Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १

१.

आला आला रुखवत वाजत गाजत, आत उघडून बघती तर बदामाच ताट

दोनशे खांडवा कापण्या तीनशेसाठ.

दुसर्‍या दुरडीत गुलालाचा भार, व्याही केला हौसेदार, तिसर्‍या दुरडीत हळदी

कुंकवाचे पुडे, रुखवत उघडते आयाबायांच्या पुढे.

चवथ्या दुरडीत मुळाची शाइ, रुखवत उघडती नवर्‍याची आई.

पाचव्या दुरडीत केळीची फणी ,रुखवत उघडती नवर्‍याच्या बहिणी.

सहाव्या दुरडीत शेवया रुखवत उघडते नवर्‍याची करवली.

सातव्या दुरडीत खांडवे निघाले ताजे तवाने , रुखवत उघडती नवर्‍याची

भावजय जोमाने.

आठव्या दुरडीत चंद्राची कोर , रुखवत उघडती सासू माझी थोर.

नवव्या दुरडीत साखर्‍याची गवळण , रुखवत उघडती नवर्‍याची मावळण.

दहाव्या दुरडीत दिसला पन्हाळगड, रुखवत उघडून बघतेय तर

निघाले केळी नारळाचे घड.

अकराव्या दुरडीत चोळीचे खण , रुखवत उघडून बघणारीचे खुले दिसते मन.

बाराव्या दुरडीत शेवायी ताजी , रुखवत उघडून बघतेय नवर्‍याची आजी.

तेराव्या दुरडीत वाजेत्र्यांचा ताफा,रुखवत उघडून बघतेय तर सोळा सतरा

गोपींनी भरला सोपा.

चौदाव्या दुरडीत साखर्‍याचे पुडे , नवर्‍याचे भावाला रुखवत उघडायला

बोलवा पुढे.

पंधराव्या दुरडीत निघाला माल घडेघडे, नवर्‍याचे हातात सोन्याचे तोडे.

सोळाव्या दुरडीत निघाली आरती, नवर्‍याकडे पाहून तहानभूक हरती.

सत्तराव्या दुरडीत निघाला ऊस,नवर्‍याकडे पाहुन नवरी झाली खूश.

अठराव्या दुरडीत निघाला चहा , नवरा मागेल ते त्याला देऊन पहा.

एकोणीसाव्या दुरडीत वेळला भात, नवरानवरीच आहे येवढ भल दांडग ग्वात,

विसाव्या दुरडीत करते चहा कॉफी , काही चुकले असले तर करावी आता तुम्ही

आम्हाला विहीनबाई माफी.

२.

आला आला रुखवत ,त्यात होती बुगडी

विहीणी विहीणी घालतात मांडवात फुगडी.

३.

आला आला रुखवत त्यांत होता पारवा

नवरीचा भाऊ म्हणतो माझे लग्न ठरवा

४.

आला आला रुखवत त्यात होत फवं

विहीणीला आहे चहाची फार सवं

५.

आला आला रुखवत त्यात होते रुपये काठोकाठ

विहीणीला तपकीर ओढताना नाकात बोट घालायची सवय भरमसाठ.

६.

आला आला रुखवत त्यात होता भोपळा

काका काकीच्या लग्नातून जीव झाला मोकळा.

७.

आला आला रुखवत ,त्यात होता तवा

विहीणीन कपडे धुतले पानिपतची लढाई झाली तवा.

८.

आला आला रुखवत , त्यात होत दावं,

तेव्हा लुगड धुतलेल तुला काय ठाव ?

९.

आला आला रुखवत त्यात होती पेटी

आमची मुलगी बोलणारी नाही खोटी.

१०.

आला आला रुखवत त्यात होती नोट

विहीणबाई मागती पँट आणि कोट.