Get it on Google Play
Download on the App Store

लॉकडाऊनचे माझ्यावर खरेच काय मानसिक परिणाम होतील.

-    दिलीप प्रभाकर गडकरी

जगाच्या एका कोपऱ्यात कोरोनाची लागण झाली असून अनेकजण मृत्यूमुखी पडले असल्याच्या बातम्या कानावर आल्या आणी अचानक एक दिवस आपल्या देशातही त्याचे पडसाद उमटले व केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कडक उपाययोजना आखून सर्वत्र लॉकडाउन जाहीर केला.रेलवे आणी विमानसेवा बंद केल्या.जे जिथे आहेत तिथेच राहण्याचे आदेश आले.घरात रहा बाहेर पडू नका अशा सूचना शासनातर्फे देण्यात आल्या.

सुरवातीला दोन तीन दिवस बरे वाटले.अनेक वर्षानंतर सर्वजण घरात होतो.कोणाला कोठे जाण्याची अथवा कोणी आपल्या घरी येण्याची शक्यता नव्हती.आरामात उठायचे.खायचे, प्यायचे, झोपायचे.त्यानंतर मात्र सर्वत्र कोरोनाने उग्र स्वरूप धारण केले आहे.परदेशात दररोज हजारोजण मृत्यूमुखी पडत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.अल्पावधीत आसपासच्या भागातील ओळखीच्या व्यक्तींना लागण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या व मन बेचैन झाले."मन चिंती ते वैरी न चिंती"असे म्हणतात ते खरे आहे.आपल्या नातेवाईक, मित्रांबद्दल काळजी वाटू लागली.

खाण्यात पिण्यात कशात मन रमत नव्हते. सध्याची परिस्थिती इतकी विदारक आहे की परदेशांत पडलेली प्रेतं, विषाणूग्रस्थानची हतबलता इत्यादी घटना जवळच्या वाटू लागल्या.जसजसे दिवस वाढत होते तस तसे मन उदास होत होते, काही करू नये, नुसते पडून राहावे, आपण क्रियाहीन होत चाललो आहोत, खाण्यापिण्याचा, आंघोळ करण्याचा, कोठे जाण्याचा अहो इतकेच काय कोणाला फोन करण्याचा सुध्दा कंटाळा येऊ लागला आहे.माझे मानसिक संतोलन बिघडत असतांना मला संत तुकाराम महाराजांची आठवण झाली.

संत तुकाराम महाराजांच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता.त्यात त्यांची पत्नी, मुलगा यांचे निधन झाले.त्यामुळे ते खचले परंतु लवकरच ते सावरले व पूर्ण बदलले.संसारातील फोलपणा, ऐहिक जगण्यातील क्षणभंगुरता जाणवून येताच ते चिंतनशील तत्ववेत्ता बनले.त्यानंतरच्या काळात त्यांनी जे काव्य केले त्यात ते म्हणतात,

"बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली "

संत तुकाराम महाराज यांचे विचार वाचले आणी माझी मानसिकता बदलली.मी सकारात्मक विचार करू लागलो.जशी मनातील जळमटे दूर झाली तसा हातात झाडू घेऊन घरातील साफसफाई सुरू केली व मन प्रसन्न झाले.

लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक

संपादक
Chapters
लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक मनोगत वाटचाल... नव्या साहित्यक्षेत्राची... तरुण विचारांचे मासिक तुमचे ई-साहित्य प्रकाशित करा आणि हक्काची रॉयल्टी मिळवा लॉकडाऊन मधील रामायण कथा काहीतरी सांगतेय कोरोना नंतर... कोरोनाच्या संकटाकाळातील माझा... मला मी भेटले नव्याने... अंतरंगात डोकावताना... जादूची कांडी... कोरोना आणि मिळालेलं निवांतपण... राशन –शासन ...आणि इलाज सापडला कोरोनाला हरवू, आपणच जिंकू..! कोरोनाच्या निमित्ताने... कोरोनाचा धडा.... उन्हाच्या उंबरयाशी चांदवा.... भगवद्गीतेचा अभ्यास... लॉकडाऊनचे माझ्यावर खरेच काय मानसिक परिणाम होतील. स्थानबद्ध जागतिक सुट्टी लॉकडाउन आणि तुमचे 'स्व'त्व कोरोना लॉकडाऊन डायरी अंतरंगात डोकावताना... सोवळे.. तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे स्वशोधाची सुसंधी गोष्ट covid-19 ची गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी समृद्धं मन