Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्नचिन्ह....?

काय द्यावे काय मागावे न सापडे अजून काही
सरला अर्धा जन्म दिसे किनारा आता लवकरी
दिसे प्रश्नचिन्ह समोरी...!||

कुणा हवे कुणा नको असे का जगावे जरि
गवसले हाती मम स्वत्व स्वतःचे परि
दिसे प्रश्नचिन्ह समोरी....||


शोधला नाही कधी आधार दिली साथ केवळ
आतुर प्रशंसेच्या भाळी  रिक्त टिळा हेटाळणी
दिसे प्रश्नचिन्ह समोरी....||

निसटले क्षण सौख्याचे मनातले सौदंर्य उरे मनी
वाट धुसर तव सरल्या क्षणांची परि वाटे  यावे परतूनि
दिसे प्रश्नचिन्ह समोरी.....||

वंदन तव सर्वजना देखी आक्रोश मज मनीचा
निसटले  जे  क्षण आनंदाचे परि सुखवती  सर्व मना
सापडे मग उत्तर माझे मला विरक्तीतला आनंद पहा ||

सुखवी त्या सर्व जना सार्थक जन्मभरीच्या क्षणांचे
दरवळे सुगंध मातीचा खुणावती माझ्या  मना..||

दिसे उत्तर  समोरी मग प्रश्नचिन्ह का अजूनि मनी
वाट पाहे आशेचा मनीचा गाभारा ...अकल्पित सांगतेची

© मधुरा धायगुडे