७ उष:काल १
साखर कारखान्याची माध्यमिक शाळा ,सोमय्या विद्यामंदिर नवीन सुरू झाली होती.तेथे लेखनिक यापदाची जागा
भरावयाची होती,अकरावी पास व टंकलेखन येणारी व्यक्ती पाहिजे होती.
मला टंकलेखन येत नव्हते. तेथे जवळ
सोय नव्हती.तेथून सोळा मैल अंतरावर
कोपरगाव या ठिकाणी टायपिंग शिकण्याची
सोय होती. सायकल वर आठवड्यातून
चार दिवस जाऊन टायपिंग ची ४० ची परीक्षा पास झालो.माध्यमिक शाळेत
लेखनिक म्हणून १७ जानेवारी १९६१ रोजी
कामास सुरुवात केली.व त्याच मनाशी
निश्चय केला की या शाळेत मुख्याध्यापक
पदा पर्यंत प्रगती करायाची.सुरवातीस
दोनच वर्ग होते ८वी व ९ वी त्यामुळे
कोणी रजेवर गेल्यावर शिकवण्याचे
काम करावे लगे.घराची विस्कटलेली
घडी बसण्यास सुरुवात झाली.