अनंतचे गुप्त साहित्य
दुसऱ्या दिवशी सकाळी दार ठोठावल्याच्या आवाजाने सोनाली पर्रीकर झोपेतून जाग्या झाल्या. दाराच्या फटीतून आलेला एक लिफाफा सापडला. त्यांनी लिफाफा उघडला. लिफाफ्यात त्यांच्या सत्राच्या वेळेचा तपशील होता. बाहेर खूप उजेड होता. त्यांनी केजीबीला उठवले.
न्याहारी झाल्यावर डॉ.पर्रीकर आणि डॉ. मेहता डॉ. चंदावरकरांच्या कॅबीनकडे गेले, तर बाकीचे सर्वजण चौकशी कक्षाच्या दिशेने गेले.
तिकडे रणधीरही डॉ. चंदावरकरांच्या खोलीत उपस्थित होता. हातात दोन मोठ्या आकाराच्या पेट्या घेऊन दोन बंदूकधाऱ्यांसह तो तिथे आला होता. ते अनंतचे लॉकर्स होते.
"ते इथेच उघडा." डॉ.चंदावरकर यांनी रणधीर यांना आदेश दिला.
समोर पेट्या उघडताच सगळेच अवाक झाले. या बॉक्समध्ये इतिहासाची नोंद होण्या आधीच्या काही नोंदी होत्या. दूरच्या प्रदेशात जतन केलेले ते लेखन होते. बहुतेक संस्कृतमध्ये, काही हिंदी आणि प्राकृतमध्ये लिहिलेले गेले होते. कागद आज आपण पाहतो तसे कागद नव्हते. ते भूर्जपत्र आणि ताम्रपत्र होते. प्रत्येक पत्रावर शीर्षक रुपात एक नाव लिहिलेले होते. ती अनंतने दावा केलेली नावे होती.
पेटीत एक प्राचीन खलबत्ता सुद्धा सापडला. याशिवाय काही आकाराने मोठ्या आणि जड अंगठ्या सापडल्या, ज्या आजकाल वापरत नाहीत किंवा सहज मिळत देखील नाहीत. वेगवेगळ्या शासनकाळात व्यापारासाठी वापरलेली प्राचीन आणि दुर्मिळ नाणी सापडली. देवनागरी, उर्दूमध्ये लिहिलेली पत्रे आढळून आली होती.
रणधीर पुढे म्हणाला ."सर, मला या लॉकरमध्ये आणखी एक गोष्ट सापडली आहे, जी मी थेट तुम्हाला देण्यासाठी राखून ठेवली आहे.”
त्याने एक आयताकृती चामड्याचा तुकडा आणि विचित्र आकराच्या धातूच्या वस्तू आणि एक चकचकीत बाटली समोर ठेवली.
“हा एक नकाशा आहे, हे काही धातूचे तुकडे आणि हि पाऱ्याची बाटली. आणि हो ...एक पुस्तक आहे."
ते पुस्तक पाने आणि पांढऱ्या कपड्याने बांधलेले होते, त्यावर रक्ताच्या खुणा होत्या. पुस्तकावर धातूची मोहोर होती त्यावर काही अक्षरे कोरली होती.
डॉ.मेहता यांनी पुस्तक हातात घेतले आणि मधूनच पाने उलटायला सुरुवात केली. पुस्तकातील काही चित्रे पाहून त्यांनी डोळे आश्चर्याने विस्फारले. काहीतरी शोधत असल्यासारखे ते पाने उलटत होते.
त्यांनी वळून डॉ. चंदावरकरांकडे पाहिलं तर त्यांनी इशारा म्हणून हात पुढे केला. डॉ.मेहता यांना आणखी पाने पहायची होती, पण त्यांनी ते पुस्तक डॉ. चंदावरकरांकडे दिले.
"वाचन चळवळ करून झाली असेल तर आपण काम करायचं का, मेहता?" डॉ.चंदावरकर उपहासात्मक स्वरात म्हणाले.
डॉ.मेहता यांनी धातूचा तुकडा आणि नकाशा पाहिला. डॉ चंदावरकर म्हणाले, "हो, नकाशा आहे, पण कसला?"
“उत्तर इथे आत खोलीतच आहे. चला, त्याला थेट विचारूया. सोनाली पर्रीकर यांनी सुचवले.
“नाही नाही , इतक्या घाईत नको. हे सर्व आपल्या ताब्यात आहे त्याला हे कळू नये. आधी त्याला विचारण्यासाठीच्या प्रश्नांची यादी तयार करा.” चंदावरकर यांनी आदेश दिले.
"ठीक आहे सर." डॉ. पर्रीकर.
"केजीबीला माझ्या कॅबीन मध्ये पाठवा. रणधीर तुम्ही सेफ्टी साठी यांच्यासोबत राहा. डॉ. सोनाली, मी तिकडे येईपर्यंत सेशन सुरू करू नका.” डॉ.चंदावरकर म्हणाले.
त्यांनी दोघांनी होकार दिला आणि ते निघून गेले आणि डॉ. चंदावरकर केजीबीची वाट बघत बसले.
डॉक्टर मेहता जवळजवळ धावतच खोलीत शिरले. त्यांनी गोंधळलेल्या नजरेने अनंतकडे पाहिलं आणि परत आपल्या जागेवर जाऊन कॉम्प्युटरवर काम करू लागले. डॉ. पर्रीकर यांनी डॉ.मेहता यांच्याकडे बघितले असता ते चांगलेच व्यस्त दिसून आले. ते कुतूहलाने कॉम्प्युटरवर काहीतरी शोधत होते.
चिंता व्यक्त करत त्यांनी विचारले, "डॉ. मेहता, काय करताय?"
डॉ.मेहता यांनी स्क्रीनवरून डोळे न काढता आपले काम चालू ठेवले.
“तुम्ही ठीक तर आहात ना? बघा, आम्हा सर्वांनाही धक्का बसला आहे आणि आश्चर्यही आहे...”
“एक मिनिट थांबा जरा....” डॉ. मेहता यांनी डॉ. सोनाली यांना हाताने इशारा करून गप्प बसवले आणि आपले काम चालू ठेवले.
डॉ.सोनाली यांना वाईट वाटलं, पण तरीही ती काही क्षण त्या त्यांच्या टेबलजवळ थांबल्या आणि मग तिथून जाऊ लागल्या. डॉ.मेहता यांनी त्यांना परत बोलावले.
“अहो डॉ.सोनाली..!...हे बघा ”
त्या थांबल्या. त्यांची नजर फक्त स्क्रीनवर होती.
"हे पहा." डॉ.मेहता यांनी मॉनीटर त्यांच्या दिशेने सरकवला.
"हे काय आहे?"
डॉ.मेहता समजावून सांगू लागले,
“आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ‘माइटोकॉन्ड्रिया’ नावाची सूक्ष्म इंजिन असतात, जी आपल्याला आवश्यक असलेली ऊर्जा पुरवतात. जेव्हा ही इंजिने झिजायला लागतात, तेव्हा आपले शरीर कमकुवत होऊ लागते आणि वय वाढू लागते. याचा अर्थ असा आहे की जर हे मायटोकॉन्ड्रिया पुन्हा निर्माण होऊ शकले तर शरीर सरासरी माणसापेक्षा जास्त काळ जगू शकते." डॉ.मेहता यांनी स्पष्ट केले.
“म्हणजे अनंतच्या शरीरातली ही छोटी इंजिने कधीच मेली नाहीत असे तुम्हाला म्हणायचे आहे?” डॉ.सोनाली पर्रीकर यांनी विचारले.
मेहता यांनी हे प्रकरण आणखी एका विस्ताराने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,
"आज शास्त्रज्ञांनी यीस्टचे आयुष्य वाढवण्याचा मार्ग शोधला आहे, जे सहसा ६ दिवस असते, ते १० आठवडे होणे शक्य आहे. हे वाढीव १० आठवडे मानवी आयुष्याच्या ८०० वर्षां इतके आहेत. जेव्हा २ जीन आर.ए.एस आणि २ जीन एस.सी.एच डीएनएला जर काढून टाकले तर यीस्टचे आयुष्य वाढते. आणि जेव्हा हे जनुक उंदरामधून काढून टाकले जाते तेव्हा त्याचे आयुष्य दुप्पट होते.” डॉ.मेहता
“मग?” डॉ. सोनाली पर्रीकर यांनी विचारले.
“मानवी शरीरात आयुर्मान वाढवणारी विविध प्रकारची जनुके सापडलेली आहेत. पण माझी चिंता वेगळीच आहे. आपण मानवांबद्दल हा दावा करण्याआधी विज्ञानाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि माझी चिंता अनंतच्या दाव्याच्या अगदी उलट आहे."
"तुम्ही त्याला अजूनही भ्रामक समजता का?" डॉ.सोनाली पर्रीकरने विचारले आणि थोड्या विरामानंतर त्या म्हणाल्या,
“हे बघा डॉ. मेहता, त्याच्यावर विश्वास न ठेवण्याची आपल्याकडे बरीच कारणे आहेत, पण त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित न करण्याची माझ्याकडे हजारो कारणे आहेत.”
"मला त्याच्या रक्ताच्या नमुन्याची गरज आहे." डॉ.मेहता यांनी ठामपणे सांगितले.
सोनाली पर्रीकर यांनी असहमतीने मान हलवली, “डॉ. चंदावरकर हे तुम्हाला कधीही करू देणार नाहीत.”
दरम्यान, डॉ.चंदावरकर आणि केजीबी त्यांच्या कॅबीनमध्ये बोलत होते.
त्यांनी तिच्यासमोर तो नकाशा पसरवला आणि विचारले,
“तुम्ही निःसंशयपणे सर्वोत्तम आहात हे सिद्ध करू शकता का? तुमच्याकडे हे कोडे सोडवण्यासाठी ६ तास आहेत, या नकाशाचे स्थान शोधून काढायचे आहे आणि ते आम्हाला पुढे कुठे घेऊन जाईल हे सांगायचे आहे.”
केजीबीला हे आव्हान आवडले. तिने ते मोकळ्या मनाने स्वीकारले, कारण तिला तिच्या क्षमतेची चाचणी घेण्याची आणि नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळाली होती. तिला स्वतःचा अभिमान वाटला. तिचेडोळे उत्साहाने चमकले.
तिने त्यांच्याकडून तो नकाशा घेतला आणि वळून बाहेर जाऊ लागली. डॉ चंदावरकर शांत स्वरात म्हणाले,
“केजीबी, ऑल द बेस्ट. तुमची वेळ सुरू झाली आहे... आता!”
काही वेळाने डॉ.चंदावरकर इंट्रोगेशन चेंबर मध्ये दाखल झाले.
क्रमश: