Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पाच पांडव व द्रौपदी

ब्रह्मदेवांनी जी अठरा महापुराणे निर्माण केली त्यांची नावे अशी - ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, नृसिंह, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड व ब्रह्मांड. मार्कंडेय पुराण हे त्यापैकी एक महत्त्वाचे पुराण मानले गेले आहे. व्यासशिष्य जैमिनी यांनी मार्कंडेय यांना महाभारतासंबंधी काही शंका विचारल्या. त्यात, "द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी कशी झाली?' अशी एक शंका होती. याचे उत्तर विंध्य पर्वतावर पक्षियोनीत असलेल्या चार धर्मात्म्यांनी दिले ते असे-
पूर्वी त्वष्टा प्रजापतीचा मुलगा इंद्राच्या हातून मारला गेला. त्या ब्रह्महत्येने इंद्राचे तेज कमी झाले व ते धर्मराजाच्या शरीरात आले. पुत्राच्या मृत्यूने संतप्त झालेल्या त्वष्ट्याने होमकुंडातून वृत्र नावाचा असुर इंद्राला मारण्यासाठी निर्माण केला. त्याच्या अक्राळविक्राळ स्वरूपास घाबरून तह करण्यासाठी सप्तर्षींना पाठवले. त्यांनी चतुराईने वागून इंद्र व वृत्र यांची मैत्री घडवून आणली. पण पुढे इंद्राने विश्‍वासघाताने वृत्रासुरास मारले. त्यामुळे पुन्हा त्याचे तेज कमी होऊन ते वायूच्या शरीरात सामावले गेले. नंतर इंद्राने गौतमाचे रूप घेऊन अहिल्येस फसवले. तेव्हा त्याचे रूपसौंदर्य त्याला सोडून अश्‍विनीकुमारांकडे गेले. अशा प्रकारे इंद्र हा धर्म, तेज, बल, लावण्य यांना वंचित झाला. इंद्रास जिंकण्यासाठी महाबली दैत्य निर्माण झाले. त्यांनी पृथ्वीवर बरेच अत्याचार केले. आपल्या शांतीसाठी पृथ्वीने देवांना साकडे घातले. तेव्हा सर्व देव आपापल्या अंशाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले. स्वतः धर्मराज कुंतीच्या पोटी युधिष्ठिर म्हणून जन्माला आले. वायुदेवाने भीमाचा जन्म घेतला. अर्जुन हा इंद्राचाच पुत्र असून तो त्याचा अर्धा अंश घेऊन जन्माला आला. अश्‍विनीकुमार-माद्रीच्या पोटी नकुल व सहदेव जन्मले. अशाप्रकारे इंद्र पाच रूपांत अवतीर्ण झाला. इंद्राची पत्नी शची ही द्रौपदीच्या रूपाने अग्नीतून प्रकट झाली. इंद्राने पाच शरीरे धारण केली असल्याने ती एकटी पाच पांडवांची पत्नी झाली. अशा प्रकारे जैमिनींचे समाधान पक्ष्यांनी केले. त्यांच्या आणखीही काही शंकांची त्यांनी उत्तरे दिली. या पक्ष्यांची नावे पिंगाक्ष, विबोध, सुपुत्र व सुमुख अशी असून, दुर्वासांच्या शापामुळे पक्षीण झालेल्या वपू नावाच्या अप्सरेची ती मुले होती. या चौघांना शमीक नावाच्या ऋषींनी सांभाळले. त्यांच्यावर विद्येचे संस्कार करून त्यांना ज्ञानी केले.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
हयग्रीव अवतार
बौद्धावतार
हरिश्‍चंद्र
वज्रनाभ राजाची कथा
उषा-अनिरुद्ध विवाह
यादवांच्या नाशाची कथा
महाप्रलयाची कथा
व्यासपुत्र शुकाची कथा
मुचकुंदाची कथा
उर्वशी व पुरुरवा
ध्रुवाची कथा
अयोध्येच्या धोब्याची कथा
गाईचा महिमा
दंडकारण्य उत्पत्ती कथा
कर्णपुत्र वृषकेतूची कथा
नृसिंह व वीरभद्र
पाच पांडव व द्रौपदी
कलंकी अवतार
तपती आख्यान
कृपाची जन्मकथा
सरस्वतीची झाली नंदा
रामभक्त राजा सुरथ
श्‍वेतराजाचा उद्धार
शिवभक्त वीरमणी
रावणकथा
विष्णूचे चक्र व गदा
वैजयंतीमालेची कथा
नंदीची कथा
सांबाची सूर्योपासना
प्रल्हाद आख्यान
पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन
शांतीचा मार्ग
शंबरासुर वध
पारिजात कथा
श्रीवत्सलांच्छनाची कथा
वृकासुराची कथा
स्यमंतक मण्याची कथा १
स्यमंतक मण्याची कथा २
दशरथ कौसल्या विवाह
त्रिशंकूची कथा
भृगुपुत्र शुक्राची कथा
कर्कटी राक्षसीची कथा
जीवटाख्यान
समुद्रमंथन व राहूची कथा
रेणुकेचा जन्म
रेणुका स्वयंवर
सहस्रार्जुनाची कथा
जयध्वजाचे आख्यान
सौभरी चरित्र
गरुडाचे गर्वहरण
पराशर कथा
श्रीमतीचे आख्यान
कौशिकाचे वैष्णवगायन
क्षुप व दधिचाची कथा
श्रीरामांची सतीकडून परीक्षा
शंखचूडाची कथा
शिवांचे अवतार
अवदशेची कथा
कान्यकुब्ज नगरीची कथा
भरताचे मागणे
उर्वशी
लोपामुद्रा
सती
सुकन्या
नीलम आणि ऋता
मैत्रेयी
गार्गी
सुभद्रा
चित्रांगदा
देवकी
यशोदा