Get it on Google Play
Download on the App Store

रामाने सीतेचा त्याग केला नव्हता

http://hi.encyclopediaofjainism.com/images/b/b6/AgniparikshaOfSita_22810.jpg

सीता तब्बल २ वर्षे रावणाच्या अशोक वाटिकेत बंदी बनून राहिली, परंतु या काळात रावणाने सीतेला स्पर्श देखील केला नाही. यामागचे कारण असे होते की स्वर्गातील अप्सरांनी रावणाला शाप दिला होता, की जेव्हा कधी तू अशा स्त्रीशी प्रणय करशील जिला तू आवडत नाहीस, तेव्हा तत्काळ तुझा मृत्यू होईल. स्वतः रावण कोणत्याही स्त्रीच्या इच्छेशिवाय तिच्याशी प्रणय करू शकत नव्हता.
सीतेची मुक्तता झाल्यानंतर समाजात हेच प्रचलित आहे की अग्निपरीक्षा झाल्यानंतर रामाने प्रसन्न मनाने सीतेला स्वीकारले आणि उपस्थित जन समुदायाला सांगितले की त्यांनी लोकनिंदेच्या भयाने सीतेचा स्वीकार केला नव्हता. परंतु आता अग्निपरीक्षा पार केल्यानंतर सिद्ध झाले आहे की सीता पवित्र आहे, तेव्हा आता कोणालाही यात संशय असता कामा नये. परंतु ही अग्निपरीक्षा झाल्यानंतर देखील जन समुदायात तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या, तेव्हा रामाने सीतेला सोडून देण्यासाठी मनाची तयारी केली. ही गोष्ट उत्तरखंडात लिहिली आहे. ती मूळ रामायणात नाहीये.
वाल्मिकी रामायण, जे निश्चितच बौद्ध धर्माच्या अभ्युदयाच्या आधी लिहिले गेले होते, समस्त विकृतींपासून मुक्त आहे. त्यामध्ये सीतेचा त्याग, शंबुकवध, रावण चरित्र इत्यादी काहीही नव्हते. हे रामायण युद्ध खंडात समाप्त होणारे केवळ ६ खंडांचे होते. त्यामध्ये उत्तरखंड नंतर जोडण्यात आले.
शोधकर्त्यांचे म्हणणे आहे की ही आपल्या इतिहासातील सर्वांत मोठी चूक होती की बौद्ध काळात उत्तरखंड लिहिले गेले आणि त्याला वाल्मिकी रामायणाचा हिस्सा बनवले गेले. कदाचित ही त्या काळातील सामाजिक अडचण असू शकेल, परंतु सत्य अशा प्रकारे बिघडवणे कितपत योग्य आहे? सीतेने कधीही अग्निपरीक्षा दिली नाही आणि रामाने देखील कधीही सीतेचा त्याग केलेला नाही.
विपिन किशोर सिन्हा यांनी एक छोटी शोध पुस्तिका लिहिली जिचे नाव आहे - 'राम ने सीता परित्याग कभी कियाही नाही.' हे पुस्तक संस्कृती शोध एवं प्रकाशन, वाराणसी ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात ती सर्व तथ्य उपस्थित आहेत, ज्यवरून लक्षात येते की रामाने काधीही सीतेचा त्याग केलाच नव्हता.
रामकथेवर सर्वांत प्रामाणिक शोधकार्य करणारे फादर कामिल बुल्के यांचेही स्पष्ट मत आहे की, वाल्मिकी रामायाणाचे उत्तरखंड मूळ रामायणाच्या खूप नंतरची पूर्णतः प्रक्षिप्त रचना आहे. (रामकथा उत्पत्ति विकास- हिन्दी परिषद, हिन्दी विभाग प्रयाग विश्वविद्यालय, प्रथम संस्करण 1950)