Get it on Google Play
Download on the App Store

आई

आ म्हणजे आकाश आणि ई म्हणजे "ईश्वर"
शब्द अपुरे  अस्तित्व हे सारे तुझ्या मुळे

हरलेल्या चुकलेल्या क्षणांना सांभाळती
जिंकलेल्या सुखांच्या सरींना कुरवाळती

डोळ्यांतुनि तुझ्या प्रथम पाहिलेले हे जग
अनुभवाने समृद्ध होत आहे तुझ्यामुळे

कुठेही न मागता मिळालेलं दान हे
विधात्याने दिलेलं वरदान आई  हे

अनंत जन्माचे पुण्य माझे घडविलेस सदगुणी
आजचे अस्तित्व माझे हे केवळ तुझ्या मुळे

चारी वेद अठरा पुराणे चारी धाम तुझ्या चरणी
 कुणी झिडकारले कुणी  हिणवले सदासर्वदा

तिरस्काराची पुसलीस जाणीव परि स्वीकारुनी तू

आभार मानण्याची गरज नसावी असे हे नाते
कृतज्ञ मी ऋणी मी  नीत सर्वाथार्ने तुझ्या प्रती

असे नाते आईचे सर्वत्र पूज्यते
असे नाते आईचे सर्वत्र पूज्यते

शुभेच्छांची मांदियाळी बरसावी
उदंड लाभावे आयुष्य सदासर्वदा
हीच मधुर इच्छा नीतदिनी तुझ्याप्रती

©मधुरा धायगुडे