Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

त्रिशंकूची कथा

विश्‍वामित्र राम-लक्ष्मणांसह मिथिलेला आले, तेव्हा जनकराजाचे कुलगुरू शतानंद विश्‍वामित्राची कीर्ती जनकाला सांगू लागले.
सूर्यवंशात त्रिशंकू नावाचा राजा होता. त्याने नैमिबारण्यात यज्ञ सुरू केला व कुलगुरू वसिष्ठपुत्रांची प्रार्थना केली, की तुम्ही असे हवन करा, ज्यायोगे मी सदेह स्वर्गाला जाईन. त्या वेळी वसिष्ठपुत्रांनी राजाला स्वर्गाला सदेह जाणे अशक्‍य असल्याचे सांगितले. तेव्हा त्रिशंकू म्हणाला,"तुम्हाला यज्ञ नीट करता येत नाहीसे दिसते. मी दुसर्‍या आचार्यांकडून करून घेतो." हे ऐकून वसिष्ठपुत्रांना राग आला व त्यांनी यज्ञपूर्ती होणार नाही, असा राजाला शाप दिला. नंतर त्रिशंकू ऋषी विश्‍वामित्रांना शरण गेला व सर्व हकिगत त्यांना सांगितली. विश्‍वामित्रांनी त्याला निर्दोष करून सदेह स्वर्गाला नेण्याचे वचन दिले व त्यासाठी यज्ञाला आरंभ केला. यज्ञाची पूर्णाहुती होताच यज्ञदेव प्रसन्न झाला व त्याने त्रिशंकूला सदेह स्वर्गात नेण्याची योजना केली; पण ऋषीपुत्रांच्या शापामुळे कलंकित झालेल्या त्रिशंकूचे सदेह स्वर्गात येणे योग्य नाही, असे वाटल्यामुळे सर्व देव एकत्र आले व ते त्रिशंकूला खाली डोके वर पाय अशा स्थितीत करून खाली लोटून देऊ लागले.
पुन्हा त्रिशंकूने विश्‍वामित्रांची प्रार्थना केली. विश्‍वामित्रांनी आपल्या मंत्राच्या सामर्थ्याने त्याला आकाशात दक्षिणध्रुवाचे स्थान दिले. नंतर ते प्रतिसृष्टी निर्माण करू लागले; पण यामुळे घाबरून जाऊन देवांनी माघार घेतली व त्रिशंकूला सदेह स्वर्गात घेण्याची तयारी दाखवली. नंतर देवांनी विमान पाठवून त्रिशंकूला स्वर्गात नेले. अशा प्रकारे विश्‍वामित्रांच्या तपःसामर्थ्याची ख्याती आहे.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
हयग्रीव अवतार
बौद्धावतार
हरिश्‍चंद्र
वज्रनाभ राजाची कथा
उषा-अनिरुद्ध विवाह
यादवांच्या नाशाची कथा
महाप्रलयाची कथा
व्यासपुत्र शुकाची कथा
मुचकुंदाची कथा
उर्वशी व पुरुरवा
ध्रुवाची कथा
अयोध्येच्या धोब्याची कथा
गाईचा महिमा
दंडकारण्य उत्पत्ती कथा
कर्णपुत्र वृषकेतूची कथा
नृसिंह व वीरभद्र
पाच पांडव व द्रौपदी
कलंकी अवतार
तपती आख्यान
कृपाची जन्मकथा
सरस्वतीची झाली नंदा
रामभक्त राजा सुरथ
श्‍वेतराजाचा उद्धार
शिवभक्त वीरमणी
रावणकथा
विष्णूचे चक्र व गदा
वैजयंतीमालेची कथा
नंदीची कथा
सांबाची सूर्योपासना
प्रल्हाद आख्यान
पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन
शांतीचा मार्ग
शंबरासुर वध
पारिजात कथा
श्रीवत्सलांच्छनाची कथा
वृकासुराची कथा
स्यमंतक मण्याची कथा १
स्यमंतक मण्याची कथा २
दशरथ कौसल्या विवाह
त्रिशंकूची कथा
भृगुपुत्र शुक्राची कथा
कर्कटी राक्षसीची कथा
जीवटाख्यान
समुद्रमंथन व राहूची कथा
रेणुकेचा जन्म
रेणुका स्वयंवर
सहस्रार्जुनाची कथा
जयध्वजाचे आख्यान
सौभरी चरित्र
गरुडाचे गर्वहरण
पराशर कथा
श्रीमतीचे आख्यान
कौशिकाचे वैष्णवगायन
क्षुप व दधिचाची कथा
श्रीरामांची सतीकडून परीक्षा
शंखचूडाची कथा
शिवांचे अवतार
अवदशेची कथा
कान्यकुब्ज नगरीची कथा
भरताचे मागणे
उर्वशी
लोपामुद्रा
सती
सुकन्या
नीलम आणि ऋता
मैत्रेयी
गार्गी
सुभद्रा
चित्रांगदा
देवकी
यशोदा