माझे दत्तक वडील.
सकाळची रम्य वेळ होती. दिवस हिवाळ्याचे होते आणि मी रत्नागिरीच्या बंदरावर फेरफटका करण्यास गेलो होतो. कोंकणांत हिवाळ्याचे दिवस किती आल्हादकारक वाटतात ! फार थंडी नाही आणि उष्मा तर मुळीच नाही. रत्नागिरीचें बंदर चढण्याउतरण्यास जरी अवघड असले तरी तेथील देखावा फारच नामी आहे. समुद्रा कडे तोंड करून उभे राहून पाहिलेला उजवीकडील तो अजगरा सारखा पसरलेला किल्लयाचा डोंगर, समोर क्षितिजापर्यंत पाणीच पाणी आणि त्यावर अंतरा अंतरावर तरंगणाऱ्या गलबतांची परीट घडाँची शिडे, मागील बाजूस माडांची घनदाट राई आणि डाव्या बाजूस विशेष सांगण्यासारखे काही नाही, असा तो सुंदर देखावा जन्मांत मी विसरणार नाही. रात्रभर निशापाणी करून लालभडक झालेल्या भगवान् सूर्यनारायणाने आपली पत्नी सृष्टिदेवी हिची दोन्ही थोबाडें रंगविलेली होती. समुद्रकांठी वाळूत एका बिळांतून दुसऱ्या बिळांत सुर्कन् पळणारे कर्ते आपल्याला पकडावयास येणाऱ्या कावळ्यांशी किंवा कुत्र्यांशी पकडापकडीचा खेळ खेळत होते. झालें इतकें वर्णन पुरे झाले; नाहीतर लघुकथेचे तंत्र बिघडा वयाचे, म्हणून मुद्याच्या गोष्टीकडे वळतो.
जरी मला पुण्यास नोकरी होती, तरी मी दरसाल या महि न्यांत रत्नागिरसि येत असें, व माझ्या वडिलोपार्जित इस्टेटीपैकी माझ्या वाट्याला जे नारळाचे झाड व फणसाच्या झाडाची जी खांदी आली होती त्यांचे वार्षिक उत्पन्न एक रुपया पांच आणे पांच पै घेऊन जात असे. हे उत्पन्न मिळविण्यास माझ्या वडिलांस आठ वर्षे कोर्टात झगडून नऊशे रुपये खर्चावे लागले. मग मी सालिना पंधरावीस रुपये खर्चुन रत्नागिरसि येऊन भावाबंदांशी तंडून हे हक्काचे, हट्टाचे व मानाचे पैसे घेऊन जात होतों यांत वावगे काय झाले ? तसे न करीन तर वडिलांच्या नांवास बट्टा लागणार नाही काय ? मी हे यंदाच्या वाटणीचे पैसे कालच वसूल केले होते व आज संध्याकाळच्या बोटीने निघून परत पुण्यास जाणार होतो. बंदरावरची गंमत घटकाभर पाहून परत फिरलों व वरल्या आळीत पोचलों, तोंच एक पन्नाशीच्या सुमाराचा वृद्ध गृहस्थ घाईघाईन मजकडे येत आहे असे पाहून थबकलों, तो गृहस्थ धांवतच जवळ आला व त्याने माझ्या अंगाभोवती दोन्ही हात टाकून मला कवटाळले.
. अहो हे काय आजोबा ? मला कोण म्हणून समजतां ? मी कांहीं तुमचा नातूपणतू नाही बरं. सोडा मला, नाही तर आतां भोंवताली घोळका जमा होईल तमासगिरांचा."
“बाळ नको रे असा म्हाताऱ्याला झिडकारूं. तोच तूं-अगदी हुबेहुब. काडीइतका फरक नाही."
"अहो भटजीबुवा, कबूल आहे सगळं. तोच मी आहे, हुबेहुब काल दिसत होतो तसाच आजहि दिसतो आहे, कालचा हा चिमणाजी विठ्ठल-" ___" काय चिमण तुझें नांव ? मग तर ठेपी जमलेच. मलासुद्धा दृष्टान्तांत गुरुराजांनी हेच नांव सांगितले होते. चिमण चिमण ! ये रे माझ्या चिमण्या बाळा !" असे उद्गार काढीत म्हातारबुवांनी मला अधिकच आंवळले.
"अहो शास्त्रीबुवा, तुम्ही सड्यावरच्या वेड्याच्या इस्पितळां तून रखवालदारांच्या हातावर तुरी देऊन तर नाहींना आलां? चला तिकडेच तुमची परत रवानगी करतो."
" अरे बाळा, मी कोणाच्या हातावर तुरी देऊन आलों नाहीं पण तूं मात्र माझ्या हातावर तुरी देऊन वीस वर्षे पळाला होतास. पण सुदैव माझें, काल रात्री गुरुराजांनी दृष्टान्त देऊन सांगितले की, ' तुझा बाळ उद्या सकाळी तुला भेटलाच पाहिजे.' मी म्हटले ' पण त्याला ओळखणार कसा ? ' तेव्हां गुरुराजांनी स्वप्नांत तुझें दर्शन घडविलें आणखी ते अदृश्य झाले. स्वप्नांत पाहिलेली मनोहर मूर्ति पण चल माझ्या घरी. इथे रस्त्यांत आतां हे तमासगीर जमा होतील. हे कोंकण आहे बाबा, इथले लोक आहेत कुचाळ ! चिटोळांचा मुलूख आहे हा."
या वेड्याच्या डोक्यांत आहे तरी काय हे पहावयाच्या उद्दे शाने मी त्याच्याबरोबर त्याच्या घराकडे जाण्यास निघालो. दहापांच घरें गेल्यावर त्याच्या घराच्या गडग्यांत शिरलो. आंत गेल्याबरोबर तेथील थाट पाहून मी थक्क झालो. दोन तुडुंब भरलेल्या विहिरींस माळांचे रहाट लावले होते, आणि एकास बैल व दुसऱ्यास रेडा जुंपला होता. विहिरींच्या पाटाच्या पाण्यावर माड, सुपारी, कलमी आंबे, फणस, काजू असे वृक्ष; चिकू, कॉफी, केळी, कागदी लिंबें अशी झाडें; फुलझाडे, वेली, भाज्या यांची जोपासना होत होती. घरापुढील मांडवावर वाळवणे घालण्याचे कामी दोन मोलकरणी राबत होत्या. दळणकांडणाचे काम दुसऱ्या दोघी मोलकरणी करीत होत्या आणि एका गोठ्यांत पांचसहा गुरे बांधलेली होती. बागेच्या मध्यभागी मुंबई पद्धतीचा दुमजली सुरेख कौलारू बंगला होता. ___ ही पहा माझी बाग नि समोरचें माझें गरिबाचें खोपटें," म्हातारबुवांनी सांगितले. कोंकणच्या श्रीमंत लोकांचा पोषाक व अठराविश्वे दरिद्यांचा पोषाक सारखेच असतात म्हणून मला त्यांच्या बोलण्याचे मुळीच आश्चर्य वाटले नाही. त्यांनी मला बंगल्यांत नेलें. बंगल्याच्या ओसरीवरच आम्ही झोपाळ्यावर बसलों. ओसरीवरून माडीवर जाण्याचा जिना होता त्याला कुलूप लाव लेले होते, त्यामुळे दिवाणखान्याचा थाट मला पहावयास मिळाला नाही, तरी ओसरीवरील गाद्या, लोड, तक्ये, देवादिकांच्या तस बिरी व इतर फोटो, पोतीची तंबकें, चित्रे ठेविलेले काचेचें कपाट वगैरे थाटावरून या म्हाताऱ्याच्या श्रीमंतीची बरीच कल्पना आली. ___ म्हाताऱ्याने रामा गड्यास हाक मारून बोलाविले आणि माजघरांत टांगलेल्या केळवंडीतील . थोडी केळी आणि एक पप नस. घेऊन येण्यास सांगितले.
. रामाः- पन आना-" .
रामास पुरतें न बोलूं देतां म्हातारा त्यास गप्प करून म्हणाला, “ होय, मालकांचेच पाहुणे आहेत हे, जा. जास्त बोलू नको." रामा कांहीं तरी पुटपुटत गेला, तेव्हां म्हातारा मला म्हणाला, “ पाहिलेत हे कोंकणचे गडी कसे उद्धट असतात ? यांना अहो जाहो कसे ते ठाऊकच नाही. बाकी मलाहि हा साधेपणा आवडतो. मला आण्णासाहेब म्हणूं नका, नुसते ' आण्णा ' म्हणा अशी मी त्यांना ताकीद देऊन ठेविली आहे. नाही तर तुमच्या देशावर ! जो उठला तो 'साहेब !' तात्यासाहेब, बापूसाहेब, भाऊसाहेब-मग हातांत उलटी अंबारी का असेना ? ( ओरडून ) अहो बाईसाहेब, जरा बाहेर या."
वेणी घातलेली, मोठे कुंकू, नाकांत सोन्याचे मणी गुंफलेली नथ, गुडघे झाकतील इतकेंच रुंद लुगडे अशी बाई माजघरांतून दारांत येऊन उभी राहिली. तिला उद्देशून म्हातारा म्हणाला, “ हे पाहिलेत का हो आपले चिरंजीव ? झाले की नाही माझें स्वप्न खरें ? तूं मला खुळा समजलसि, स्वप्न लटके म्हणालीस, पण स्वप्नांत पाहिलेलीच मूर्ति ! नांव सुद्धां गुरुराजांनीच सांगितलेले ' चिम णाजी' ! बाळ चिमण ! आपल्या आयशीच्या पायां पड." ।
या वेडपट थेरड्याच्या कलानेच जरा घेऊ या असा विचार करून मी त्या बाईच्या पायां पडलो. “बरें आहे, मी थोडा चहा ठेवतो, " असे म्हणून ती आंत निघून गेल्यावर म्हातारा झोंपा ळ्यावरून उठला व भिंतीवरचा एक फोटो काढून मला दाखवीत म्हणाला, " चिमणराया, पहा पहा ही गोजिरवाणी बाळे ! एकाहून एक सरस रत्नेच होती, पण काळाला नाही ती पाहवली ! इन्फ्लुएंझाच्या साथींत आठ दिवसांत एकामागून एक गेली; आ णखी आम्हांला म्हाताऱ्यांना निसंतान करून सोडिलें ! (स्फुदत) पण जाऊं द्या तें. आम्ही मुलांकरितां शोक करीत एक वर्ष काढले तेव्हां कालच आमचे गुरुराज-". ..
" म्हणजे कोण बुवा ? " मी चौकसले. . " माझे गुरु म्हणजे राजापूरचे पासोडेमहाराज. सत्पुरुष आहेत, तेच माझी करुणा ऐकून द्रवले. त्यांनी मला पहांटे दृष्टान्त दिला. त्यांची ती सहा महिन्यांत अंघोळ न केलेली, तोंडांत गांजाची चिलीम धारण केलेली, आंगावर मळक्या पासोडीशिवाय चिंधूकहि नसलेली, बाह्यात्कारी भ्रमिष्ट दिसणारी मूर्ति माझ्यापुढें प्रकट झाली आणि त्यांनी सांगितलें, बेटा आण्णा ! कल फजर ऊठके गाइयाको हात लगावो और रस्तेमें जाव, तुमारे नजरको जो आदमी पहेला आवेगा वोही तुम आपना लडका समझो. आगले जनममें वो तेरा लडका था. ' मी म्हटले, ' गुरुवर्य, पण रस्त्यांत दहाजण भेटतील. कोणता मी आपला मुलगा समजू ? ' तेव्हां त्यांनी माझ्यासमोर तुझी मूर्ति प्रगट केली. मी पुढे बोलणार तो जागा झालों."
__ इतक्यांत आण्णांच्या कुटुंबाने चहा, केळी, पपनसाच्या फोडी वगैरे उपाहार आणि मुखशुद्धीकरितां ओली सुपारी आणिली. त्यांचा समाचार घेत असतां आण्णांनी आपल्या जमीनजुमल्याची कल्पना मला करून दिली. आण्णांच्या जवळ बरीच माया होती. तो बंगला, ती बाग, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यांतील भात शेते, दरमहा तीनशे रुपये भाडे आणणारें मुंबईचे लहानसे घर, शिवाय वीस हजारांच्या परमेश्वरी' नोटा-आणखी पांच हजारांचे युद्धकर्ज. असले घबाड आयतेंच पदरांत पडत असल्या वर कोणता शहाणा माणूस आण्णांच्या दृष्टान्तावर अविश्वास ठेवील ? पासोडेमहाराजांचे उपकार आण्णांच्या ऐवजी माझ्यावर मात्र पुष्कळ झाले यांत संदेह नाही. - " पण आण्णा, माझे वडील हयात नाहीत, मला दुसरा भाऊहि नाहीं, तेव्हां मला तुमचा दत्तक होतां येणार नाहीं बरें का!" मी म्हटलें.
" अरे, दत्तक नको न् फित्तक नको. ती सगळी थोता. आहेत. दत्तकाचे कलम केल्याने का खरे प्रेम होत असते ? फक्त तूं आमच्यावर आईबापांप्रमाणे माया कर म्हणजे माझी सगळी माया तुलाच मिळेल, बरें, आतां तूं उतरला आहेस कोठे ? ( ऐकून ) वरच्या आळीतले जोग ते तुझे कोण लाग तात?"
मी आण्णांना माझी सगळी हकीकत सांगितली. मी पुण्यास नोकरीत असतो असें ऐकल्यावर ते म्हणाले, " अरे चिमणा ! साठ टिकल्यांकरितां खर्डेघाशी करण्याचे आतां तुला कारण नाही, परंतु मला जरा दम्याची व्यथा असल्याने एवढा पाव साळा आम्ही दोघे पुण्यास काढूं, स्वतंत्र बि-हाडच करणार होतो पण आतां तूं आहेसच. घरी तुझी आयशी आहे ना ? तुला उद्यां सोमवारी कामावर रुजू व्हायचे असेल तर तूं आज रात्रीच्या बोटांने जा. मी इथल्या कामाची व्यवस्था लावून बुधवारी निघून येतो."
यानंतर काही किरकोळ बोलणे होऊन मी निघालों. रवि. वारी संध्याकाळी रत्नागिरीहून निघून सोमवारी दुपारी पाऊण वाजतां पुण्यास पोचलो. वाटेने बोटींत व आगगाडीत माझा सर्व वेळ त्या भोळ्या आण्णाच्या अवाढव्य इष्टेटीची तजवीज करण्यांत गेला. ऑफिसांत जाण्यास उशीर झाल्याने एका टॉमीची दुरुत्तरें सहन करावी लागली. “ हरकत नाही लालतोंड्या, " मी ( मनांत) म्हणालो, " तो थेरडा कोंकण्या मला आपली इस्टेट देणारच आहे मग कोण येतो तुझ्यासारख्या माकडांची चाकरी करायला ?"
संध्याकाळी घरी गेल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली तेव्हां ती म्हणाली, " संभाळ हो बाबा ! नाहीतर तो कोणी लफंगाबिफंगा असायचा असल्या मसलतींत आपल्यासारख्या साध्या माणसांनी पडूं नये."
__" अग पण आई, मी का या मसलतींत पडलों आहे ? त्या आण्णाच्या गुरुरायांनीच मला हिच्यांत पाडलं आहे. ठीक आहे. या महागाईच्या दिवसांत हातभार लावला संसाराला आपल्या दैवानं !"
गुरुवारी सकाळी आण्णा व त्यांच्या पत्नी ( त्यांना माई म्हणावयाचे ) यांस स्टेशनवरून आणिलें. आण्णांनी आमच्या आई साहेबांस आडव्यातिडव्या गप्पा मारून खूप खूश केले; माईनीं आईला आपली बहीण मानिलें, व आण्णा हे माझे चुलते आहेत असें सर्वांना मी सांगावे म्हणजे लोकांना दृष्टान्ताची कर्मकथा सांगावयास नको असें ठरलें. आण्णांच्या बरोबर त्यांच्या कपड्यांच्या व दागदागिन्यांच्या ट्का होत्या, पण त्यांच्या किल्ल्या कोठेतरी हरवल्या त्यामुळे त्यांना अंघोळीनंतर बदलावयाला चिरगुटहि नव्हती. म्हणून मी लगेच बुधवारांत जाऊन एक धोतरजोडी व इरकली लुगडे घेऊन आलो.
पहिल्या दिवशी आण्णा व माई नवीन असल्यामुळे त्यांची बरदास्त उत्तमच ठेवण्यांत आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा गवळी आला, तेव्हां आम्ही दूध किती घेतों तें आण्णांनी विचारिलें. सौ.(माझें नुकतेच लग्न झाले होते) म्हणाली ' एक शेर'. आण्णा उद्गारले, “ बस् एकच शेर ! अरे तें कांहीं नको आतां. तुम्ही अडीच शेर दूध सुरू करा. मलाच तर शेरभर दूध पोळी बराबर खावयास लागते. रे गवळी, सकाळी अडीच नि रात्री दोन शेर आणीत जा हो. ( मला इंग्रजीत ) पैशाची काळजी नको." ___मी-" छे, छे, आण्णा असे कसे होईल ! पैशाचं काय मोठंसं ! लागेल तितकं दूध घेऊं ( मनांत ) खा श्रेरड्या, माझ्या बापाचं काय जातं नुस्तं दूध पिऊन पोट फुगून मेलास तरी !"
__ आण्णा आल्यापासून आमच्या रहाणीत पुष्कळ सुधारणा झाली. जेवतांना दोन कोशिंबिरी, एक फळभाजी, एक पालेभाजी, भाकरीऐवजी पोळी, पोळीला तूपसाखर, सकाळ-दुपार लिप्टनच्या पिवळ्या डब्यांतील चहा व बरोबर बिस्किटें अगर शिरा असा थाट सुरू झाला. आण्णांच्या डोकीवरचा पांढरा मास्तरशाही रुमाल जाऊन पुणेरी झिरमिळ्यांची पगडी, आंगांतील बंडी व चेकचा कोट जाऊन शर्ट व सर्जचा कोट, पंचा जाऊन लांबरुद धोतर व वहाणांऐवजी लाल पुणेरी जोडा असा पेहराव आला. माईंचे सुती लुगडे जाऊन इरकली लुगडे व त्यांच्या पूर्वीच्या अनवाणी पायांत गादचेि जोडे आले हा सगळ्या वेषांतराचा खर्च तूर्त मला सोसावा लागला पण याचा दसपट वचपा काढल्याशिवाय मी रहाणार होतों थोडाच !
आण्णा व माई ही दररोज संध्याकाळी तांगा करून फिरा वयास जात; सिनेमाचा प्रत्येक नवीन कार्यक्रम, प्रत्येक मंडळीचें नवीन नाटक, प्रत्येकास रोजचे डॉक्टरचे औषध व पथ्याकरितां फळे किंवा डब्यांतील विलायती खाये यांचा सपाटा सुरू झाला. आण्णांनी आपल्या ट्रंकेच्या कुलुपाच्या किल्लया पाठवून देण्याबद्दल रत्नागिरीच्या कारकुनास दहा पत्रे लिहिली पण त्याने दाद दिली नाही, त्यामुळे खर्चासाठी मला सेविंग्ज बँकेंतले माझे १२० रुपये काढून आणावे लागले.
आण्णांच्या प्रकृतीला पुण्याची हवा चांगली मानवली. पहि ल्याने दोन पोळ्याहि जात नसत, त्या आतां पांचसहा पोळ्या पचून पुन्हा फिरावयास जाण्याच्या आधी उपहार लागू लागला. माईहि नवऱ्याशी पोळ्या अधिक खाण्याच्या बाबतीत पैज लावून जेवीत असत.
या जोडप्याचा बकासुरी आहार पाहून गुंड्याभाऊस देखील आपली प्रकृति क्षीण होत चालली आहे असे वाढू लागले. तेव्हां त्याने मला सुचविले की, मी आण्णांस लंघनमीमांसेचे पुस्तक वाचावयास द्यावें. ज्यांच्या घरी पाहुण्यांचा सुळसुळाट असतो अशा घरवाल्यांनी या पुस्तकाची प्रत अवश्य संग्रही ठेवावी. मात्र आण्णा सारखे खमंग पाहुणे त्यास बिलकूल दाद देणार नाहीत. ते पुस्तक वाचून आण्णा म्हणाले, ' अरे चिमण, अगदीच टाकाऊ पुस्तक आहे हे ! लंघनाची चिकित्सा जर त्यांत वर्णन केली आहे इतकी बिनचूक असती तर हिंदुस्थानांत इतकी रोगराई वाढली नसती. कारण या देशांतले शेकडा ऐशी लोक दररोजच लंघन करीत असतात !" “आण्णा, हे लोक नुसते उपाशी राहतात. पुस्तकांतल्या नियमां प्रमाणे लंघन करीत नाहीत."
"अरे मरो रे तुझें लंघन ! आम्हांला 'उल्लंघनमीमांसा' असली तर देस एखादी! म्हणे पोट दुखलं तर उपास करावा नि बस्ती ध्यावा ! तें कांही नाही. पोट दुखलें तर बचक बचक सुंठसाखर नि तूप घ्यावी नि बेष लाडू करून खावे. मधुमेह झाला तर रोज गुळाच्या आठ पोळ्या अच्छेर तुपाशीं खाव्या नि शंभर नमस्कार घालून पच वाव्या. डोके दुखत असले तर चांगला अच्छेर . मावा साखरेत परतून खावा की साफ ! बद्धकोष्ठ झाले तर चारपांच बेसनाचे लाडू खावे नि वर एक गल्लास कोल्डड्रिंक प्यावे. कालच त्या कँपांतल्या ट्रेचर कंपनीत कोल्डड्रिंक घेऊन आलो. वाः! काय त्याची खुमारी सांगू तुला ? "
हळूहळू दोन महिने संपले. माझें सेव्हिग्ज बँकखातें खलास झाले. पगारहि दोनदांचा संपलाच होता, पण अद्याप आण्णांच्या किल्ल्या येईनात; तेव्हां त्यांनी पांचशे रुपये रजिस्टरने ताबडतोब पाठवून देण्याविषयीं रत्नागिरीच्या आपल्या कारकुनास लिहिले व ते येईपर्यंत खर्चास मी सासऱ्याकडून दोनशे रुपये उसने आणिले. आण्णांचे पांचशे रुपये येतांच सौ. ला सुरेख लुगडे मिळणार होते. बिचारीला लढाईच्या महागाईने चिटांवरच समाधान मानून ध्यावे लागत होते. .... पंधरा दिवस होऊन गेले तरी रजिस्टर येईना. पोस्टांत चौकशी केली पण व्यर्थ. तेव्हां मी आण्णांस सुचविले की, तुम्ही आतां ढूंकांस दुसऱ्या चाव्या लावून पहा; मी चावीवाल्याला बोलावतो. पण व्यर्थ. चिक्कू म्हातारा पत्रे व तारांत पैसे घालवीत होता पण तेथच्या तेथे दुसऱ्या चाव्या विकत घ्यावयाला त्याचा धीर होईना.
पावसाळा संपला, आगबोटी चालू झाल्या तेव्हां माझ्या श्वशु रांनी मला सल्ला दिला की, मी प्रत्यक्ष रत्नागिरसि जाऊन त्या म्हाताऱ्याच्या कारकुनास भेटावे व त्याच्याकडून पैसे आणावे. ही हकीकत मी आण्णांना सांगितली तेव्हां ते बरेच आढेवेढे घेऊ लागले. " तुला रजा मिळणार नाही, पधरा दिवसांनी मीच जाईन, तुला कारकुंडा दादच देणार नाही " इत्यादि. तेव्हां आईनोह मला बाजूस नेऊन म्हाताऱ्याला न कळवितां रत्नागिरीस जाण्यास सांगितले व त्याप्रमाणे खोटी आजारचिट्ठी ऑफिसांत पाठवून रत्नागिरीस गेलो. संध्याकाळी तेथें भावाबंदांकडे उतरलों व त्यांस आण्णांचा वृत्तांत सांगितला. आण्णा फाटक नांवाचा श्रीमंत गृहस्थ रत्नागिरीत असून आपल्याला त्याची काही माहिती नस ल्याबद्दल त्यांनी आश्चर्य प्रगट केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आण्णांच्या बागेतील बंगल्यांत गेलो. पूर्वी मी येथे आलो होतो तेव्हां बंगल्याच्या माडीस कुलूप होते, परंतु या वेळी आण्णा पुण्यास असून ती उघडी असल्याने मला नवल वाटले. चिक्कू मालकाची संपत्ति इतरांच्या चैनीसाठींच असते. मी ओसरीवर गेलों व पहातों तो झोपाळ्यावर तीन सुरेख मुलें बसलेली. ही भुताटकी तर नाही ना असे मला वाटले, कारण ज्या मुलांचा फोटो दाखवून " ही माझी गोजिरवाणी बाळें इन्फ्लु एंझाच्या साथींत गेली, " असें आण्णा म्हणाले होते तीच ही मुलें. पोषाखहि तेच होते. सगळ्यात मोठ्या मुलाने झोंका थांबवून मला कोण पाहिजे असें विचारिलें; मी भीतभीत उलट मुलासच त्याचे नांव विचारिलें.
माझे दत्तक वडील.
" माझं नांव प्लभाकल बालक्ष्नि नाडकलनी." ... मी घर चुकलों की काय असे वाटून इकडे तिकडे बघू लागलों तो एक तरुण बाई तेथे घरांतून आली व काय, कोणाकडे आला आहां, असें मला विचारूं लागली.
" फाटकांचं ना हे घर ? "
" नाहीं बाई. हे आमचं-नाडकांचं घर आहे. फाटक तर इथं नाहींत जवळपास कोणी." .. मजकरितां केळी व पपनस आणण्यासाठी आण्णांनी ज्याला पाठविलें होतें तो रामा गडी तेथे काही कामांकरितां आला व माझेकडे पहातांच " काय पाव्हणे कसा काय ? " असें त्याने विचारिलें.
" ठीक आहे. पण ते आण्णा कुठे आहेत रे ?" " तो आण्णा बामण ? कुठे पलाला त्याचा कांहींच पत्ता
.
नाय."
" म्हणजे ते आण्णा या बंगल्याचे मालक नव्हते ?"
“ अवं कसले मालक ? वैनीबाईस्नी पुसा म्हणजे त्या सांग तील सगला." रामाच्या उपदेशाप्रमाणे नाडकर्णीण वहिनींना मी आण्णांबद्दल माहिती विचारिली.
" तो आण्णा शिफारस घेऊन इकडे नोकरी मागायला आला त्याला आम्ही कारकून म्हणून ठेवलें. मध्ये आम्ही लग्ना कार्याकरितां मालवणास गेलो ते त्याच्या आंगावर घर टाकून गेलो. कोणाला तरी माहात हा थेरडा असा लबाड असेल म्हणून ! मेला आम्ही परत यायच्या आंत इथून पसार झाला न् बरोबर घरांतली दहावीस चांदीची भांडी न कपडेय् पळवलींन्-तुम्हांला काय त्यांनी आपणच घराचे मालक आहों, म्हणून सांगितलीन् ? काय बाई तरी धारिष्ट्य ! "
“आई, आणखी माझा गडवा पण पलवला ग त्यांनी, " तो मोठा मुलगा म्हणाला.
आतां स्वतःची फजिती त्या बाईपुढे काय सांगावयाची ? त्या म्हाताऱ्याची झडती घेऊन तुमची भांडी परत करतो असें सांगून मी निघालो. संध्याकाळच्या बोटीने रत्नागिरी बंदर सोडले. काय पाजी माणसाने मला बनविलें ! आतां कसली इस्टेट पण चारपांचशे रुपयांच्या उधाऱ्या मात्र करून बसलों ! मी माझ्या मित्रांत उपहासविषय होणार ! पुण्यास घरांत पाऊल टाक तांच त्या थेरड्याच्या बत्तिशीपैकी शिल्लक राहिलेले दांत न पाडीन तर नांवाचा चिमणराव विठ्ठलच नाही. असे सुडाचे विचार घोळवीत रात्र व सकाळ घालवून दुसऱ्या दिवशी दुपारी पुण्यास पोंचलों.
तांग्यांतून उतरतांच, 'कुठे आहेत ते आण्णा ?' असें म्हणत मी घरांत शिरलो.
____ " अरे असं झालं तरी काय रागावयाला ? " असें आईने विचारले.
" पण आधी ती थेरडा-थेरडी-" __ " अरे ती गेली रत्नागिरीला. तूंच तिथून त्यांना तार केली होतीस ना झटपट निघून या म्हणून ? "
“मी--मी तार केली. ? अगदी पक्का लफंगा दिसतो आहे, पण मी रत्नागिरीला गेल्याचं त्यांना सांगितलं कुणी ? "
.
माझे दत्तक वडील. " अरे तुझ्या बायकोनं; भोळी बिचारी ! आपला बेत तिला माहीत नव्हता. तिनं त्या म्हातारीजवळ सहज सांगितलं. मग चार तासांनी, तुझी तार आली आहे, आपण रत्नागिरीस जातो, असं सांगून ती दोघं तिनाच्या गाडीनं गेली. दोन ढूंका बरोबर नेल्या
आणखी दोन वर आहेत."
" पाहूं बरं त्यांत काय आहे-चोराच्या हातची लंगोटी." असे म्हणून मी वर गेलों व हत्यारांनी कुलपें फोडीत फोडीत आईस सर्व हकीकत सांगितली. कुलुपें फोडून ट्रॅका उघडून पहातों तों आंत दगड व विटकरीींशवाय काही नव्हतें !
दुसऱ्या दिवशी टपालाने पत्र आले. त्यांत पुढील मजकूर होताः
“चि० चिमणराव यांस आण्णा फाटक याचे प्रेमपूर्वक आ शीर्वाद.
आपण आमचा चार महिने उत्कृष्ट पाहुणचार केलात याबद्दल आम्ही आपल्याला दुवा देतो. राहिलेल्या आयुष्यात आपली आठवण व्हावी म्हणून आपल्या कुटुंबाच्या पाटल्या बरोबर आणि ल्या आहेत. तसेच आपल्या कापडवाल्याकडून ६० रुपयांचे कापड आणले आहे, त्याचे पैसे फेडणे आपल्यावरच आहे. आमच्या अफाट इस्टेटीपैकी दगडाविटांनी भरलेल्या दोन ट्रंका आपल्याला वारसा म्हणून ठेविल्या आहेत त्यांचा स्वीकार करावा. आपण स्वतःचे घर बांधाल तेव्हां त्यांचा अवश्य उपयोग करावा. आपल्या मातुश्रींस नमस्कार व चि० सौ० सूनबाईस आशीर्वाद. तुमच्या सारखे दुसरे भोळे सावज मिळेपर्यंतची तरतूद तूर्त झाली आहे, तरी आमच्या योगक्षेमाची काळजी करू नये. कळावे, हे आशीर्वाद
- आपला . आण्णा फाटक"
गेल्या चार महिन्यांतील देणी फेडण्यासाठी वाचकांनी मला पर्स अर्पण करावी अशी विनंति आहे. नाही तर तरुणांचे मूर्ख पणाचे प्रकार निस्तरणारा परमेश्वर जो सासरा तो माझा. पाठीराखा आहेच.