Get it on Google Play
Download on the App Store

९ उष:कल ३

बी.ए.प्रथम वर्षी नापास झालो.पण प्रयत्न सोडला नाही.दुसऱ्या वर्षी पास झालो.
आतापर्यंत शाळेची वर्ग संख्या वाढलेली
होती.शाळा मोठया जागेत बदलण्यात आली.मला बी.ए. डिग्री मिळाल्या मुळे
अप्रशिक्षित शिक्षक म्हणून काम करण्यास
संधी मिळाली. त्या काळात शिक्षक म्हणून
काम करण्यास फारसे कोणी उत्सुक नसत.
करण पगार कमी होते.
प्रशिक्षित शिक्षक होण्यासाठी बी.एड. होणे
आवश्यक होते.नोकरी सोडून बी.एड.होणे
अशक्य होते.

त्याच वर्षी खात्या मार्फत बी.एड.होण्याची
योजना सुरू झाली.बी.एड. होण्याची संधी
उपलब्ध झाली.मला खात्या मार्फत संगमनेर
येथील विद्यालयात प्रवेश मिळाला.बी.एड.ला इंग्रजी व भूगोल हा विषय घेऊन बी.एड. पूर्ण केले. प्रशिक्षित
उपशिक्षक या पदावर नियुक्त झालो.वयाच्या
पस्तिसाव्या वर्षी बी.एड.ही पदवी घेतली.
शाळेचा विस्तार वाढला, विद्यार्थ्यांची संख्या
वाढली त्यामुळे पर्यवेक्षक पदाची जागा निर्माण झाली. व पर्यवेक्षक म्हणून
बढती मिळाली. जबाबदारी वाढली व अनुभवात भर पडली.