Get it on Google Play
Download on the App Store

स्वप्नातला तू..

तू..
माझं प्रेम तू..
माझी आस तू..
मी पाहिलेलं गोड स्वप्नं तू..
माझं लक्ष्य तू..
माझं ध्येय तू..
माझ्या जगण्याचं एकुलतं एक कारण तू..
माझा एक-एक हट्ट पुरवणारा तू..
माझ्या प्रत्येक दुःखाला क्षमवणारा तू..
मला सावरणारा तू..
मला हसवणारा तू..
माझे खूप खूप लाड करणारा तू..
माझा आवाज तू..
माझे सूर तू..
माझ्या गाण्यातील मंजुळ सरगम तू..
माझा मित्र तू...
माझा सखा तू..
माझा हात धरून चालणारा माझा साथी तू..
माझं मन तू ..
माझा आसमंत तू..
निश्चितच असशील माझ्या आसपास तू..
वाट पाहते मी माझ्या या छोट्याशा विश्वात तुझ्या आगमनाची..
लवकरच भेटशील ना रे मला तू ..