Get it on Google Play
Download on the App Store

गाथा २७०१ ते ३०००

2701
 चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लंछन ॥1॥
ऐशा आह्मीं करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥
ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥2॥
तुका ह्मणे ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥3॥

2702
 बुिद्धहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥1॥
हुंगों नये गो†हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥
अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥2॥
तुका ह्मणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥3॥

2703
 न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।
बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥1॥
आणीक काय तुह्मां काम । आह्मां नेदा तरी प्रेम ।
कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥
आह्मीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें ।
संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥3॥
एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी ।
जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥3॥
रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।
होइऩन सरता । संतांमाजी पोसणा ॥4॥
ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा ।
तुका ह्मणे बरा । रोकडा चि निवाड ॥5॥

2704. भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥1॥
हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥
नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥2॥
तुका ह्मणे जड । मज न राखावें दगड ॥3॥

2705
 सर्व भाग्यहीन । ऐसें सांभािळलों दीन ॥1॥
पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥
जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥2॥
तुका ह्मणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥3॥

2706
 भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥1॥
येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥
होइप बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥2॥
तुका ह्मणे लोटांगणीं । भिHभाग्यें जाली धणी ॥3॥

2707
 नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥1॥
जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥
आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥2॥
तुका ह्मणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥3॥

2708
 आह्मी सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥1॥
तरी ह्मणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥
याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥2॥
तुका ह्मणे निद्रा जागृति सुषुिप्त । तुह्मी हो श्रीपती साक्षी येथें ॥3॥

2709
 नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥1॥
जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥
गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥2॥
तुका ह्मणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥3॥

2710
 हें का आह्मां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥1॥
सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कळीसारिखे ॥ध्रु.॥
शरणागत वै†या हातीं । हे नििंश्चती देखिली ॥2॥
तुका ह्मणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥3॥

2711
 कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥1॥
उफराटी तुह्मां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥
साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥2॥
तुका ह्मणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥3॥

2712
 शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥1॥
भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥
प्रीत कळे आलिंगनीं। संपादनीं अत्यंत ॥2॥
तुका ह्मणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें॥3॥

2713
 नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥1॥
तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥
नाहीं विटािळलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥2॥
तुका ह्मणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥3॥

2714
 ऐकिली कीिर्त्त संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥1॥
मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥
आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥2॥
तुका ह्मणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥3॥

2715
 मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥1॥
उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥
लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥2॥
तुका ह्मणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥3॥

2716
 ह्मणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥1॥
कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥
पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥2॥
तुका ह्मणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समपिऩला ॥3॥

2717
 विभ्रंशिली बुिद्ध देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥1॥
पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥
न मारितां हीन बुिद्ध दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥2॥
तुका ह्मणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥3॥

2718
 न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥1॥
ह्मणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥
मोकळें हे मन कष्ट। करी नष्ट दुर्जन ॥2॥
तुका ह्मणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥3॥

2719
 कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥1॥
धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥
बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥2॥
तुका ह्मणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥3॥

2720
 उकरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥1॥
कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥
काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥2॥
तुका ह्मणे काय उपदेश वेडएा । संगें होतो रेडएासवें कष्ट ॥3॥

2721
 जया शिरीं कारभार । बुिद्ध सार तयाची ॥1॥
वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥
आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥2॥
तुका ह्मणे शूर राखे । गाढएा वाखेसांगातें॥3॥

2722
 एक एका साहए करूं । अवघें धरूं सुपंथ ॥1॥
कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥
अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥2॥
तुका ह्मणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥3॥

2723
 फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥1॥
ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥2॥
तुका ह्मणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥3॥

2724
 सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥1॥
कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥
आवडे तें तें च यासी । ब्रह्मरसीं निरसें ॥2॥
तुका ह्मणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥3॥

2725
 असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित॥1॥
तरि ह्मणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥
सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥2॥
तुका ह्मणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥3॥

2726
 आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥1॥
बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥ध्रु.॥
पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥2॥
तुका ह्मणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥3॥

2727
 असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥1॥
धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शिHहीन ॥ध्रु.॥
भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥2॥
तुका ह्मणे धांव घेतलीसे सोइऩ । आतां पुढें येइप लवकरी ॥3॥

2728
 आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या॥1॥
ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥
गळ गिळी आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥2॥
तुका ह्मणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥3॥

2729
 विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥1॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥
अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥2॥
तुका ह्मणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥3॥

2730
 मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें॥1॥
पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥
मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥2॥
आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥3॥

2731
 येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥1॥
ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥
भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥2॥
तुका ह्मणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥3॥

2732
 भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥1॥
परी आह्मी असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥
वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥3॥

2733
 लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥1॥
पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥
कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥2॥
तुका ह्मणे वाटे चित्त । करा फजित ह्मणऊनि ॥3॥

2734
 पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥1॥
पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥
संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥2॥
तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥3॥

2735
 आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ ॥
प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥
केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥2॥
तुका ह्मणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥3॥

2736
 संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥1॥
संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृित्त अखंडित ॥ध्रु.॥
दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥2॥
निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥3॥

2737
 सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥1॥
राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥
भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥2॥
तुका ह्मणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥3॥

2738
 न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥1॥
मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥
कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥2॥
तुका ह्मणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥3॥

2739
 तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥1॥
जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥
जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव ह्मणऊनि ॥2॥
तुका ह्मणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥3॥

2740
 कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥1॥
तुह्मांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥2॥
तुका ह्मणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥3॥

2741
 ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥1॥
नाहीं भेदू ह्मुण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥2॥
तुका ह्मणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥3॥

2742
 कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥1॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥2॥
तुका ह्मणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥3॥

2743
 याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥1॥
येइप गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥
दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे॥2॥
विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका ह्मणे हें चि आह्मां ध्यान निरंतर ॥3॥

2744
 गंगा आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥1॥
तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥
पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें॥2॥
तुका ह्मणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥3॥

2745
 पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम ह्मणतां तुझी बसली दांतखीळ ॥1॥
हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । ह्मणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥2॥
तुका ह्मणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न ह्मणे त्याचा गाढव मातापिता ॥3॥

2746
 आह्मां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥1॥
घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥
वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥2॥
धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥3॥
माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥4॥
नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका ह्मणे गेलें । वांयांविण न घेतां ॥5॥

2747
 चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥1॥
तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥
निक्षेपिलें धन। तेथें गुंतलेसे मन ॥2॥
नाशिवंतासाटीं । तुका ह्मणे करिसी आटी ॥3॥

2748
 करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥1 ॥
ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥
िप्रया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥2॥
तुका ह्मणे एका । हरीविण नाहीं सखा ॥3॥

2749
 आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥1॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥
आधीं करूं चौघाचार। मग सांडूं भीडभार ॥2॥
तुका ह्मणे सेवटीं । तुह्मां आह्मां घालूं तुटी ॥3॥

2750
 नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥1॥
जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥
चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥2॥
तुका ह्मणे तूं निर्लज्ज । आह्मां रोकडी गरज ॥3॥

2751
 बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥1॥
बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥
नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥2॥
ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका ह्मणे धांवे खाऊं ॥3॥

2752
 काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥1॥
नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥
होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥2॥
तुका ह्मणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥3॥

2753
 केली सलगी तोंडपिटी । आह्मी लडिवाळें धाकुटीं॥1॥
न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥
अवघ्यांमध्यें एक वेडें । तें चि खेळविती कोडें ॥2॥
तुका ह्मणे मायबापा । मजवरि कोपों नका ॥3॥

2754
 शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥1॥
आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥
हातीं प्रेमाचें भातुकें । आह्मां देऊनियां निकें ॥2॥
तुका करी टाहो । पाहे रखुमाइऩचा नाहो ॥3॥

2755
 तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥1॥
दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥2॥
पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका ह्मणे पाहे । कोण आस या मुHीची ॥3॥

2756
 शूद्रवंशी जन्मलों । ह्मणोनि दंभें मोकलिलों ॥1॥
अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥
घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥2॥
सर्वभावें दीन । तुका ह्मणे यातिहीन ॥3॥

2757
 वेडें वांकडें गाइऩन । परि मी तुझा चि ह्मणवीन॥1॥
मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥
केल्या अपराधांच्या राशीं । ह्मणऊनि आलों तुजपाशीं ॥2॥
तुका ह्मणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥3॥

2758
 हरिभH माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥1॥
अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥
आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥2॥
देइन आिंळगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥3॥
कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥4॥
तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥5॥
अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥6॥
कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥7॥
हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥8॥
तुका ह्मणे तया उपकारें बांधलों। ह्मणऊनि आलों शरण संतां ॥9॥

2759
 लटिका तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंिद्रयें ॥1॥
लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥
लटिकिया विपित्त हरिविण करिती । हरि नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥2॥
तुका ह्मणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा ॥3॥

2760
 सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥1॥
मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥2॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥3॥
तुका ह्मणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥4॥

2761
 एकांतांचे सुख देइप मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥1॥
ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देइप देवा ॥2॥
कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥3॥
तुका ह्मणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥4॥

2762
 लटिकें तें Yाान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन िप्रय नाहीं ॥1॥
लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥
लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्काुंफ्दन प्रेम कथे ॥2॥
लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥3॥
नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुिद्ध ॥4॥
तुका ह्मणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥5॥

2763
 भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥1॥
ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥
माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥2॥
तुका ह्मणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥3॥

2764
 नेणें काुंफ्कों कान । नाहीं एकांतींचें Yाान ॥1॥
तुह्मी आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥
नाहीं देखिला तो डोळां। देव दाखवूं सकळां ॥2॥
चिंतनाच्या सुखें । तुका ह्मणे नेणें दुःखें ॥3॥

2765
 त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥1॥
मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥
अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥2॥
तुका ह्मणे शुद्ध मन । समाधान पाहिजे॥3॥

2766
 मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्यािप्त ॥1॥
देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥
दावी प्रेमभातें। आणि अंगावरि चढतें ॥2॥
तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें॥3॥

2767
 कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें॥1॥
ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभािळलें दीना ॥ध्रु.॥
कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥2॥
तुका ह्मणे जाला । लाभ सहज विठ्ठला॥3॥

2768
 मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची॥1॥
एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥
आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥2॥
तुका ह्मणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥3॥

2769
 संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं ।
तृष्णा देशधडी केलों। भिHभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों।
मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेिष्टलों ॥1॥
आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची ।
करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची॥ध्रु.॥
इंिद्रयें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान ।
नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक िस्थर नाहीं ।
 करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी। न चले माझें यास कांहीं ॥2॥
शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु। धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।
सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें ।
तुका ह्मणे हरी राखे भलत्या परी । आह्मी तुझीं शरणागतें ॥3॥

2770
 नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥1॥
ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥
नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥2॥
हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥3॥

2771
 प्राण समपिऩला आह्मी । आतां उशीर कां स्वामी॥1॥
माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥
जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥2॥
तुका ह्मणे सेवा । कैसी बरी वाटे देवा॥3॥

2772
 येणें मागॉ आले । त्यांचें निसंतान केलें ॥1॥
ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥
नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥2॥
तुका ह्मणे चोर । तो हा उभा कटिकर ॥3॥

2773
 तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥1॥
तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥
तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥2॥
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाइऩचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥3॥
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं॥4॥

2774
 तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥1॥
तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥2॥
तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥3॥

2775
 धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥1॥
जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥
भस्मउद्धळण लIमीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥2॥
वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥3॥
कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥4॥
तुका ह्मणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥5॥

2776
 उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥1॥
वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥
विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥2॥
तुका ह्मणे शेकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥3॥

2777
 लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥1॥
खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥
सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥2॥
तुका ह्मणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥3॥

2778
 अवघीं च तीथॉ घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥1॥
अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥
अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥2॥
तुका ह्मणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥3॥

2779
 सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥1॥
ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥ध्रु.॥
जयासी न कळे भHीचें महिमान । तेणें ब्रह्मYाान बोलों नये ॥2॥
ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये ॥3॥
तुका ह्मणे ज्यासी नाहीं हरिभिH । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥4॥

2780
 आह्मी असों नििंश्चतीनें । एक्या गुणें तुमचिया॥1॥
दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम ह्मणोनि ॥ध्रु.॥
नाहीं तुह्मां धांव घेता। कृपावंता आळस ॥2॥
तुका ह्मणे विसरूं कांहीं । तुज वो आइऩ विठ्ठले ॥3॥

2781
 अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥1॥
कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥
जातीऐसा दावी रंग। बहु जग या नावें ॥2॥
तुका ह्मणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥3॥

2782
 परपीडक तो आह्मां दावेदार । विश्वीं विश्वंभर ह्मणऊनि॥1॥
दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥
अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥2॥
तुका ह्मणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्तें ॥3॥

2783
 कांहीं न मागे कोणांसी । तो चि आवडे देवासी॥1॥
देव तयासी ह्मणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥2॥
नाहीं नाहीं त्यासमान । तुका ह्मणे मी जमान ॥3॥

2784
 नाम उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥1॥
ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥
ब्रह्मादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥2॥
तुका ह्मणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥3॥

2785
 आडलिया जना होसी सहाकारी । अंधिळयाकरीं काठी तूं चि ॥1॥
आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥
प्रल्हाद महासंकटीं रिक्षला । तुह्मी अपंगिला नानापरी ॥2॥
आपुलें चि अंग तुह्मी वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥3॥
तुका ह्मणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाइऩ जननीये ॥4॥

2786
 तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंिद्रयांचा ॥1॥
ह्मणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥
पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥2॥
तुका ह्मणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥3॥

2787
 गुरुशिष्यपण । हें तों अधमलक्षण ॥1॥
भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥
न कळतां दोरी साप। राहूं नेंदावा तो कांप ॥2॥
तुका ह्मणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥3॥

2788
 अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥1॥
अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥
ब्रह्महत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥2॥
तुका ह्मणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥3॥

2789
 धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥1॥
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥
रानीं वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥2॥
तुका ह्मणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥3॥

2790
 हा गे माझा अनुभव । भिHभाव भाग्याचा ॥1॥
केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥
घालोनियां भार माथा। अवघी चिंता वारली ॥2॥
तुका ह्मणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥3॥

2791
 देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुभिऩक्षा ॥1॥
नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥
वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥2॥
तुका ह्मणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥3॥

2792
 खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥1॥
आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥
बीज नेलें तेथें येइऩल अंकुर । जतन तें सार करा याची ॥2॥
तुका ह्मणे माझी नििंश्चतीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥3॥

2793
 शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥1॥
कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥
यYामुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥2॥
तुका ह्मणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥3॥

2794
 मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥1॥
या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥
रोजकीदव होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥2॥
तुका ह्मणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥3॥

2795
 स्मशानीं आह्मां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥1॥
नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥
झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तइप दान तुह्मीं केलें ॥2॥
तुका ह्मणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥3॥

2796
 आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥1॥
लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥
उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥2॥
तुका ह्मणे होय दरिद्र वििच्छन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥3॥

2797
 दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥1॥
अिग्न काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥
तुका ह्मणे मुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥2॥

2798
 नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥1॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥
सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥2॥
तुका ह्मणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥3॥

2799
 पुढें जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥1॥
येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥
होणारासी मिळे बुिद्ध । नेदी शुद्धी धरूं तें ॥2॥
तुका ह्मणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥3॥

2800
 ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥1॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥
नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥2॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंिद्रयें ॥3॥
कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥4॥
तुका ह्मणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥5॥

2801
 संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥1॥
ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥
संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥2॥
तुका ह्मणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥3॥

2802
 गेले पळाले दिवस रोज । काय ह्मणतोसि माझें माझें ॥1॥
सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥
कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥2॥
हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥3॥
तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥4॥
तुका ह्मणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥5॥

2803
 आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त॥1॥
फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥
प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥3॥

2804
 कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा॥1॥
अंगीं असोनियां बळ । होसी खटएाळ नाठएाळ ॥ध्रु.॥
आह्मां नरकासी जातां । काय येइल तुझ्या हातां ॥2॥
तुका ह्मणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥3॥

2805
 माझे पाय तुझी डोइऩ । ऐसें करिं गा भाक देइप ॥1॥
पाहतां तंव उफराटें । घडे तइऩ भाग्य मोठें ॥ध्रु.॥
बहु साधन मोलाच। यासी जोडा दुजें कैचें ॥2॥
नका अनमानूं विठ्ठला । तुका ह्मणे धडा जाला ॥3॥

2806
 पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥1॥
येर वेठएा पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥
जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥2॥
तुका ह्मणे चवी आलें । जें कां मििश्रत विठ्ठलें॥3॥

2807
 चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥1॥
अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥
काय नाहीं सत्ता। हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥2॥
तुका ह्मणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥3॥

2808
 बिळवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥1॥
पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥
आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥3॥

2809
 कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥1॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥
कैं भौज्य नानापरी । कैं कोरडएा भाकरी ॥2॥
कैं बसावें वहनीं । कैं पायीं अन्हवाणी ॥3॥
कैं उत्तम प्रावणॉ । कैं वसनें तीं जीणॉ ॥4॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥5॥
कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥6॥
तुका ह्मणे जाण । सुख दुःख तें समान ॥7॥

2810
 उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भH देखोनियां ॥1॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥
चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं विणी शेले ॥2॥
सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥3॥
नरहरिसोनारा घडों काुंफ्कुं लागे । चोख्यामेऑया संगें ढोरें ओढी ॥4॥
नामयाची जनी सवें वेची शेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥5॥
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । Yाानियाची भिंत अंगीं ओढी ॥6॥
अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥7॥
गौिळयांचे घरीं गाइऩ अंगें वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥8॥
यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥9॥
मिराबाइऩ साटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥10॥
घडी माती वाहे गो†या कुंभाराची। हुंडी महत्याची अंगें भरी ॥11॥
पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत । तुका ह्मणे मात धन्य याची ॥12॥

2811
 भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥1॥
पूणिऩमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥2॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥3॥
तुका ह्मणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥4॥

2812
 आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥1॥
वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटइऩल ॥ध्रु.॥
अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥2॥
तुका ह्मणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥3॥

2813
 करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥1॥
रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥
नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचिये वाणी गुण वदे ॥2॥
मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥3॥
उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥4॥
तुका ह्मणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुह्मां भिन्न नाहीं माझा ॥5॥

2814
 कां रे माझीं पोरें ह्मणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥1॥
कां रे गेलें ह्मणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥ध्रु.॥
कां रे माझें माझें ह्मणसील गोत । नो संडविती दूत यमा हातीं ॥2॥
कां रे मी बिळया ह्मणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥3॥
तुका ह्मणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाइप पांडुरंगा ॥4 ॥

2815
 अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥1॥
 ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥
 मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥2॥
 उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥3॥
 उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥4॥
 तुका ह्मणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥5॥

2816
 न मनीं ते Yाानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥1॥
 धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ध्रु.॥
 न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥2॥
 तुका ह्मणे तयां नमन बाहएात्कारी । आवडती परी चित्तशुद्धीचे ॥3॥

2817
 कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥1॥
 भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥
 काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥2॥
 काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥3॥
 काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुिद्ध ते ॥4॥
 तुका ह्मणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥5॥

2818
 अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥1॥
 संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥
 उचिताच्या कळा । नाहीं कळती सकळा ॥2॥
 तुका ह्मणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥3॥

2819
 शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥1॥
 होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥
 देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥2॥
 तुका ह्मणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥3॥

2820
 कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुह्मी देवा संतजन ॥1॥
 विचित्र विंदानी नानाकळा खेळ । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥
 काय वानरांची अंगींची ते शिH । उदका तरती वरी शिळा ॥2॥
 तुका ह्मणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥3॥

2821
 पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥1॥
 तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥
 काय उणें तुह्मां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥2॥
 तुका ह्मणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं॥3॥

2822
 वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥1॥
 सर्वसंकटाचा तुह्मां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
 एकसरें चिंता ठेवूनियां पायीं । जालों उतराइऩ होतों तेणें ॥2॥
 तुका ह्मणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥3॥

2823
 नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥1॥
 कृपेचा वोरस न समाये पोटीं । ह्मणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥
 तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥2॥
 परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥3॥
 तुका ह्मणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥4॥

1824
 काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥1॥
 काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥
 अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥2॥
 लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥3॥
 तुका ह्मणे स्तुति योग्य नाहीं परी । तुह्मां लाज थोरी अंकिताची ॥4॥

2825
 माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।
 पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥1॥
 काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।
 नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥
 काया वाचा मनें अघटित करणें चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥2॥
 लIमीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
 पितृवचन घडली अवYाा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥3॥
 आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।
 भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥4॥
 संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृिद्ध पापा ।
 तुका ह्मणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥5॥

2826
 फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥1॥
 जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥
 तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥2॥
 गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यH चांगलें ॥3॥
 नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥4॥
 निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥5॥
 आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥6॥
 तुका ह्मणे कंसा । आट भोविला वळसा ॥7॥

2827
 सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥1॥
 करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥
 उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥2॥
 तुका तेथें वारी ॥एकी आडोनि दुसरी ॥3॥

2828
 मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥1॥
केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥
न धरिती मनीं। कांहीं संकोच दाटणी ॥2॥
तुका ह्मणें देवें । ओस केल्या देहभावें ॥3॥

2829
 गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥1॥
बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥
गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥2॥
तुका ह्मणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥3॥

2830
 विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥1॥
खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥
तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥2॥
   तुका ह्मणे देवें । पूतना शोषियेली जीवें॥3॥ ॥5॥

2831
 प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें। शुद्धी देशकाळाची ॥1॥
मुH लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभH। जाले वोसंडत । नामकीतिऩपवाडे ॥ध्रु.॥
जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥2॥
हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका ह्मणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥3॥

2832
 तो चि लटिक्यामाजी भला । ह्मणे देव म्यां देखिला॥1॥
ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे ।
बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥
आणिक नाहीं जोडा । देव ह्मणवितां या मूढा ॥2॥
आणिकांचे न मनी साचें । तुका ह्मणे या श्रेष्ठांचें ॥3॥

2833
 होइऩल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥1॥
येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥
धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥2॥
तुका ह्मणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥3॥

2834
 कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥1॥
ह्मणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥
कथे कांहीं अणुमात्र। नो बोलावें हा वृत्तांत । देवभHां चित्त । समरसीं खंडणा ॥2॥
कां वैष्णवा पूजावें । ऐका घेइऩल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥3॥
ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥4॥
घालोनि लोळणा। तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥5॥

2835
 अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥1॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥
उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥2॥
तुका ह्मणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥3॥

2836
 साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥1॥
लोलुपता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ध्रु.॥
एकांतीीं लोकांतीं िस्त्रयांशीं वचन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥2॥
संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहनिऩशीं ॥3॥
तुका ह्मणे ऐसा साधनीं जो राहे । तो चि Yाान लाहे गुरुकृपा ॥4॥

2837
 अंतरींची ज्योती प्रकाशली दीिप्त । मुळींची जे होती आच्छादिली ॥1॥
तेथींचा आनंद ब्रह्मांडीं न माये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥
भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥2॥
तुरा ह्मणे आह्मां ब्रह्मांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥3॥

2838
 कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥1॥
कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥
नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निमिऩयेलें ॥2॥
तुका ह्मणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥3॥

2839
 प्रारब्धें चि जोडे धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥1॥
सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥
प्रारब्धें चि होय सुख। प्रारब्धें चि पावे दुःख ॥2॥
प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥3॥

2840
 हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥1॥
अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥
मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥2॥
राख राख गेलों वांयां । तुका ह्मणे पंढरीराया ॥3॥

2841
 तपाचे सायास । न लगे घेणें वनवास ॥1॥
ऐसें कळलें आह्मां एक । जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥
जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥2॥
तुका ह्मणे येणें । किळकाळ तें ठेंगणें॥3॥

2842
 माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥1॥
हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥
नागवी धावणें । तेथें साहए व्हावें कोणें ॥2॥
राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥3॥
तुझ्या केल्याविण । नव्हे िस्थर वश जन ॥4॥
तुका ह्मणे हरी। सूत्र तुह्मां हातीं दोरी॥5॥

2843
 गाऊं नेणें परी मी कांहीं गाइऩन । शरण जाइऩन पांडुरंगा ॥1॥
ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥
वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥2॥
चरणींच्या रजें अहिल्या तारिली। रूपवंत केली कुबजा क्षणें ॥3॥
पृथिवी तारिली पाताळासी जातां। तुका ह्मणे आतां आह्मी किती ॥4॥

2844
 गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥1॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥
अल्प असे Yाान । अंगीं ताठा अभिमान ॥2॥
तुका ह्मणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड॥3॥

2845
 परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥1॥
जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥
सोहोऑयाची िस्थती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥2॥
तुका ह्मणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥3॥

2846
 टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥1॥
अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥
मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥2॥
तुका ह्मणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥3॥

2847
 ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥1॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥
भांगभुकाऩ हें साधन। पची पडे मद्यपान ॥2॥
तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥3॥

2848
 जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥1॥
आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥
सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥2॥
तुका ह्मणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥3॥

2849
 अंधऑयाची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥1॥
हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥
साकर ह्मणोनि माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥2॥
तुका ह्मणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥3॥

2850
 प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेइऩ ॥1॥
तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥
वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥2॥
तुका ह्मणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥3॥

2851
 माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥1॥
आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥
वाचा वदे परी करणें कठीण । इंिद्रयां अधीन जालों देवा ॥2॥
तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥3॥

2852
 वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥1॥
उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥
त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वणिऩताती ॥2॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥3॥
तुका ह्मणे तुझी विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥4॥

2853
 नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥1॥
नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥2॥
तुका ह्मणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥3॥

2854
 जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥1॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥2॥
भूतदया गाइऩपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥3॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाइऩट । वाढवी महkव वडिलांचें ॥4॥
तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥5॥

2855
 हरि ह्मणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरि ह्मणतां ॥1॥
हरि ह्मणतां भुिH हरि ह्मणतां मुिH । चुके यातायाती हरि ह्मणतां ॥ध्रु.॥
तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि ह्मणतां ॥2॥
तुका ह्मणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥3॥

2856
 नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥1॥
पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥
नये काकुळती । कोणा यावें हरिभिH ॥2॥
तुका ह्मणे साइऩ । करील कृपेची विठाइऩ॥3॥

2857
 सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥1॥
रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥
रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥2॥
तुका लुटितां हे रंग । साहए जाला पांडुरंग ॥3॥

2858
 उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥1॥
मज दिलें कोणा हातीं । काय मानिली नििंश्चती ॥ध्रु.॥
कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं िस्थर ॥2॥
तुका ह्मणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥3॥

2859
 तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥1॥
नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥
धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥2॥
गुरुYाान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥3॥
बोल नाइऩके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥4॥
संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥5॥
कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल ह्मणे ॥6॥
केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥7॥
अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥8॥

2860
 आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥1॥
अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोइऩ दाढी ॥ध्रु.॥
बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥2॥
पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥3॥
भिHभावें विण । तुका ह्मणे अवघा सीण ॥4॥

2861
 तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥1॥
तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥
तुजलागीं आह्मी गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥2॥
तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कतृऩत्वासी ॥3॥
तुका ह्मणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥4॥

2862
 पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥1॥
करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥
जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥2॥
तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥3॥

2863
 दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥1॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥2॥
लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥3॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥4॥

2864
 लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥1॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वगाअ नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥2॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥3॥
तुका ह्मणे नामापाशीं चारी मुिH । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥4॥

2865
 लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥1॥
लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥
लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥3॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥3॥
लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥4॥

2866. जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥1॥
शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥
तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥2॥
पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥3॥
तुका ह्मणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥4॥

2867
 हे चि थोर भिH आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥1॥
ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥2॥
तुका ह्मणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥3॥

2868
 जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥1॥
मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥
ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥2॥
तुका ह्मणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥3॥

2869
 आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥1॥
मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥2॥
तुका ह्मणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥3॥

2870
 काय माझें नेती वाइऩट ह्मणोन । करूं समाधान कशासाटीं ॥1॥
काय मज लोक नेती परलोका । जातां कोणा एका निवारेल ॥ध्रु.॥
न ह्मणें कोणासी उत्तम वाइऩट । सुखें माझी कूट खावो मागें ॥2॥
सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥3॥
तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥4॥

देवांनीं स्वामींस चिंचवडास नेलें होतें ते अभंग, आरत्या ॥ 13 ॥
2871
 वांजा गाइऩ दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥1॥
ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥
चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥ ॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥3॥
तुका ह्मणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥4॥

2872. परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥1॥
न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥
पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी आह्मां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥3॥

2873
 चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥1॥
देव ह्मणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥2॥
तुका ह्मणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥3॥

2874
 भोHा नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥1॥
भर्ता आणि भोHा कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥2॥
कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भHांचें तुका ह्मणे ॥3॥

2875
 माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥1॥
तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥3॥

2876
 वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥1॥
स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥
सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥2॥
तुका ह्मणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥3॥

2877
 आह्मां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥1॥
वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥2॥
तुका ह्मणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥3॥

2878
 सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥1॥
संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥
समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची॥2॥
तुका ह्मणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥3॥

2879
 काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥1॥
ह्मणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥
काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥2॥
कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । ह्मणतां हरि हरि तुका ह्मणे॥3॥

2880
 उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥1॥
नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥
उमटती ठसे । ब्रह्मप्रािप्त अंगीं दिसे ॥2॥
   भाविक विश्वासी।तुका ह्मणे नमन त्यांसी॥3॥ ॥10॥

2881
 ज्यासी नावडे एकादशी । तो जिता चि नरकवासी॥1॥
ज्यासी नावडे हें व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥ध्रु.॥
ज्यासी मान्य एकादशी । तो जिता चि मुHवासी ॥2॥
ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णुपाशीं ॥3॥
तुका ह्मणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥4॥

2882
 मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी॥1॥
वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥
जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥2॥
पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥3॥
प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥4॥
ब्रह्मYाान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥5॥
मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥6॥
तुका ह्मणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥7॥

2883
 भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥1॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥
चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥2॥
तुका ह्मणे मन । असों द्यावें समाधान॥3॥

2884
 आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥1॥
नेइऩल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुिश्चता हरिविण ॥ध्रु.॥
कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥2॥
राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥3॥
तुका ह्मणे किती करिसी लंडायी । होइऩल भंडाइऩ पुढें थोर ॥4॥

2885
 होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥1॥
हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोइऩ ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥
आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥2॥
तुका ह्मणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥3॥

2886
 नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥1॥
फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥2॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥3॥
बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥4॥
तुका ह्मणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥5॥

2887
 संत गाती हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥1॥
हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥
काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥2॥
संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥3॥
तुका ह्मणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥4॥

2888
 जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥1॥
आतां वाणी काशासाटीं । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥
आपुल्या संकोचें । ह्मणऊनि तेथें टांचे ॥2॥
घेतों ख†या मापें । तुका देखोनियां सोपें ॥3॥

2889
 शुद्ध ऐसें ब्रह्मYाान । करा मन सादर ॥1॥
रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥
कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥2॥
सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं॥3॥

2890
 अिग्न हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तो चि तापे जाणोनियां ॥1॥
उदक ह्मणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥
काय वस्त्र ह्मणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥2॥
तुक्यास्वामी ह्मणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥3॥

2891
 भH देवाघरचा सुना । देव भHाचा पोसणा ॥1॥
येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥
देव भHाची कृपाळु माता । भH देवाचा जनिता ॥2॥
तुका ह्मणे अंगें । एक एकाचिया संगें ॥3॥

2892
 बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥1॥
ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥
सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥2॥
तुका ह्मणे अंतीं । ठाव मागितला संतीं॥3॥

2893
 मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥1॥
जे जे हरिरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥
वेद खाय शंखासुर। त्याचें वागवी कलिवर ॥2॥
तुका ह्मणे ऐसा । बराडी हा भिHरसा॥3॥

2894
 कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥1॥
कैंचा राम अभागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥
स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥2॥
तुका ह्मणे जडा । काय चाले या दगडा॥3॥

2895
 आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥1॥
तुह्मां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥
तुह्मी देहशून्य। आह्मां कळे पाप पुण्य ॥2॥
सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥3॥

2896
 मायबापें केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी॥1॥
पुंडलीकें काय केलें । परब्रह्म उभें ठेलें ॥ध्रु.॥
तैसा होइप सावधान। हृदयीं धरीं नारायण ॥2॥
तुका ह्मणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥3॥

2897
 सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥1॥
ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥
देतों तीIण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥2॥
तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥3॥

2898
 शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥1॥
त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥
तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥2॥
मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥3॥
जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥4॥
तुका ह्मणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥5॥

2899
 सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥1॥
रविरिश्मकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥
दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥2॥
तुका ह्मणे चित्त । माझें पायीं अखंडित॥3॥

2900
 तुह्मां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥1॥
फुकासाटीं जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥
कृपेचें भुकेलें। होय जीवदान केलें ॥2॥
तुका ह्मणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें॥3॥

2901
 लोक ह्मणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥1॥
आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥
अधिकार नाहीं। पूजा करिती तैसा कांहीं ॥2॥
मन जाणे पापा । तुका ह्मणे मायबापा॥3॥

2902
 एका ह्मणे भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥1॥
कांहीं न करितां आयास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥
बरें वाइटाचें। नाहीं मज कांहीं साचें ॥2॥
तुका ह्मणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं॥3॥

2903
 आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥1॥
मज आपुलेंसें ह्मणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥
वेचियेली वाणी । युHी अवघी चरणीं ॥2॥
तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय॥3॥

2904
 न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥1॥
जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥2॥
तुका ह्मणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥3॥

2905
 तुझ्या नामाची आवडी । आह्मी विठो तुझीं वेडीं॥1॥
आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥
काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥2॥
संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥3॥
तुका ह्मणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥4॥

2906
 साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥1॥
तैसें आह्मां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥
फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥2॥
रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥3॥
देवा देवपाट देव्हा†यावरी बैसे स्पष्ट॥4॥
ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥5॥

2907
 धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥1॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥
जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥2॥
सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें॥3॥
तुका ह्मणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥4॥

2908
 न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥1॥
केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥
करावें लाताळें। ऐसें नेणे कोण्या काळें ॥2॥
न कळे उचित । तुका ह्मणे नीत हित॥3॥

2909
 कंठ नामसिका । आतां किळकाळासी धका ॥1॥
रोखा माना कीं सिका माना । रोखा सिका तत्समाना ॥ध्रु.॥
रोखा न मना सिका न मना । जतन करा नाककाना ॥2॥
सिका न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥3॥
सिका मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥4॥
तुका ह्मणे नाम सिका । पटीं बैसलों निजसुखा॥5॥

2910
 भूतीं देव ह्मणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥1॥
जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥
दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां॥3॥

2911
 हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥1॥
पावलें तें ह्मणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥
होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥2॥
तुका ह्मणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥3॥

2912
 नेसणें आलें होतें गऑया । लोक रऑया करिती॥1॥
आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥
संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥2॥
 भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥3॥
 सावरिलें नीट वोजा । दृिष्टलाजा पुढिलांच्या ॥4॥
 बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥5॥
 तुका ह्मणे विटंबना । नारायणा चुकली ॥6॥

2913
 जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न कळे ॥1॥
 देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥
 परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥2॥
 एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥3॥
 तुका ह्मणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥4॥

2914
 न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥1॥
 मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥2॥
तुका ह्मणे कइप होइऩल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥3॥

2915
 मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आह्मी तरी फुका मागों बळें ॥1॥
नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
नेदूं भोग आह्मी आपुल्या शरीरा । तुह्मांसी दातारा व्हावें म्हूण ॥2॥
कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे तुज काय मागों आह्मी । फुकाचे कां ना भी ह्मणसी ना ॥4॥

2916
 काय लवण किळकेविण । एके क्षीण सागरा ॥1॥
मां हे येवढी अडचण । नारायणीं मजविण ॥ध्रु.॥
कुबेरा अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥2॥
तुका ह्मणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥3॥

2917
 तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥1॥
तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥
मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥2॥
मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ॥3॥
तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥4॥
तुका ह्मणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥5॥

2918
 वैराग्याचें भाग्य । संतसंग हा चि लाग ॥1॥
संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥
तो चि देवभH । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥2॥
तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥3॥

2919
 जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥1॥
राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां॥2॥
तुका ह्मणे मुिH हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠिद्धसििद्ध ॥3॥

2920
 नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्तीं असों द्यावी ॥1॥
सरलिया भोग येइऩन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥
आतां मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥2॥
तुका ह्मणे मुखीं असो तुझें नाम । देइऩल तो श्रम देवो काळ ॥3॥

2921
 हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥1॥
नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥
केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥2॥
तुका ह्मणे खिजों । नका जागा येथें निजों ॥3॥

2922
 संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण॥1॥
नाहीं आह्मांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥
द्वैताद्वैतभावें। अवघें व्यापियेलें देवें ॥2॥
तुका ह्मणे हरि । आह्मांमाजी क्रीडा करी ॥3॥

2923
 नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥1॥
धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥
क्रियाकर्महीन । जालों इंिद्रयां अधीन ॥2॥
तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी॥3॥

2924
 जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥1॥
तो एक पंढरीचा राणा । नये श्रुती अनुमाना ॥ध्रु.॥
विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥2॥
तुका ह्मणे तो आकळ । आहे सकळव्यापक॥3॥

2925
 नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥1॥
जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥
नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥2॥
नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी॥3॥
तुका ह्मणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥4॥

2926
 आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥1॥
खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥
आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥2॥
जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥3॥
तुका ह्मणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥4॥

2927
 आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥1॥
येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥
भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥2॥
तुका ह्मणे रंग रंग । रंगलें पांडुरंगे ॥3॥

2928
 आळस पाडी विषयकामीं । शHी देइप तुझ्या नामीं॥1॥
हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥ध्रु.॥
आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गजाॉ द्यावी गुणीं ॥2॥
तुका ह्मणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥3॥

2929
 कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥1॥
आतां हें चि काम करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥
नेंदाविया वृित्त। आतां उठों चि बहुती ॥2॥
उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥3॥

2930
 मागेन तें एक तुज । देइप विचारोनि मज ॥1॥
नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥
जन्म घेइऩन मी नाना । बहु सोसीन यातना ॥2॥
रंक होइऩन दीनांचा । घायें देहपात साचा॥3॥
तुका ह्मणे हें चि आतां । देइप देइप तूं सर्वथा ॥4॥

2931
 जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥1॥
तरि म्यां बोलावें तें काइऩ । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥
पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥2॥
तुका ह्मणे सत्ता । होसी सकळ करिता॥3॥

2932
 तुह्मी कांटाळलां तरी । आह्मां न सोडणें हरी ॥1॥
जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥
केली जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥2॥
तुका ह्मणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥3॥

2933
 येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥1॥
नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥
कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥2॥
तुका ह्मणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥3॥

2934
 सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥1॥
सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥2॥
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥3॥

2935
 काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥1॥
काय ऐसा भH वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥
काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥2॥
कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥3॥
तुका ह्मणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥4॥

2936
 आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥1॥
समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥
चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥2॥
तुका ह्मणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥3॥

2937
 आह्मी मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची ॥1॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥
बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥2॥
पाप पुण्य ज्याचें तो चि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आह्मांसवें ॥3॥
तुका ह्मणे तुह्मी आइका हो मात । आह्मी या अतीत देहाहूनी ॥4॥

2938
 लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥1॥
परनारी मज रखुमाइऩसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥2॥
तुका ह्मणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥3॥

2939
 हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥1॥
सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥
दुरील जवळी आपण चि होतें । कविळलें चित्तें जिवापासीं ॥2॥
तुका ह्मणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥3॥

2940
 आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥1॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥2॥
तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥3॥

2941
 हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥1॥
बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥
द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥2॥
तुका ह्मणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥3॥

2942
 ऐसा घेइप कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास॥1॥
मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोइऩ ॥ध्रु.॥
तोडीं जाणिवेची कळा । होइप वृत्तीसी वेगळा ॥2॥
तुका ह्मणणे नभा । होइप आणुचा ही गाभा ॥3॥

2943
 सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापें ॥1॥
ऐसे तुह्मां ठायाठाव । देव ह्मुण संपादे ॥ध्रु.॥
कैची चिरामध्यें चिरे। मना बरें आलें तें ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा॥3॥

2944
 इहलोकीं आह्मां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥1॥
निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥2॥
तुका ह्मणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥3॥

2945
 आह्मी भाग्याचे भाग्याचे । आह्मां तांबे भोपऑयाचे॥1॥
लोकां घरीं गाइऩ ह्मैसी । आह्मां घरीं उंदीरघुसी ॥ध्रु.॥
लोकां घरीं हत्ती घोडे । आह्मां आधोडीचे जोडे ॥2॥
तुका ह्मणे आह्मी सुडके। आह्मां देखोन काळ धाके ॥3॥

2946
 गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि ह्मणें हरी॥1॥
माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥
मज हंसतील लोक । परि मी गाइऩन निःशंक ॥2॥
तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥3॥
तुका ह्मणे माझी विनंती । तुह्मी परिसा कमळापती ॥4॥

2947
 विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥1॥
पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥
चंदन िप्रय वासें । आवडे तें जातीऐसें ॥2॥
तुका ह्मणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना॥3॥

2948
 देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥1॥
तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥
सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥2॥
तुका ह्मणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥3॥

2949
 मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥1॥
तुह्मी अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥
तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥2॥
तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥3॥

2950
 जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥2॥
मैथुनाचें सुख सांगितल्या शून्य । अनुभवाविण कळूं नये ॥2॥
तुका ह्मणे जळो शािब्दक हें Yाान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥3॥

2951
 अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥1॥
अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥
कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥2॥
तुका ह्मणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥3॥

2952
 तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥1॥
मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥
नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥2॥
तुका ह्मणे बिळये गाढे । किळकाळ पायां पडे ॥3॥

2953
 माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां॥1॥
आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥
तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥2॥
तुका ह्मणे देवा । देइप चरणांची सेवा ॥3॥

2954
 अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥1॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥
अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥2॥
तुका ह्मणे जवळी आलें। उभे ठालें समचरणीं ॥3॥

2955
 देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराइऩ ॥1॥
आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥
बहु अपराधी । मतिमंद हीनबुिद्ध ॥2॥
तुका ह्मणे नेणें । भावभHीचीं लक्षणें ॥3॥

2956
 जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥1॥
जाल्या हीन शिH नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥
बाइल ह्मणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥2॥
तुका ह्मणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥3॥

2957
 जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥1॥
मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥
ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥2॥
देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नऴिचया सृिष्ट चेविल्या जेवीं ॥2॥
तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥4॥

2958
 विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥1॥
कइप कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥
जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥2॥
तुका ह्मणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥3॥

2959
 ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण॥1॥
साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥ध्रु.॥
काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥2॥
तुका ह्मणे निरंजनी। शट कैंचा ब्रह्मYाानी ॥3॥

2960
 वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥1॥
राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥
आशा धरोनि मनीं । कांहीं देइऩल ह्मणऊनि ॥2॥
पोटा एका साटीं । तुका ह्मणे जाले कष्टी ॥3॥

2961
 प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥1॥
ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥
पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥2॥
लटिकें तें फेडा । तुका ह्मणे जाय पीडा॥3॥

2962
 ऐका कलीचें हें फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ ॥1॥
चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंHी ॥ध्रु.॥
पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥2॥
वामकवळ मार्जन । जन जाइऩल अधोपतन ॥3॥
तुका हरिभिH करी । शिH पाणी वाहे घरीं॥4॥

2963
 गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । ह्मणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥1॥
पवित्राला ह्मणती नको हा कंटक । मानिती आित्मक अनामिका ॥ध्रु.॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥2॥
कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥3॥
नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥4॥
इंिद्रयांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥5॥
नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥6॥
तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥7॥

2964
 बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥1॥
माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥
व्याली वाढविलें। निजपदीं निजवलें ॥2॥
दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रह्मरसें ॥3॥
विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥4॥
तुका ह्मणे बळ । तोरडीं हा किळकाळ ॥5॥

2965
 सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥1॥
आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाइऩच्या वरा ॥ध्रु.॥
परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥2॥
तुका ह्मणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥3॥

2966
 तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥1॥
तुझ्या नामाचा विश्वास । आह्मां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥
तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥2॥
नाम घ्या रे कोणी फुका। भावें सांगतसे तुका ॥3॥

2967
 बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥1॥
घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥
आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥2॥
तुका ह्मणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥3॥

2968
 बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥1॥
कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडएांच्या ॥ध्रु.॥
वाइलेच्या मना येइऩल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥2॥
तुका ह्मणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुत†याचें खाणें लगबगा ॥3॥

2969
 जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥1॥
करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥
तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥2॥
तुका ह्मणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥3॥

2970
 कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥1॥
हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥
तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें॥2॥
संशयाचें बि†हडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥3॥
तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आह्मी भार वाहिका ॥4॥


2971
 झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥1॥
काय तें उचित तुह्मां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेइऩन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥2॥
तुका ह्मणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥3॥


2972
 नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा॥1॥
हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभHाची ॥ध्रु.॥
ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥2॥
नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥3॥
तुका ह्मणे त्याचे दिवशीं। रांड गेली महारापाशीं ॥4॥

2973
 पतित मी पापी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥1॥
तारियेले भH न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥
द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥2॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥3॥
सुदामा ब्राह्मण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥4॥
तुका ह्मणे तुज शरण निजभावें । पाप निदाऩळावें पांडुरंगा ॥5॥

2974
 कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥1॥
आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥
काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥2॥
फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥ ।3॥
तुका ह्मणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य ॥4॥

2975
 नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाइऩक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥1॥
तुह्मां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥
शिHहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥2॥
तुका ह्मणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥3॥

2976
 पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥1॥
होइऩल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥
एखादा अंगासी येइऩल प्रकार । विचारितां फार युिH वाढे ॥2॥
तुका ह्मणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥3॥

2977
 पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥1॥
तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥
दिसतो हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥2॥
ह्मणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका। जो या लोकां दाखवितो ॥3॥


2978
 दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे॥1॥
ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥
आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥2॥
काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥3॥
तुज ठावें आह्मां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण॥4॥
कान्हा ह्मणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥5॥

2979
 सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥1॥
पावलों आपुलें केलें लाहें रास । निद।वां परिस काय होय ॥ध्रु.॥
कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥2॥
उचित अनुचित सांभािळलें नाहीं । कान्हा ह्मणे कांहीं बोलों आतां ॥3॥

2980
 असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येइल येथें ॥1॥
करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥ध्रु.॥
करितां रोदना बापुडें ह्मणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥3॥

2981
 चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥1॥
कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥ध्रु.॥
न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सkवा होइल हानी ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥3॥

2982
 न लगे चिंता आतां अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥1॥
घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ध्रु.॥
त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥3॥

2983
 मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥1॥
ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु.॥
वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे आलें अनुभवास । तेणें च आह्मांस नागविलें ॥3॥

2984
 बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥1॥
एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मां ॥2॥
कान्हा ह्मणे कां रे निःकाम देखिलें । ह्मणोनि मना आलें करितोसी ॥3॥

2985
 धिंदधिंद तुझ्या करीन धिंदडएा । ऐसें काय वेडएा जाणितलें ॥1॥
केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥ध्रु.॥
मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥3॥

2986
 भुिH मुिH तुझें जळों ब्रह्मYाान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥1॥
रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥
नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥2॥
नको होऊं कांहीं होसील प्रसन्न। दे माझ्या आणून भावा वेगीं ॥3॥
तुकयाबंधु ह्मणे पाहा हो नाहींतरी । हत्या होइऩल शिरीं पांडुरंगा ॥4॥

2987
 मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥1॥
नको लावूं आह्मां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥
साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेइऩन मी ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥3॥

2988
 नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥1॥
मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी॥ध्रु.॥
तुह्मां आह्मां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे॥3॥

2989
 लालुचाइऩसाटीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥1॥
असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ध्रु.॥
मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥2॥
करुणारसें तुकयाबंधु ह्मणे भुलवीन । काढूनि घेइऩन निज वस्तु ॥3॥

2990
 तुझीं वर्में आह्मां ठावीं नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥1॥
मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी ॥ध्रु.॥
जाणोनि अYाान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥3॥

2991
 अवघीं तुज बाळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥1॥
ह्मणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दुरी ॥ध्रु.॥
एकां सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एक दारीं गळा श्रमविती ॥2॥
एकां नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्नें करितील ॥3॥
एकें वाटतील न वजावीं दुरी । एकांचा मत्सर जवळी येतां ॥4॥
तुकयाबंधु ह्मणे नावडतीं त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥5॥

2992
 निनांवा हें तुला । नांव साजे रे विठ्ठला ।
 बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥1॥
कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें ।
 भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥
मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे ।
 हातीं फांशाचे गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥2 ॥
 तुकयाबंधु ह्मणे मििस्कन । करितोसी देखोन ।
 पाहा दुरिवरी वििच्छन्न । केला परी संसार ॥3॥

2993
 नाहीं घटिका ह्मणसी । लाग लागला तुजपाशीं ।
 पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥1॥
माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन ।
 माणसांमधून । उठविलें खाणो†या ॥ध्रु.॥
आह्मीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि ।
 जालासी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे केलें। उघडें मजचि उमगिलें ।
 ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें॥3॥

2994
 कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । ह्मणवितोसी परि केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥1॥
काय केलें होतें आह्मीं । सांग तुझें एकये जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया॥ध्रु.॥
भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे भला । कैसें ह्मणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहींतरी॥3॥

2995
 आतां कळों आले गुण । अवघे चि यावरोन । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥1॥
या नांवें कृपासिंधु । ह्मणवितोसी दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ध्रु.॥
अमळ दया नाहीं पोटीं । कठीण तैसाचि कपटी । अंधऑयाची काठी । माझी गुदरसी च ना ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे पुरता । नाहीं ह्मुण बरें अनंता। एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥3॥

2996
 काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा । गिळावासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥1॥
माझें बुडविलें घर। लेंकरें बाळें दारोदार । लाविलीं काहार । तारातीर करोनि ॥ध्रु.॥
जीव घ्यावा कीं द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें उरलें आहे। भावाचिया निमित्यें ॥2॥
तुकयाबंधु ह्मणें जग । बरें वाइऩट ह्मणो मग । या कारणें परी लाग । न संडावा सर्वथा ॥3॥

2997
 मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाइऩ ॥1॥
हे कां भिHचे उपकार। नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे जालासी ॥ध्रु.॥
एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो निर्लज्जा ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे भला । आणीक काय ह्मणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥3॥

2998
 पूवाअ पूर्वजांची गती । हे चि आइऩिकली होती । सेवे लावूनि श्रीपती । नििंश्चती केली तयांची ॥1॥
कां रे पाठी लागलासी। ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती ह्मुण ॥ध्रु.॥
जन्मजन्मांतरीं दावा । आह्मां आपणां केशवा । निमित्य चालवा । काइऩसयास्तव हें ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥3॥

2999
 निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥1॥
ऐसा काढियेला निस । काय ह्मुण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे॥ध्रु.॥
उरलों पालव्या सेवटीं । तें ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे गोड । बहु जालें अति वाड । ह्मणोनी कां बुड । मुऑयांसहित खावें ॥3॥

3000
 बरा जाणतोसी धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती। करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥1॥
आतां जाब काय कैसा। देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ध्रु.॥
सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अYाानत्व । येइल परि हा भाव। ज्याचा त्यासी कारणा ॥2॥
तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां आह्मां बोल कांहीं । जडोनियां पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥3॥

तुकाराम गाथा

संत तुकाराम
Chapters
गाथा १ ते ३०० गाथा ३०१ ते ६०० गाथा ६०१ ते ९०० गाथा ९०१ ते १२०० गाथा १२०१ ते १५०० गाथा १५०१ ते १८०० गाथा १८०१ ते २१०० गाथा २१०१ ते २४०० गाथा २४०१ ते २७०० गाथा २७०१ ते ३००० गाथा ३००१ ते ३३०० गाथा ३३०१ ते ३६०० गाथा ३६०१ ते ३७०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३७०१ ते ३८०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३८०१ ते ३९०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३९०१ ते ४००० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४००१ ते ४१०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४१०१ ते ४२०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४२०१ ते ४३०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४३०१ ते ४४०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४४०१ ते ४५०० तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४५०१ ते ४५८३