नेमेचि येतो मग पावसाळा..
नेमेचि येतो मग पावसाळा..
घराबाहेर पडण्याचा येतो प्रचंड कंटाळा ..
बरसण्याचा नसतो याला जरासुद्धा थारा..
मला सोडून प्रत्येकाला आहे याचा प्रचंड लळा ..
तुलासुद्धा हा पाऊस खूप खूप आवडतो ..
तो आला की मला तू विसरूनच जातोस..
तेव्हा या पावसाचा फारच हेवा वाटतो ...
पण तुझ्यासाठी मात्र तो हवाहवासा वाटतो..
तो आला की तू छान आनंदून जातोस ..
लहान मुलासारखा त्यात चिंब भिजून जातोस ..
मी दूर उभी राहून तुला एकटक पाहत असते ..
तुझा हा निरागस हर्ष-सोहळा मीही मनोमनी साजरा करत असते..
माझ्यापेक्षा सरींचीच सोबत तुला अधिक प्रिय वाटत असते ..
तेव्हा खरंच तुझ्यावर खूप रुसावेसे वाटते..
इतक्यातच दिसते तुझे ते मिश्किल हास्य ..
जणू त्यात दडलेले असते आपल्या प्रेमाचे गोड रहस्य ..
आता मीदेखील तुझ्या दिशेने सरसावू लागते ..
नकळतच तुझ्या समवेत पावसात भिजू लागते..
असा हा पावसाळा प्रेमाच्या रम्य आठवणी करून देतो...
म्हणूनच मला तो आता तुझ्यापेक्षा जास्त आवडतो..!!!!