तारा
येथे वानर स्त्रियांची क्षमता दर्शविणारा एक पुरावा सादर केला आहे, त्यात ताराच्या योग्यतेबद्दल लिहिले आहे.
सुषेण दुहिता चेयम अर्थ सूक्ष्म विनिश्चये ।
औत्यातिकेच विधेसर्वत परिनिष्ठता ।।१३
शो यदेपा साध्विति यात्कार्य तन्मुक्त सशम्य ।
नाही तोश्रीरामत किंचिदन्ययी परिवर्तते ॥१४
(वाल्मिकी रामायण किष्किंधाकाण्ड सर्ग २२)
सुग्रीवा! सुषेण राजकन्या तारा तुमच्या समोर बसली आहे. तिच्यातील क्षमता तुम्हाला माहीत आहे, अत्यंत सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे राजकीय प्रश्न सोपे करण्यात आणि अनेक राजकीय रहस्ये उकलून राज्याला सुव्यवस्थित चालविण्याच्या कामात ती अतिशय कुशल आहे. ज्या कामात ती रस घेईल, ते ती नक्कीच पूर्ण करेल आणि ती कधीही अपयशी ठरणार नाही.
भारतातील महान स्त्रियांमध्ये राज्य कारभारात सल्ला देण्यासारखे आणि कठीण गोष्टींवर निर्णय घेण्यासारखे गुण असायचे. हा गुण प्राणी प्रजातीतील माकडांमध्ये असणे कधीच शक्य नव्हते आणि होणारही नाही.