भविष्य पुराणातील हनुमानाची उत्पत्ती
शिवोऽपि च स्वपूर्वार्द्धाज्जातो वै सानसोत्तरे ।
गिरो यत्र स्थितादेवी गौतमस्य तनूद्भवा ।।३१ ।।
अन्जना नाम विख्याता कीण केसरि भोगिनी |३२||
रौद्र तेजस्तदा धोरं मुखे केसरिणो ययौ ।
स्मरातुर कपन्द्रस्तु बुभुजे तां शुभाननाम् ॥३३॥
एतस्मिनन्तरे वायुः कपीन्द्रस्य तनौ गतः ।
वांछितामंजना शुभ रमयामास वै बलात् ||३४||
द्वादशाब्दगतो जातं दंपत्योमैथुनस्थयोः ।
तदनु भ्रूणमांसाद्य वर्षमार्च हि सादधत ॥३५।।
पुत्री जातस्स रागातमा स रुद्र वानरानन,।
कुरूपाच्च ततोमात्रा प्रक्षिप्तोऽभुग्दिरेरधः ||३६||
बलादागत्य बलवान्दृष्टवा सूर्यमुपस्थितम् ।
विलिख्य भगवान्रुद्रो देवस्तत्र समागतः ॥३७||
वचसन्ताडितो वापि न तत्याज तदा रविम् ।
भयभातस्तदा प्रांशुस्सूर्य त्राहोति जल्पितः ||३८||
श्रुत्वा तदातं वचन रावणो लोक रावणः |
पुच्छे गृहीत्वा त कीशं मुष्टियुद्धम चीकरत् ॥३६||
तदा तु केसरि सुनो रवि त्यक्त्वा रुषन्वितः ।
वर्ष मात्र महाघोरं मल्लयुद्धं चकार ह ॥४०॥
श्रमितो रावणस्तत्र भयभीतस्समततः ।
पलामनपरी भूतकीशरुद्रेण ताडितः ॥४१||
(भविष्य पुराण प्रति सर्ग पर्व ४ अध्याय १३)
अर्थ
एकदा शिव मनसोत्तरा पर्वतावर गेले. तेथे केसरी आणि त्याची पत्नी अंजनी राहत होती. त्यावेळेस शिवाचे उत्तेजित वीर्य केसरीच्या तोंडात गेले आणि त्यामुळे कामातूर होऊन केसरी अंजनी बरोबर आनंद घेऊ लागला. याच दरम्यान केसरीच्या शरीरात वायूचाही प्रवेश झाला आणि त्या प्रभावाखाली तो बारा वर्षे अंजनी सोबत संभोग करत राहिला. या प्रदीर्घ संभोगामुळे अंजनी गरोदर राहिली आणि वर्षभरानंतर तिने माकडाच्या रूपात अत्यंत कुरूप असलेल्या हनुमानाला जन्म दिला. यामुळे आईने त्याला त्यागले.
या मुलाने बळजबरीने सूर्याला गिळंकृत केले. महादेव देवतांसह तिथे आले, विजांचा प्रचंड गडगडाट घडवून आणला असे होऊनही त्यांनी सूर्याला सोडले नाही. तेव्हा सूर्याला मृत्यूची भीती वाटली. आणि त्याने त्रहि त्राही म्हणून त्रागा सुरु केला, मग सूर्याचे नम्र शब्द ऐकून रावणाने हनुमानाची शेपटी धरून त्याला ओढले. त्यामुळे हनुमानाने सूर्याला तर सोडून दिले , परंतु रागाच्या भरात त्याने रावणाशी युद्ध सुरू केले आणि त्यांच्यात एक वर्षभर मल्ल युद्ध सुरु राहिले. १ वर्ष लढून रावण थकला आणि घाबरला आणि हनुमानाला माघार घेऊन पळून गेला.
भविष्य पुराणातील या कथेत शिवाचे वीर्य केसरीच्या मुखात शिरले आणि वायूने केसरीच्या शरीरात प्रवेश करून केसरी सह अंजनीचा उपभोग घेतला असे लिहिले आहे. अशाप्रकारे हनुमानाचे पुराणात तीन वडिल असल्याचे वर्णन आहे. शिव, वायू आणि केसरी.
जन्माला येताच हनुमानाने सूर्याला गिळंकृत केले, जो पृथ्वीपेक्षा लाखपट मोठा आहे, जो ६ कोटी मैल अंतरावर अवकाशात स्थित आहे. तिकडे रावण कुठून आला हेही कळत नाही आणि सूर्यासमोर रावण बाल हनुमानाशी वर्षभर लढत राहिला, ह्या सगळ्या पौराणिक गप्पा आहेत.
या कथेतून हनुमानाबद्दल फक्त एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की तो पिता केसरीपासून अंजनी मातेच्या पोटी जन्माला आला, केसरी, अंजनी आणि हनुमान हे सर्व मनुष्य होते, प्राणी नव्हते.
यावरून ही गोष्ट देखील स्पष्ट होते कि रावण हा मनुष्य होता, त्याला एका वर्षभर कोणत्याही प्राण्याशी सतत युद्ध करणे शक्य नव्हते, मल्ल युद्ध ही मानवाची कला आहे, माकडांची नाही.
दुसरी गोष्ट अशी आहे की माकडांना एक वर्ष किंवा ८ महिने गर्भधारणा होत नाही. माकडांच्या सर्व प्रजातींचा गर्भधारणा कालावधी ६ महिन्यांपेक्षा जास्त नसतो. पुराणानुसार, अंजनीला एका वर्षासाठी गर्भधारणा झाली होती, जी महिलांच्या सरासरी कालावधीच्या किंवा १० महिन्यांच्या जवळपास आहे. अपवादात्मक अवस्थेत महिलांचा गर्भधारणा कालावधी ११ किंवा १२ महिन्यांपर्यंत वाढतो. याच आधारावर अंजनी ही मानव जातीची स्त्री होती हे स्पष्ट होते.
तिसरी गोष्ट अशी माकडांचे नाव केसरी आणि अंजनी नसते हे देखील समजून घेतले पाहिजे.संभाषणात संबोधन शक्य व्हावे म्हणून नामकरण करण्याची परंपरा फक्त मानव प्रजातीमध्ये आहे. प्राण्यांना बोलण्याची किंवा उच्चार करण्याची क्षमता नसते त्यामुळे त्यांच्यात संबोधन म्हणून एकमेकांना नावे ठेवण्याची परंपरा नसते.
माकड मंडळीत अनेक स्त्री माकडीणी एका माकडाच्या बरोबर संभोग करत असतात, या उलट केसरी आणि अंजनी हे तर पती आणि पत्नी होते. बायकोशी उत्कटतेने संभोग करणे आणि ते दीर्घकाळ करत राहणे हे मानव जातीतच शक्य आहे माकडांची लग्न होत नसतात.आणि कवीने त्या प्रदीर्घ संभोगाचा कालावधी आपल्या कल्पनेतून १२ वर्षांपर्यंत वाढवून लिहिला आहे.
जर शिव प्राण्याच्या योनीत जन्माला आला असेल तर त्यामुळे शिवाचे महत्व आजीबात वाढलेले नाही. उलट पुष्कळ पापकर्म करणार्या आत्म्याला परमात्म्याने अशुभ कृत्ये करणार्या प्राण्यांमध्ये जन्म देऊन त्याने त्याच्या अशुभ कर्माची फळे भोगावीत आणि पापांचा नाश करावा हा विधात्याचा हेतू असतो.
शिवाने वानरांच्या योनीत जन्म घेऊन वानर जातीची सेवा, मार्गदर्शन किंवा उत्थान केल्याचा उल्लेख हनुमानाच्या जीवनात दिसत नाही.
लंकेत सीतेचा शोध घेणे आणि श्री रामचंद्रांच्या वतीने लढणे ही त्यांच्या जीवनातील मुख्य घटना आहे. एकदा युद्धात लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर संजीवनी नावाचे औषध शोधून आणण्याचे काम त्याने केले. त्याच्या आयुष्यातील या निवडक महत्त्वपूर्ण घटना आहेत ज्या कोणत्याही अवताराला शोभून दिसत नाहीत. सीतेला शोधणे हे गुप्तहेराचे काम होते, लढाई हा शिपायाचा पेशा, औषध आणणे हे सेवकाचे काम, त्यांच्यात अवतार कार्याचा विशेष संबंध नाही.