भाग २
स्वप्नीलला पेटींग करता करता मनालीची ट्रीप आठवण येऊ लागली . कॉलेज तर्फे ट्रीप होती . लक्झरी A C बस . स्वप्नील च्या हसत , मनमिळावू स्वभावामुळे त्याचं मित्रमंडळ मोठ्ठ होतं . ते ज्या ठिकाणी उतरले होते . तिथे दुसऱ्या कॉलेजची सुद्धा बस आली होती . त्या साऱ्या मुलामुली मध्ये अशीच एक काळी सावळी मुलगी होती . जिच्यावर स्वप्नीलची नजर खिळून राहिली . त्यांने आपल्या मित्रांना तिच्याकडे बोट दाखवत . " किती सुंदर आहे ना " असे म्हणाला . त्यावर सगळेच पोट धरून हसू लागले . स्वप्नील थोडासा गोंधळून " मी काही चुकीचं बोललो का ? " विचारला .
" अरे नील , ह्या काळ्या मुलीमध्ये तुला आणि काय सुंदर दिसलं ? " एकाने हसणं आवरत विचारलं .
" म्हणजे ? "
" अरे , ती मुळीच सुंदर नाही . उलट एखाद्या कोळश्यासारखी आहे . " दुसरा मित्र म्हणाला .
ती मुलगी धावतच आपल्या बसमध्ये शिरली .
" अरे नील , आपण ट्रीपला आलोय . उगाच तुझा कुठेतरी मुड ऑफ व्हायला नको . "
" होय रे नील , आमच्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस . तू इतका स्वतः सुंदर आहेस की , तुझं मनही निर्मळ आहे . त्यामुळे तुला प्रत्येक माणूस , वस्तू वैगरे सुंदर दिसते . " असे सगळे मित्र स्वप्नीलला समजावू लागले .
" उगाचच काहीही तुमचं . " तो म्हणाला .
" मी काही चुकीचं बोललो का ? " विचारला .
" अरे नील , ह्या काळ्या मुलीमध्ये तुला आणि काय सुंदर दिसलं ? " एकाने हसणं आवरत विचारलं .
" म्हणजे ? "
" अरे , ती मुळीच सुंदर नाही . उलट एखाद्या कोळश्यासारखी आहे . " दुसरा मित्र म्हणाला .
ती मुलगी धावतच आपल्या बसमध्ये शिरली .
" अरे नील , आपण ट्रीपला आलोय . उगाच तुझा कुठेतरी मुड ऑफ व्हायला नको . "
" होय रे नील , आमच्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस . तू इतका स्वतः सुंदर आहेस की , तुझं मनही निर्मळ आहे . त्यामुळे तुला प्रत्येक माणूस , वस्तू वैगरे सुंदर दिसते . " असे सगळे मित्र स्वप्नीलला समजावू लागले .
" उगाचच काहीही तुमचं . " तो म्हणाला .
" दादा ऽऽऽ " वेणू कानाकडे येऊन ओरडताच , स्वप्नील दचकून भानावर येत , " .
" काय गं ? किती मोठयाने ओरडलीस ? केवढा घाबरलो माहीतय . " ओरडला .
" अरे दादा , तुझ्यानंतर मी कितीतरी उशिराने आले . आणि मलाच एक तास झाला . तू कुठे हरवलेला होतास .. मग तुला भानावर आणण्याचा हाच एक उपाय माझ्याकडे होता . "
" ह्या कुठल्या मुलीचं पेटींग केलास ? हिच्या तोंडाला का काळा कलर मारलास ? " वेणूने विचारल .
तेव्हां स्वप्नीलने एकवार पेटींग कडे पाहिलं . आणि तो डोळे विस्फारून पहातच राहीला . आपलं हे पेटींग कोणी पाहू नये म्हणून तो पटकन फाडणार तोच
" अरे , अरे , हे काय चाललंय . कुणाच पेटींग केलास ? " दाखव जरा बघू " दिपा बाहेर येत म्हणाली .
" अरे नील , ही तर बाजूची संध्या कशी वाटते . "
" काहीतरीच काय आई . " स्वप्नील म्हणाला .
" मी कशाला तिचं पेटींग करणार ? मी तर सहजच एका मुलगीला काढलं . पण ती संध्या नाही हं . "
" मग नक्कीच तुझी कोण तरी कॉलेजची मैत्रीण असेल . " वेणू म्हणाली .
" नाही गं . तुम्ही दोघेही आता गप्प बसा . " असे म्हणून स्वप्नील तेथून निघून गेला .
उन्हाळ्याचे दिवस सरले आणि पावसाळा सुरु झाला .स्नेहलता आणि दिपा दोघेही संध्याकाळचे फिरायला जात . पण आता पावसाळा सुरु झाल्याने त्या दोघी क्वचितच बाहेर पडत . एकदा पाऊस नाही असे बघून त्या दोघी फिरायला निघाल्या . जाताना स्नेहलताने नेहमीप्रमाणे स्वप्नीलकडे चावी ठेवली . " संध्या आली तर ही चावी दे . " असं सांगितलं . त्यावर त्याने मान डोलावली . त्या दोघी गेल्यावर थोड्या वेळाने जोरदार पाऊस सुरु झाला . स्वप्नील आभ्यासात गुंतला होता . त्याला संध्याचा विसर पडला . दारावरची बेल वाजली . पाहतो तो त्याचे पप्पा आले होते . त्याच क्षणी त्याला संध्याची आठवण आली . तो लगबगीने गच्चीत जाऊन खाली वाकून पाहिला तर ती बिचारी ओलीचिबं भिजलेली , थंडीने कडकडत पाणथळ पायऱ्यावर बसलेली . ते बघून तो धावतच खाली गेला .
" अहो , तुम्ही आमच्याकडे चावी घ्यायला कां आला नाही ? तुम्हाला माहीत आहे ना की , तुमची आई आमच्याकडे चावी ठेवते ते . " असे तो संध्याला म्हणाला . त्यावर ती गप्प राहीली . काहीच बोलली नाही .
" हे घ्या चावी , तुम्ही खूप भिजलेल्या दिसता . लौकर घरात जाऊन कपडे बदला नाहीतर आजारी पडाल . " स्वप्नील संध्याच्या हातात चावी देत म्हणाला . संध्या उठली , खाल मानेनेच चावी घेतली आणि दरवाजा उघडून घरात गेली . तिचं हे असं वागणं स्वप्नीलला खटकलं .