Get it on Google Play
Download on the App Store

आशिर्वाद

पहाटेच्या नीरव शांततेत
साद घाली कुणी मना हळूवार
अलगद गुज सांगे मजला
आशिर्वाद आहे तुजला सर्वथा ||१||

पसरला आनंद भाळावरी
स्वपनी दिसे ते मनी वसे जरि
तृप्त कृतार्थ आज मी कळले
गुपित मज असण्याचे आता||२|||

मरगळ गतवर्षांची सरली  सारी
फुलला वसंत मनी आशेचा हळूवार
दिसे मार्ग  सरळ  सहज करि गजानन
देवुनि  आशिष मजला करि कृतार्थ||३||

सरावे मीपण शिणलेले सारे जगणे आता
आशस्वस्थ करुनि गेला सूर तो गजाननाचा
जगी जयास कोणी नाही त्यास देव पाही
उमेदिने भरले मन झाले हळवे जरि||४||

आस एवढीच मिळो सुख न घडो संघर्ष
कदा कुणा सदा हीच प्रार्थना या दिनी
मुक्त करोनी कोरोनातूनि लाभो आरोग्य जगी
भाग्यवान मीच मिळे आशिर्वादांचि मांदियाळी
कृतज्ञ मी सर्वजनी कृतज्ञ मी तवा श्री चरणी||५||

©मधुरा धायगुडे