Get it on Google Play
Download on the App Store

शब्दपिसारा

लिपी कोणती छंद कोणता
वृत हे मनीचे उलगडे आशय

ना मी लेखक ना कवी ही
फिरतो अदृश्य हात हा तव

उमटे शब्दफुलांचे गुज तव
हा सागर शब्दांचा अवखळ

विनम्र मी तयाप्रती सांगत
स्वतः स्वतः ला रोज नव्याने

करते स्वागत तयांचे हसत
हसत उलगडण्या मनपिसारा

लिपी कोणती कुठले पुस्तक
ना मी लेखक ना कवीही

स्वागत करण्या उभी सदा
फुलतो तव मनीचा  शब्दपिसारा

©मधुरा धायगुडे