Get it on Google Play
Download on the App Store

हनुमान शास्त्र अभ्यासक

हनुमान हा सर्व शास्त्रांचा अभ्यासक होता महर्षी अगस्त श्रीरामांना म्हणाले

पराक्रमोत्साहमति प्रताप, सौशील्यमाधुर्य नया नयैश्च ।

गम्भीर्य चातुर्य सुचीर्यधैर्य:, हनूमंतः कोऽप्यधिकोऽस्ति लोके ।।४३।।

असौ पुनव्याकरणं ग्रहीष्यन् , सुर्योन्मुखः पृष्टुमना कपीन्द्रः ।

उद्यग्निरे रस्त गिरि जगाम, ग्रन्थं महद्वारयन प्रमेयः ॥४४॥ -

ससूत्र बृत्यर्थपदं महार्य, स संग्रह सिध्यति वैकपीन्द्रः ।

ह्यस्य कश्चित्सद्धशोऽस्ति शास्त्रे, वैशारदे छन्द छन्द गतौ तथंव ॥४५।।

सर्वासु विद्यासु विद्यासु तपो विधाने, प्रस्पर्धतेऽयं हि गुरू सुराणाम् ॥४६॥

(बाल्मिकि रामायण उत्तर काण्ड सर्ग ३६)

अर्थ-

पराक्रम, उत्साह, बुद्धिमत्ता, पराक्रम, सौम्यता, नम्रता, न्याय, अन्यायाचे ज्ञान, गांभीर्य, हुशारी, सामर्थ्य आणि संयम यांमध्ये हनुमानासारखा जगात दुसरा कोणीही नाही. अध्ययन काळात तो शास्त्राच्या अभ्यासात इतका व्यस्त असायचा की  सूर्य त्याच्या समोरून मागे जायचा, म्हणजेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो अभ्यास करत राहायचा. आणि जितक्या वेळात सूर्य जेव्हा उदयाचल ते अस्ताचल प्रवास करायचा तेवढ्या वेळात तो मोठाले ग्रंथ तोंडपाठ करणारा अद्वितीय विद्यार्थी होता.

हनुमानाने सूत्रे, वृत्ति, वार्तिका भाष्य, वाद्ये आणि संग्रह यासह सर्व काही अभ्यासले आहे. व्याकरणा व्यतिरिक्त, वेद, वाङमय, छंद इत्यादी शास्त्रांमध्येही तो एक अद्वितीय विद्वान होतं. हनुमान सर्व शास्त्रात आणि तपस्या यांमध्ये गुरु बृहस्पतीसारखा आहे.

वाल्मिकी रामायणातील वरील अवतरण हनुमानाला वानर म्हणून सिद्ध करत नाहीत, तर ते त्याला मानव, ब्रह्मचारी, विद्वान, महान व्याकरणकार आणि सर्व-शास्त्रांचा महान अभ्यासक म्हणून घोषित करतात.

माकडांमध्ये हे गुण असू शकत नाहीत.माकडाचा गळा एवढा अरुंद असतो की तो शब्द स्पष्टपणे उच्चारू शकत नाही. म्हणूनच जेव्हा आवश्यक असते तेव्हा माकड फक्त किंचाळते आणि ओरडते. 

त्यामुळे महान विद्वान राजा सुग्रीव याच्या सचिवाला वानर म्हणणे म्हणजे आर्य संस्कृतीचा अपमान तर आहेच, पण आपल्या बुद्धीची हीनता दाखविणे आहे, वानर महाराजे लोकांचे मंत्री नसतात. राज्यमंत्री माणसं असतात.