भाग ९
ती गेल्यावर दिपा आणि लता दोघी आल्या .
" अरे नील , तु इथे एकटा काय करतोयस ? " दिपाने विचारले . "
" मी एकटा नव्हतो . माझ्या बरोबर मित्र होते . ते आत्ताच गेले . "
" हो का ? संध्याला बघीतलस का रे ? " लताने विचारल .
" होय , वेणू बरोबर होती ती . " स्वप्नील म्हणाला .
" बरं तर आम्ही तिकडे पलीकडे कार्यक्रम चालू आहेत . बघायला जातोय . तू ये ना . " दिपा म्हणाली .
" मी जरा नंतर येतो आई . तू जा . "
इतक्यात वेणू आली . " अरे दादा , काय झालं ? संध्याताई कुठंय ? "
" मी तिला ड्रेस दिलय आणि घालून ये म्हणून सांगितलय . खूप उशीर झाला . अजून आलीच नाही . " स्वप्नील अस्वस्थ होत म्हणाला .
" का ऽऽऽ य ? म्हणजे ? " वेणू चकीत होऊन विचारली .
" मी नंतर सांगतो सगळं . आता प्लीज तू जा . " स्वप्नील म्हणाला .
" हो हो जाते . " असे म्हणून वेणू गेली .
ती जाताच संध्या स्वप्नीलकडे आली .
" किती उशीर लावलास . वाट बघून बघून कंठाळा आला . " स्वप्नील म्हणाला .
" सॉरी , पण मला सुद्धा कंठाळा आला . " संध्या म्हणाली .
" तुला कसला कंठाळा आला ? " स्वप्नील वैतागत विचारला .
" अहो , मी तर केव्हांचीच तयार होऊन त्या समोरच्या बोर्डाच्या पाठीमागे उभी होते . आधी मावशी आणि आई नंतर वेणू . मी त्यांच्या समोर मी हा ड्रेस घालून कशी आले असते ? मला लाज वाटत होती . " संध्या लाजत म्हणाली .
" हं ... ! हो का ? " असे म्हणून स्वप्नीलने संध्याला निरखून पाहिले . तेव्हां ती हसून आणखी लाजली . स्वप्नीलही हसला .
" थँक्यू सॉमच संध्या . आज तू माझ्या मनावरच ओझं हलकं केलस . " कृतज्ञेते च्या भावनेत स्वप्नील म्हणाला .
" काहीही हं ... तुम्ही उगाचच मला .... "
" नाही संध्या . मी खरच सांगतोय . तू मला माफ करून , मला माझ्या अपराधी भावनेतून मुक्त केलस . तू आता अशीच राहा . एवढच माझं म्हणणं आहे . " संध्याचं बोलणं मध्येच तोडत स्वप्नील म्हणाला .
" हो हो , आता तर मी नक्कीच राहीन . आता मला कळलं की , सारी पुरुषं एक सारखी नसतात . पण स्त्री किंवा स्त्री जातीचं आदर करणारे , त्यांचा मान राखणारे पुरुषं फार कमी असतात . " उदास होत संध्या म्हणाली .
" हं ! संध्या मॅडम भूतकाळ विसरायचं म्हटलं बरं का ? झालं गेलं सोडून , तू आजपासून नव्याने जीवन जगणार आहेस आणि तुझा हा बदल तुझ्या आई - वडीलांसाठी सुखदायक ठरणार आहे . कळलं का ? " स्वप्नील थोडा गंभीर होत म्हणाला .
" हो बरोबर आहे तुमचं . " संध्या स्वप्नीलच्या म्हणण्याला सम्मती देत म्हणाली .
" तुमचं नव्हे तुझं . आपण मित्र - मैत्रीण आहोत . तेव्हां तू मला नांवाने हाक मारायचं . अहो - जाहो म्हणायचं नाही . ठिके आहे ना? " स्वप्नील म्हणाला .
" ओ के बॉस " असे म्हणून संध्या हसली .
त्यावर स्वप्नीलही हसला .