भाग ५
दुसरे दिवशी सकाळी स्वप्नील लौकर उठला . कडकडीत चहा करून प्यायला आणि आभ्यासाला बसला . त्याच्या पाठोपाठ वेणूही उठली . तिनेही अभ्यास केला , शाळेची तयारी केली आणि नऊ वाजता जाऊ लागली . तेव्हांच तिला काही आठवल्या सारखे होऊन ती स्वप्नील कडे आली .
" दादा , संध्याताईला स्थळ आलय पुण्याहून . उद्या तिला बघायला येणार आहेत . " वेणू म्हणाली .
" काऽऽऽ य सांगतेस काय ? ती तयार झाली कां लग्नाला ? " स्वप्नील आश्चर्याने ओरडतच विचारला .
" ते काही मला माहीत नाही . " असे म्हणून वेणू शाळेला निघून गेली . त्याचं पुरतं लक्ष आभ्यासातून उडालं . ' चला , बरं झालं . ती संसाराला लागेल तर आपणही अपराधी भावनेतून मुक्त होऊ . ' असा विचार करून त्याने दीर्घ सुस्कारा सोडला . पुन्हा अभ्यासात गुतंला .
संध्याकाळी दिपा आणि लता दोघे फिरायला गेले नाहीत . लताला उद्याची तयारी करायची होती . पण सध्याला यायला उशीर झाला . येताच फ्रेश होऊन कॉफी घेतली आणि पुन्हा आभ्यासाला बसली . तिचं लक्ष फक्त कॉलेज - अभ्यास - परिक्षा याकडे होतं . तिला ह्या बाबतीत काहीच कल्पना नव्हती .
" बेटा , संध्या झालं का तुझा आभ्यास ? " लता तिच्या जवळ येत विचारली .
" नाही आई , अजून समस प्रॅक्टीस करायची आहेत . "
" बेटा तू उद्या कॉलेजला जाऊ नकोस . "
" कां ? "
" तुला पुण्याहून स्थळ आलंय आणि ते उद्या बघायला येणार आहेत . "
" आई , उद्या माझी परिक्षा आहे आणि तू मला जाऊ नको म्हणतेस . " संध्या रागाने म्हणाली .
" आई , असल्या गोष्टी पूर्व कल्पना देऊन करायच्या असतात . "
" पण तू तर आभ्यासात एवढी गुंतली होतीस की , सांगायला मिळालच नाही . " लता . समजावणीच्या सुरात म्हणाली .
" हे बघ , मला एवढ्यात लग्न वैगरे करायच नाही . मला शिकायचंय ... बस्स ! "
" अगं , ते उद्या येणार आहेत . "
" बाबांना सांग त्यांना फोन करून हे सर्व सांगायला . " संध्या असे म्हणून रागाने निघून गेली . लताने कपाळाला हात मारून घेतले . स्वप्नील गच्चीत उभा होता . त्यानी हे ऐकताच डोक्याला हात मारून घेतले . त्याला कळले की , ' संध्याच मन अजूनही दुःखी आहे . . . . . . '
त्याला त्याच्या मनाची अपराधी भावना रात्रंदिवस छळू लागली . पोटाची भूक आणि डोळ्यातली झोप उडाली . चार दिवस कॉलेजला गेलाच नाही . तो घराच्या नव्हे तर आपल्या खोलीतून बाहेर पडला नाही . त्याची ही अवस्था दिपाला पाहवेना . एके दिवशी लता स्वप्नीलला बघायला आली .
" अरे नील , काय झालं ? "
" बरं नाही वाटत त्याला . " वेणू म्हणाली .
" अरे मग डॉक्टरकडे जायच ना " लता म्हणाली .
" नाही मला कंठाळा येतो . त्या गोळ्या , औषधं , इजेक्शन शी ऽऽऽ " स्वप्नील तोंड वाकडं करत म्हणाला .
" अरे मग असं केलं तर तुझं पुढे कसं होईल . आज कालची मुलच विचित्र . संध्याला बघीतलं तर ती तशी आणि ह्याला बघीतल तर हा असा जगा वेगळा . " लता म्हणाली .
" संध्याने काय केलं ? " स्वप्नील ने विचारलं .
" किती चांगल स्थळ आलेलं तर हिने सरळ नकार दिला . म्हणे , आपण एवढ्यात लग्न करणार नाही . " लता म्हणाली .
" तिला शिकायचय तर शिकू द्या ना . मावशी ', तुम्ही तरी कशाला गडबड करतात . " स्वप्नील म्हणाला .
" नाही रे . आपले हातपाय घट्ट आहेत तोवरच पोरीचं लग्न आटपलेलं बरं . असं आम्ही म्हणत होतो . " लता म्हणाली .
" बरं ते जाऊं दें . मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते चल . "
" नको "
" अरे मग तू बरा कसा होशील ? " लता विचारली .
" एक आयडिया . येत्या दसऱ्याला सुट्टी आहे . तेव्हा आपण पिकनिक ला जाऊया का ? " वेणू विचारली
"काय तुझा आजारपणाचं औषध पिकनिक आहे ? " लता आश्चर्याने विचारली .
" होय . त्याचा आजार शारीरीक नसून मानसिक आहे . म्हणून " दिपा म्हणाली .
" दादा , आपण पिकनिकला नक्की जाऊया . " वेणू उड्या मारत म्हणाली .
" पण संध्याला हे सर्व सांगायच नाही . तिला सरप्राईज करू . " स्वप्नील म्हणाला
झालं ! दोन्ही घरात गोधळ तयारीचा . संध्याला हे एक कोडच होतं . दसऱ्याचा दिवस उजाडला . पहाटेच सगळी आवराआवर करून मंडळी पिकनिकला निघाली .
" आई , आम्ही कुठे निघालोय ? " संध्या विचारली .
" अरे बेटा , देवाला म्हणून निघालोय नक्कीच . पण नंतर थोडं फिरुनही येऊ ? नाही का हो ? " लता दिपाला हलकेच धक्का देत म्हणाली .
पण तरीही संध्याच्या मनाचं समाधान होईना . स्वप्नीलची आणि वेणूची मस्ती गाडीत सुरुच होती . त्यांना गप्प करे पर्यत दिपाची पुरेवाट व्हायची . मात्र संध्या मागे पडणाऱ्या झांडाकडे घराकडे पहात बसली . दोन अडीच तासच्या प्रवासानंतर ते सारे एका प्रसिद्ध श्री दुर्गादेवीच्या देवळात पोहचले . देवदर्शन झाल्यावर पंधरा मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या बागेत गेले . बाग खूप छान सुंदर होती . सकाळची वेळ असल्याने माळी झाडांना पाणी घालत होता . त्याच्या परवानगीने दामोदररावांनी एका जागेवर झाड लावले . नंतर एक चांगली जागा बघून तिकडे चटई घातली . त्यावर खाद्दपदार्थ वैगरे ठेवले . मग सर्वांनी चहा - नास्ता घेतला . स्वप्नीलने एका मोठ्या झाडाखाली पेटींगच स्टँड उभ केलं . आणि तो पेटींग करू लागला . दिपा म्हणाली .
" नील , तुझं हे कार्यक्रम इथं चालणार नाही . आपण कशासाठी इथे आलोय ? हे तुझ्या लक्षात आहे ना . "
" अगं आई , हो माहीतय मला . तू काही काळजी करू नकोस . ती जवाबदारी माझी आहे . "