तुमचे ई-साहित्य प्रकाशित करा आणि हक्काची रॉयल्टी मिळवा
अर्थ मराठी... खरंतर आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ साली, फक्त दिवाळी अंक म्हणूनच सुरुवात झाली होती. आणि पहिल्याच वर्षीपासून साहित्यिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे अगदी भारताबाहेरून देखील मोठ्या प्रमाणात लेख आले. पहिल्याच अंकाला ब्राझिलच्या एका पौर्तुगिज पत्रकाराची प्रस्तावना लाभली. त्यावेळी ई-साहित्य आपल्यासाठी नवे होते. तरी देखील जो प्रतिसाद मिळाला, तो खरंच उल्लेखनीय होता. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. आपल्याकडे नाविन्याची कास धरून पुढे जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मग त्यांना एक मंच देण्याच्या विचार केला. पुढे जाऊन BookStruck सोबत चांगलं काम करता आलं. नंतर आरंभ मासिक देखील सुरु झालं. साहित्यिक आणि वाचक यांना जोडणारा आम्ही दुवा झालो. साहित्यिकांसाठी आम्ही एक मंच उपलब्ध करून दिला. पण आम्हाला इथेच थांबायचे नव्हते. कारण आम्हाला अनेक साहित्यिकांकडून एक तक्रार ऐकू आली. ती म्हणजे एखादा दुसरा लेख किंवा एखादी कविता तुम्ही प्रकाशित करता. आम्हाला ई-साहित्य प्रकाशित करून त्याचा मोबदला देखील मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काही करू शकता का? मला देखील ते पटले. लेखक / कवी लिहितात म्हणजे ते त्यांनी ई-साहित्य मोफत उपलब्ध करून द्यायचे? आजीबात नाही.
म्हणूनच आम्ही आमच्या कक्षा रुंदावल्या. तुमच्यासाठी आम्ही मार्गदर्शक आणि प्रकाशक झालो. म्हणजे आता नक्की काय करायचं?
एक प्रोसेस सांगतो. तुमच्याकडे पुस्तकासाठी साहित्य लिहून तयार असेल तर ते तुम्ही आमच्याशी चर्चा करून आम्हाला पाठवू शकता. आम्ही त्याचे सोशल मिडीयावर प्रमोशन करू, कव्हर डिझाईन, व्हिडियो ट्रेलर, ई-पुस्तक तयार करू. तुमच्या नावाने तुमच्या साहित्याचे रजिस्ट्रेशन करू. जसे इतर भाषेतील साहित्यिक करतात. पुस्तकाची किंमत ठरवण्याचे अधिकार तुम्हाला असेल. त्यानुसार किंमत ठरवून Google Play Book आणि Amazon वर तुमचे पुस्तक प्रकाशित करू. पुस्तकाचा विक्रीनुसार रॉयल्टी साहित्यिकाच्या बँक अकाउंट मध्ये दर महिन्याला जमा केली जाईल. आणि हो, ही प्रोसेस अशीच आहे, ज्याचा लाभ काही लेखक आज देखील घेत आहेत.
आता यात काय काय साध्य होतंय ते बघूया. पहिली गोष्ट, तुमचे साहित्य तुमच्या नावाने रजिस्टर होऊन अधिकृत संकेतस्थळांवर वाचकांसाठी उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट, तुमचे साहित्य तुमचेच राहील. तिसरी गोष्ट, तुमच्या साहित्याची हक्काची रॉयल्टी तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला जमा होईल. चौथी गोष्ट, तुमच्या पुस्तकाचे प्रमोशन होईल. पुस्तकाची जाहिरात करून वाचकांपर्यंत ते पोहोचवले जाईल. पाचवी आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला ई-साहित्य संदर्भात आवश्यक असलेले सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल. ज्याने तुमची वाटचाल एका व्यावसायिक साहित्यिकाच्या दिशेने होईल.
लक्षात ठेवा, मराठी साहित्य समृद्ध होण्यासठी मराठी लेखक देखील समृद्ध झाला पाहिजे.
अधिक माहितीसाठी आम्हाला aarthmarathi@gmail.com वर मेल करा.
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
संस्थापक
अर्थ मराठी ई-साहित्य मार्गदर्शक आणि प्रकाशक
आरंभ त्रैमासिक