Get it on Google Play
Download on the App Store

विमा एजंटास चकविणे

जर्मन महायुद्धाच्या वेळी पुणे येथे सरकारने लष्करी खचीचे हिशेब ठेवण्यासाठी मोठी थोरली हंगामी ऑफिसे उघडिली. लढा ईच्या महर्गतेने पांढरपेशा लोकांची जी दाणादाण उडाली, तीत पुण्याच्या वॉर ऑफिसांनी त्यांस चांगला हात दिला हे प्रसिद्ध आहे. मॅट्रिक झालेल्या इसमाने समक्ष अर्ज करण्याचा अवकाश की, त्यास साठाची व बी. ए.स एकशेवीसाची नोकरी हटकून टेविलेलाच. वशिल्याच्या तट्टांस तर त्याच्या दुप्पट तनखा मिळत असे, परंतु असल्या प्राण्यांत गणना होण्याइतका भाग्यवान् नस ल्याने मला साठ रुपयांचाच प्रारंभ मिळाला. 

निवळ मॅट्रिकवर इतके रुपये मिळत असल्याने छप्पन देशचे कारकून पुण्यास लोटलेले होते. मद्रासचे एन्माडती आप्पा, पंजाबचे धिप्पाड दाढीवाले लाला, बंगालचे भुकेबंगाल बाबू इत्यादि लोक आपापल्या देशांतून येतांना निसर्गदत्त लेण्यांशिवाय फारशी अधिक वस्त्रे न घेतां येत. कारण कापडाची महागाई इतकी भयं कर झाली होती की त्या वेळी धोतरजोडीस जी किंमत पडत असे तिच्यांत हल्ली इरकली लुगडे मिळू शकते. परंतु हे बुभुक्षु लोक एक महिन्याचा पगार हाती पडतांच नखशिखांत साहेबी पोशाकांत विराजमान होऊन व्हॅसेलिन पोमेड, ब्रिलियन्टाईन, वगैरे उपयुक्त जिनसांच्या किंमती आणखी वर चढवीत असत. मीहि एकदोन महिन्यांत अप-टु-डेट बनलों हे सांगावयास नकोच. एक लहानसे बि-हाड भाड्याने घेऊन त्यांतील पुढल्या खोलीत टेबलखुाचा थाट टेविला आणि दारावर चिमणराव विठ्ठल जोग मॅट्रिक ( बॉम्बे ) मिलिटरी अकाउंट ऑफिस अशी इंग्रजी अक्षरांत पाटी लाविली. परंतु या माझ्या थाटाने दोन न्यादी माझ्यामागे लागल्या. एक उपवर मुलींचे बाप व दुसरी विमा कंपन्यांचे एजंट ह्मणजे दलाल. या वर्षी मुलींच्या बापांस चकविण्यासाठी ज्या यातायाती मला कराव्या लागल्या त्यांचा अनुभव आमच्या पुरुषवाचकांपैकी जे विवाहित आहेत त्यांस पूर्वीच आला असेल; व जे अविवाहित आहेत त्यांस येणार आहेच ह्मणून त्यांचे वर्णन करून स्मरणाचे दुःख वाढविण्याच्या किंवा अपेक्षेचें सुख कमी करण्याच्या भरीस मी पडत नाही. 

एका रविवारी दुपारी चार वाजतां आई चहा करीत होती व मी त्याची वाट पहात हातांत एक कादंबरी घेऊन खुर्चीवर बसलों होतो. रुपयाला एक शेर साखर व सव्वा रुपयाला एक पौंड चहाची भुकटी झाल्याने बहुतेक कुटुंबांतून दुपारच्या चहाला छाटच मिळाला होता, तथापि आम्हां “ वॉर हापिसवाल्यां " ना रुपयास तीन शेर साखर व बारा आणे पौंड चहा आमच्या रॅशन्सबरोबर मिळे. इतरांस ज्या सुखाचा उपभोग घेतां येत नाही त्याचा उपभोग आपल्याला एकट्यालाच मिळतांना सुख शतगुणित होते-आगगा डीतील इतर उतारू स्थलसंकोचामुळे उभे राहणे, भांडणे करणे, चेंगरणे इत्यादि हालअपेष्टा सोशीत असतां वरच्या फळीवर स्वस्थ पडून त्यांची गंमत पहात राहण्याचे स्वर्गसुख ज्यांनी भोगिलें असेल अशा आमच्या वाचकांस माझ्या वरील सुभाषिताचे सत्य पटलेंच असेल-म्हणून दुपारी चहा घेतांना मला फारच आनंद व अभिमान वाटे. 

इतक्यांत दाराशी एक किंचित् उतार वयाचा गृहस्थ डोक्यास पुणेरी पगडी, खांद्यावर उपरणे, अंगांत जुना झालेला काळ्या सर्जचा कोट, आणि हातांत कातड्याची हातव्याग अशा थाटानें आला व त्याने मला लवून नमस्कार केला. त्याच्या कडे पाहून मला वाटले की, हा एखाद्या मुलीचा बाप असेल म्हणून अंमळ अभिमानपूर्वक श्रीमंताप्रमाणे त्यास प्रतिनमस्कार करून समोरच्या खुर्चीवर बसण्याची मी खूण केली, व " काय ? " असे माने मेंच विचारलें. खुर्चीवर बसत बसत त्याने विचारले, “ आपण विठ्ठलराव जोगांचे चिरंजीव नाही का?" 

" होय. आपली अन् त्यांची ओळख होती वाटतं ?.--आई आणखी एक कप आधण टाक ग !" 

“ हो चांगली ओळख होती. फारच सज्जन माणूस ! त्यांची तब्येत कशी काय आहे ? 
"  त्यांना वारल्याला दोन वर्ष झाली." 
“ अरेरे! फारच वाईट झालं. असो. आपल्याला काय सिक्स्टी पे आहे नाही का ? आम्हांला आपल्याबद्दल आपल्या ऑफिसांतले ते खंडेराव दाभाडे सांगत होते. त्यांची न् तुमची ओळख असेलच." 

यानंतर आमचे खंडेराव दाभाड्यांबद्दल बरेच बोलणे झाले. मध्येच आईनें,
 “चिमाप्पा, चहा घेऊन जा बाळ !" अशी हाक मारली तेव्हां आंत गेलो. चहाचे दोन पेले हातांत देतां देतां तिनें, " कोण रे आहेत ते?' असा प्रश्न मुद्रेनेच केला. 

“ असेल मुलगी सांगायला आलेला !” असें अभिमानाने व तुच्छतेने बोलून मी पेले घेऊन बाहेर आलों व त्या गृहस्थापुढे एक पेला ठेविला. मुलीचे बाप अशा वेळी आपल्यापुढे ठेविलेले चहाचे कप म्हणजे आपल्या योग्यतेपेक्षा आपणांस अधिक दिलेल्या मानाचे पेले आहेत असे समजून अत्यंत लीनतेने आपण या मानाला योग्य नाही असे सुचविण्याचे धाडस करितात; परंतु या उर्मट गृहस्थानें तो चहा आधाशाप्रमाणे एकदांच पेला तोंडास लावून फस्त केला. त्याची धिटाई पाहून मला या अपमानाचा इतका राग आला की, याने कितीहि हुंडा दिला तरी याची मुलगी साफ पतकरावयाची नाही असा मी निश्चय केला; आणि त्यास म्हटले, “ बरं आहे. मिस्टर, मला आतां एंगेजमेंट आहे. तुमचं काय काम आहे ते एकदां सांगून मला मोकळा करा." 

" हो, ते आतां सांगणारच होतो. ( आपल्या बरोबरचे दप्तर सोडीत-त्यांत बहुधा मुलीची पत्रिका व फोटो असतील असें बाटले. ) आपले मित्र खंडेराव सांगत होते की, आपल्याला यंदा करायचं आहे म्हणून !" 

या उर्मटाला गारद करण्याची हीच संधि आहे असें जाणून जरा ताठ होऊन मी वरपक्षीयांचे ब्रह्मास्त्र सोडिलें, “छे बोवा, यंदा कर्तव्य नाही." 

" छे, छे ! तरुण मनुष्यांचं चुकतं ते इथेच. 
यंगरास्कल्न एका ठिकाणी म्हटलं आहे, ' इट इज् नेव्हर टू अर्ली टु-" 

" मॅरी ! " मी त्याचे वाक्य पूर्ण केलें. __

" होय ! अण्ड टु इन्शुअर. रामदासांनी देखील म्हटलं आहे, . “घटका जाती पळे जाती तास वाजे झणाणा । आयुष्याचा काळ जातो विमा कां रे उतराना ॥' " असें अवतरण देऊन आपल्या विनोदानें तो आपणच हसू लागला. 

मला वाटले, 'लग्न कां रे करा ना' तो म्हणेल ! पण विम्याची गोष्ट त्याने काढिली तेव्हां हा मुलीचा बाप नसून विमा एजंट आहे असे वाटू लागले. . आमच्या मातोश्री दाराच्या फटींतून पहातच होत्या, त्या आपले अस्तित्व जाणवण्याच्या उद्देशाने म्हणाल्या, “काय हो, तुम्ही मुलगी सांगायला आला असला तर सांगते, पहिल्यांदा पत्रिका जुळल्याशिवाय लग्नाचं जमायचं नाहीं हो!” । 

"हो, हो ! अन् मी तरी पत्रिका न् कुंडल्या दाखविल्या शिवाय कुठे यांना 'लग्न' करायला सांगतो आहे ? अहो, विमा म्हणजे तरी एक त-हेचं लग्नच ! " 

" विमाचं लग्न ! अलीकडे मेली पोरींची चांगली चांगली नावं ठेवून पुनः आमच्यासारखं कमा, विमा अशी जुन्या त-हेने हांक मारण्याचीच पद्धत पडली आहे ! विमला का तुमच्या मुलीचं नांव ?" आईसाहेबांनी विचारले. पण आतां तिने येथे जास्त वेळ उभे राहून आपली व माझी शोभा करूं नये म्हणून काही तरी निमित्त काढून मी तिला घरांत जावयास लाविलें. 

" या पहा आमच्या कुंडल्या !" एजंट आपल्या बॅगमधून २१ कंपनांचे प्रॉस्पेक्टस् काढून त्यांतली कोष्टके दाखवीत हंसत म्हणाला. त्याने आपल्या कंपनीबद्दल सर्व त-हेची माहिती दिली व हो ना करता करतां एक हजाराचा विमा उतरण्याचे वचन मजकडून घेतले. 
" आता तुम्ही हा प्रपोजल फॉर्म भरून ठेवा; आणखी हे काही प्रश्न कंपनीने विचारले आहेत त्यांची उत्तरें या उलट बाजूच्या कॉलममध्ये लिहा. मी आतां सोलापुरास जाणार आहे, आल्याबरो बर हे दोन्ही फॉर्म आपण कंपनीकडे पाठवू या.” “कशाला ? मीच हे पोस्टाने पाठवून देईन म्हणजे झाले, " मी म्हटले. मूगा पुनः कंपनीचे उत्तर येतांच भेटण्याचे कबूल करून तो पुनः मला न विसरतां फॉर्म पाठविण्याविषयी बजावून निघून । हा मुलीचा बाप आहे असे समजून मी जो हरबऱ्याच्या झाडावर चढलों होतो, त्यावरून त्याने मला खाली ओढून आणल्याबद्दल मी संतापून गेलो होतो ! त्यांतून ही विम्याची मला नको असलेली ब्याद ! मला असे कितीतरी इसम माहीत आहेत, की विमा उत रून त्याचे हप्ते भरतां भरतां बेजार झालेले आहेत, पण मरत नाहीत. मी तो प्रपोजल फॉर्म भरला आणि त्यासोबत कंपनाने पाठविलेली प्रश्नपत्रिका उत्तरांनी भरली व कंपनीकडे पाठवून दिली. ज्यांना इन्शुरन्स एजंटची पीडा टाळावयाची असेल त्यांना माझी उत्तरें उपयोगी पडतील असे वाटल्यावरून खाली देत आहे: 

प्रश्नः-तुमचा धंदा कोणता आहे ? या धंद्यात तुम्ही किर्ता वर्षे चालू आहां, तुमचा पूर्वीचा धंदा कोणता होता ? चालू धंद्यात बदल करण्याचा तुमचा विचार आहे काय ? 

उत्तरः-मिलिटरी अकाउंट ऑफिसांत कारकून आहे. एक वर्षापूर्वीचा धंदा विद्यार्थ्याचा होता. चालू धंद्यांत फरक करण्याचा माझा विचार आहे, मात्र कोणी तरी मला घरजांवई करून घेण्यास तयार झाला पाहिजे. 

प्रश्नः-तुमचे वय काय आहे ? जन्म कोठे झाला ? 

उत्तरः-वय २२ वर्षे ८ महिने १७ दिवस ५ तास ४० मिनिटें. जन्म बाळंतिणीच्या खोलीत बाजेवर झाला. 

प्रश्नः-तुमचे वजन, उंची, छातीचा घेर ( फुगवून, न फुग वितां ) व पोटाचा घेर द्या. 

उत्तरः-वजन ७१ पौंड; उंची ५ फूट ९॥ इंच; छातीचा घेर छाती फुगवून २४ इंच व न फुगवितां २३॥ इंच; पोटाचा घेर ४८॥ इंच. 

प्रश्नः-तुम्ही (१) अल्कोहोलयुक्त पेये, (२) तंबाकू, (३) अफू व (४) इतर मादक द्रव्यांचे सेवन करतां काय ? करीत असल्यास कोणत्या प्रमाणांत करितां. ? 

उत्तरः-या सर्व द्रव्यांचे सेवन मी फारच माफक प्रमाणांत व नियमित करतो. कधीहि चुकवीत नाही. दररोज एक पाइन्ट व्हिस्की, पावशेर तंबाकू, पावशेर तंबाकूचा धूर, दोन तोळे अफू आणि गांजा, भांग इत्यादि मादक द्रव्यांचे सेवन प्रसंगानुसार करीत असतो. 

प्रश्नः--पुढील कौटुंबिक कोष्टक शक्य तितक्या बिनचूक रितीने भरून द्या. 
जिवंत असल्यास वय. 
नांव. 
मृत असल्यास मरतांना 
वय. 
मरणाचे कारण. 
बाप. 
असते तर ५९-६-४ 
५५-४-५ 
मरणं प्रकृति : शरीरिणाम् । कारण दुसरे काय ? 
आई 
५१ सुमारे 
अजून कळले नाही. 
मेल्यावर सांगेन. 
बापाचा बाप 
असता तर सुमारे ८० 
२१ वर्षे, 
आनुवंशिक राजयक्ष्मा. 

बापाची आई. 
असती तर सुमारे ७४ 
माझ्या बापाच्या वडील भावाचे जन्मकाळी बाळंत. 
रोगाने मेली. 

आईचा बाप. __ असता तर सुमारे ४९ 
४०-६-६ 
हार्ट डिसीझ, अतिसार व महामृत्युंजय 
रोगांच्या कॉम्बिनेशनने. 
आईची आई 
असती तर ४६ 
३५ वर्ष. 
रक्तक्षय आणि अतिरक्त या रोगांच्या मिश्रणाने. 
नाहीत. 
भाऊ. 
न जन्मल्यामुळे मेले नाहीत. 
बहीण, 
१३ वर्षे. 

प्रश्नः-तुम्हांला कधी अपघात झाला होता काय ? तुमच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती काय ? ( असल्यास सविस्तर वर्णन करा ). . 
उत्तरः-एकदां लहानसा अपघात झाला होता. आखाड्यांत दांडपट्टा खेळत असतां प्रतिस्पर्ध्याचा वार लागून माझें शीर उडालें होते. या क्षुल्लक अपघाताशिवाय गंभीर स्वरूपाचा आघात मजवर कधी झाला नाही. हा अपघात शस्त्राने झाला असल्याने यालाच शस्त्रक्रिया म्हटले तरी चालेल. बाकी नापिताकडून होणाऱ्या साप्ताहिक शस्त्रक्रियेशिवाय महत्त्वाची शस्त्रक्रिया मजवर झाली नाही. 
प्रश्नः-आजारीपणाबद्दल वैद्यकीय दाखला मिळवून तुम्हांला कामावरून गैरहाजर रहावे लागले होते काय ? । 
उत्तरः-आमच्या कचेरीत रजा मिळविण्यास नेहमीच वैद्य कीय दाखला आणावा लागतो. .. प्रश्नः -- तुम्हांला एखादा चिन्ताजनक रोग झाला होता काय ? त्याचप्रमाणे पुढील रोगांपैकी एखाद्या रोगाने आपण आजारी होतां काय ?-( अ ) अपेंडिसायटिस, रक्तक्षय, आमांत्रिक वगैरे ताप; (ब) वेड, अपस्मारासारखे झटके, संधिवात, उपदंश(क) इतर प्रत्येक रोगांत किती दिवस अंथरुणांत पडून होतां ? 
उत्तरः--आपण विचारिलेले सगळे रोग वेळोवेळी मला झालेले होते. अपेंडिसायटिसने १० वर्षे ४ महिने, रक्तक्षयाने ५ वर्षे ३ महिने, आणि वगैरे तापाने ३ वर्षे ६ महिने; याप्रमाणे १९ वर्षे १ महिना अंथरुणांत पडून होतो; ( ब ) वेड आणि अपस्माराचे 
विमा एजंटास चकविणे. झटके यांत ४ वर्षे अंथरुण सोडून देऊन कविता रचीत भटकत होतो. उपदंश म्हणजे ढेकूण, डांस इत्यादि क्षुद्र प्राण्यांचे दंश जन्माचेच मागे लागले आहेत. या रोगांत रोगी अंथरुणांत पडून न रहातां पिसाटासारखा चुळबुळ करीत असतो हे आपल्या विमा कंपनीच्या वैद्यकीय सल्लागारांस कळावयास पाहिजे होते; ( क ) इतर म्हणजे निद्रा या रोगाने ११ वर्षे ४ महिने ८ दिवस ८ तास पडून 
राहिलो होतो. __याप्रमाणे कंपनीच्या प्रश्नांची उत्तरे लिहून पाठविली; व कंपनी मला विमा उतरण्यास नालायक ठरवील व आयतीच एजंटाची व्याद टळेल अशा अपेक्षेने मी आपल्या युक्तीबद्दल स्वतःस शाबा सकी देत बसलों; परंतु दोन तीन दिवसांत कंपनीकडून खााल प्रमाणे मला पत्र आलें ! 


अमुक तमुक लाइफ इन्शुरन्स कंपनी, मुंबई 
___ ता. अमुक माहे तमुक 
सन १९१७ लाडके साहेब, 
आपले आमच्या कंपनीत विमा उतरण्याचे प्रपोजल व माहि तीचे पत्रक ही पावली. आपल्या थट्टेखोर स्वभावाचे कौतुक वाटून आपल्या उत्तराची एक प्रत आपल्या ऑफिसच्या मुख्य अधि काऱ्याकडे व दुसरी येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळाच्या अधिकाऱ्याकडे पाठविली आहे. येरवड्याच्या इस्पितळाची हवा खाऊन आपल्या खभावांत गांभीर्य आल्यावर आमचा एजंट आपली भेट पुनः घेईल, कळावे. 

आपला बिलकूल गीचमीड सहीवाला 
म्यानेजिंग डायरेक्टर. 

पत्र वाचतांच एजंटास चकविल्याबद्दलचा माझा आनंद पार मावळून गेला; माझी नोकरी संभाळण्याकरितां व वेड्याचे इस्पितळ चुकविण्याकरितां मला कोण यातायात पडली ती माझी मलाच माहीत !