चालू लागलो आयुष्याच्या वाटेवर..
चालू लागलो मी आयुष्याच्या वाटेवर..
प्रथम पाऊल पडले जेव्हा माझे या धरणीवर ..
सुरुवात झाली होती जरी निरागस आसवांनी ..
व्यापून गेले माझे जीवन अगण्य छोट्यामोठ्या स्वप्नांनी ..
फार काही कळत नव्हते माझ्या त्या चिमुकल्या बालमनाला ..
स्वप्नी वाटे जावे चांदोमामा सोबत मनसोक्त गप्पा मारायला ..
लहानपणीचे दिवस होते निव्वळ मौजमजेचे, आनंदाचे ..
सवंगडी सोबत बागडण्याचे ..
स्वप्नांच्या सुंदर दुनियेत रमून जाण्याचे ..
आईबाबा मात्र ज्यालात्याला एकच म्हणायचे - "माझ्या लेकराने मोठे झाल्यावर डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे" ..
शाळा कॉलेज संपता संपता या गोष्टीची जाणीव दिवसेंदिवस वाढू लागते ..
आणि बालपणीच्या स्वप्नांचे धुके अधिकाधिक विरळ होत जाते..
आपल्या माणसांसाठी मोठं होण्याची धडपड आता खऱ्या अर्थाने सुरु होते ..
चार पैसेसुद्धा खर्च करण्यापूर्वी शंभरदा विचार करण्याची जणू सवयच होऊन जाते..
नोकरी-व्यवसायात आणि लोकांचे मानपान राखण्यातच अर्धे आयुष्य जाते ..
प्रपंच सांभाळता सांभाळता तर पन्नाशी सरून जाते ..
स्वप्नांच्या विश्वात रमण्याचे बळ आता कुठे हरवूनच जाते ..
तरीसुद्धा मनाच्या खोल दरीत दडलेले एखादे स्वप्न आठवलेच की मन आनंदून जाते ..