स्वच्छंदी...
आज पुन्हा एकदा आयुष्य नव्याने जगावेसे वाटते..
सर्व जुने रुसवे फुगवे पुसून टाकावेसे वाटते...
मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त गप्पा मारावेसे वाटते..
संपूर्ण आयुष्य जणू त्यांच्याच सान्निध्यात वेचावेसे वाटते..
जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला फुलाप्रमाणे जपावेसे वाटते..
त्यात नकारात्मकतेचा लवलेशही नसेल हीच गोड आशा मनाशी बाळगते ...
पुन्हा ते मंजुळ स्वर कंठात रुळावेत असे वाटते..
सुरांची मधुर साथ पुन्हा एकदा हवीहवीशी वाटते...
स्वच्छंद हसावे.. खेळावे.. एका निरागस आणि आनंदी जगात वावरावेसे वाटते..
खरंच.. आज पुन्हा एकदा मनापासून काव्यमय व्हावेसे वाटते...