्तव्य करू लागतात. त्याच्या अवती भोवती एक संरक्षक कवच निर्माण झालेच म्हणून समजावे. प्रभू श्रीरामाच्या नावाचा प्रभाव जबरदस्त असतो. आपली सर्व दुःख हरण करणारे नाव एकच आहे - "हे राम!"