Get it on Google Play
Download on the App Store

दंडकारण्य

अत्री मुनींना राक्षसांपासून मुक्ती दिल्यानंतर तो दंडकारण्यात निघून गेला जिथे आदिवासी मुबलक होते. इथल्या आदिवासींना बाणासुराच्या अत्याचारांतून मुक्त केल्यानंतर १० वर्षे तो आदिवासींच्या सोबतच राहिला. इथेच त्याची जटायुशी भेट झाली होती जो त्याचा मित्र होता. जेव्हा रावण सीतेला अपहरण करून घेऊन गेला, तेव्हा सीतेच्या शोधात असताना रामाची पहिली भेट शबरी सोबत झाली होती आणि त्यानंतर वानर जातीच्या हनुमान आणि सुग्रीवाशी.
सध्या जवळ जवळ ९२,३०० वर्ग किलोमीटर एवढ्या क्षेत्रावर पसरलेल्या या क्षेत्रात पश्चिमेला अबुझमाड पर्वतरांगा, तर पूर्वेला याच्या सीमेवर पूर्वीय घाट समाविष्ट आहेत. दंडकारण्यात छत्तीसगड, ओडीसा, आणि आंध्र प्रदेश राज्यांचे हिस्से समाविष्ट आहेत. या क्षेत्राचा विस्तार दक्षिणोत्तर साधारण ३२० किलोमीटर आहे तर पूर्व - पश्चिम ४८० किलोमीटर आहे.
याच दंडकारण्य क्षेत्रात राहून रामाने अखंड भारतातील सर्व दलितांना आपलेसे केले. भारतातील राज्य तमिळनाडु, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक यांच्या सोबतच नेपाळ, लाओस, कंपूचिया, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका, बाली, जावा, सुमात्रा आणि थाईलैंड इत्यादी देशांच्या लोक संस्कृतीत आणि ग्रंथांमध्ये आज देखील राम म्हणूनच जिवंत आहे. राम अशी पहिली व्यक्ती होती जिने धार्मिक आधारावर संपूर्ण अखंड भारतातील दलित आणि आदिवासी यांना एकजूट केले होते. या संपूर्ण क्षेत्रातील आदिवासी म्हणूनच राम आणि हनुमान यांना सर्वांत पूजनीय मानतात. परंतु इंग्रज काळात इसाई लोकांनी भारताच्या याच भागात धर्मान्तराचे कुचक्र चालवले आणि रामाला दालितांपासून कमी करण्यासाठी हर तऱ्हेचे कट आणि कारस्थाने केली, जी आजही आपल्याला भारी पडत आहेत.