Get it on Google Play
Download on the App Store

लग्नसराई

सामाजिक आणि राजकीय बाबतीत स्वतःस प्रागतिक म्हण विणाऱ्या एका वर्तमानपत्रांत खालील जाहिरात माझ्या पाहण्यांत 
आली:----- 

वधू पाहिजे. 

" कोंकणस्थ, कपि गोत्रास जुळणारी, गण राक्षस किंवा देव, मंगळ सप्तम किंवा अष्टम, वय १५/१६ पर्यंतची असावी. घराचे वय २४।२५. शिक्षण मॅट्रिकपर्यंत, इनामी उत्पन्न १०००रु. शिवाय स्कॉलर शिप दरमहा रु. २०. निदान एक हजारपर्यंत तरी खर्च करणारां नींच फक्त चौकशी करावी. मुलीचें जन्मनक्षत्र ज्येष्ठा असेल तर ( पैशाच्या बाबतींत कुलशील उत्तम असल्यास ) सवलत मिळेल, 
गागैय 
निसबत 

हे पत्र. वरील जाहिरात ही अपवादविषयक नसून तिजसारख्या शेकडों जाहिराती निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून किंवा वर्तमानपत्र बजा मासिकांतून प्रसिद्ध होत आहेत. अद्यापपर्यंत दक्षिणी मुलींच्या जाहिराती इंग्रजी वर्तमानपत्रांच्या रकान्यांत देण्यात येऊन आमच्या विवाहसंस्काराचे बाजारी धिंडवडे परप्रांतांच्या चव्हाट्यावर येऊ लागले नाहीत; परंतु बंगाल प्रांत इतर बाबतींतल्या प्रमाणेच याहि बाबतींत आमच्या बराच पुढे गेलेला आहे. तिकडील इंग्रजी वर्त मानपत्रांत खालील मासल्याच्या जाहिराती भरपूर येत असतात. 
वॉन्टेड
-ए वेल् एज्युकेटेड, गुड्लुकिंग ब्राइड ऑफ हाय-बॉर्न कायस्थ फॅमिली फॉर ए यंग कायस्थ बार अॅट लॉ. प्रैक्टिस् नॉट 
लेस् दन् रु. ५००० पर अनम्. अप्लाय शार्प. 
ए बी. सी. केअर् ऑफ धिस् पेपर. 

वॉन्टेड:-ए प्रॉमिसिंग ब्राइड-यूम फॉर ए कुलीन गर्ल गुड लुकिंग अँड स्मार्ट. रेडी टु पे डॉबरी अपटु रु. २००० फॉर ए रिअली डिझर्विंग मॅन्. सेन्ड फोटो, हॅरॉस्कोप अॅन्ड स्टेट ट टु एक्स्. वाय. झेड् केअर आफ् एस्. सी. घोष, नाइन्टीन, ऑल फूल लेन, पागलपुर, ई. बी. एस्. रेल्वे. 

गुजराती समाज तर वेळी अवेळी असल्या जाहिराती देण्यांत फारच भलतीकडे वाहवला आहे; कारण नाटकांच्या किंवा सिने माच्या गुजराथी भिंतजाहिरातींच्या देखील खाली वधू माटे हेन्डबिल जुओ,' ( वधूकरितां हस्तपत्रिका पाहा ) अशी सूचना ठोकून दिलेली असते. 

आता हा लग्नाचा बाजार अगदीच खुला आहे असे मात्र म्हणता येणार नाही, त्यांतील सौदे कडक बंधनांनी मर्यादित केले आहेत. याबद्दल तात्त्विक चर्चा करण्याचे काम मजसारख्या खर्डेघा शाच्या हातून होणे शक्य नसल्यामुळे मी स्वानुभवाच्या गोष्टी वाचकां पुढे मांडीत आहे. ___मला आपली बहीण चि. सौभाग्यकांक्षिी चिमूताई हिचें लग्न जुळवावयाचे होते. मुलीच्या लग्नासं अवश्य असलेल्या बाबतीत नवरा ही एक असल्यामुळे योग्य वर शोधून काढणें जरूर होते. आम्हां दक्षिणी लोकांत नवरा हा नवरीपेक्षा वयाने मोठा असावा लागत असल्याने तो देवलस्मृतीत म्हटल्याप्रमाणे तिच्या अगोदरच जन्माला आलेला होता. मात्र तो कोठे आहे याचा तपास करण्याचे काम बाकी होते. हे काम आमच्या ज्ञातिगोत्रादि निबंधांनी किती सो करून टाकिलें आहे याची मला अद्याप जाणीव नव्हती. जातिभेदास मी पुष्कळ नांवें ठेवीत होतो परंतु बहिणीचे लग्न जुळविण्याचे वेळी वरसंशोधनाची कामगिरी या जातिभेदानेच कशी सोपी करून टाकिली ते आतां सांगतो. जातिभेद नसता तर दीड कोटी महाराष्ट्रीय हिंदु वर्गात वर शोधीत मला भटकत रहावे लागले असते, परंतु आतां जातिभेदामुळे फक्त चित्तपावन ब्राम्हणवर्गापुरते वरसंशोधनाचे क्षेत्र मर्यादित झाले. ... आतां चित्तपावन लोकांची संख्या फक्त १,०९,००० इतकी असल्याने माझी पायपिटी किती वांचली असेल तें एक वजा बाकीच जाणवू शकेल. चित्तपावनांत निम्मी संख्या बायकांची, व चि. चिमूताईचा विवाह पुरुषाशी करावयाचा असल्याने, ५४,५०० व्यक्तींत निवड करण्याचे काम शिल्लक राहिले. यानंतर या निवडीचे काम गोत्रपद्धतीने आणखी मर्यादित केलें आहे ! आमचे जोगांचे गोत्र काश्यप आहे आणि स्वगोत्रीयां प्रमाणे शांडिल्यगोत्रीयांशी आमचे जमत नाही. चित्तपावनांच्या चौदा गोत्रांपैकी शांडिल्य व काश्यप या दोन गोत्रांवर आम्हांस बहिष्कार घालावयाचा असल्याने या संख्येपैकी ७,७८५ वजा गेले. बाकी राहिले ४६,७१५. 

गोत्रांच्या नंतर विचार करावयाचा पत्रिकेचा. पत्रिका जमते की नाही हे पाहाणे विवाहप्रसंगी अवश्य असते. फलज्योतिषावर ज्यांचा विश्वास नसेल ते लोकहि पत्रिका घेऊन ठेवितात आणि हुंडा नापसंत असल्यास कुंडली जमत नाही असे विरुद्ध पक्षास न दुखविणारे उत्तर देऊन मोकळे होतात. चि. चिमूताईला मंगळ नसल्याने मंगळये वर वर्ण्य करणे भाग होते. पत्रिकेच्या १२ घरांपैकी १,४,७,८ व १२ या पांच घरांत ज्याचा मंगळ बसलेला असेल तो मंगळ्या वर. अर्थात् एकंदर वरांपैकी ५ वर मंगळ्ये असल्याने या ४६,७१५ तून १९४६४ र निरुपयोगी लोक घालवून दिले. बाकी राहिले २७,२५०२ पत्रिकेत वधूवरांचे तीन गण दिलेले असतात. देव, मनुष्य, आणि राक्षस. या तीन गणांपैकी देवांचे इतरांशी जमते; परंतु मनुष्यांचे आणि राक्षसांचें मात्र एकमेकांशी जमत नाही. याचे कारण उघड आहे. मनुष्य आणि देव यांच्यांत निसर्गतः प्रेमभाव असल्यामुळे त्यांतील विवाह सौख्यविरहित होण्याचा फारसा संभव नाही. देव आणि राक्षस हे तुल्यबल असल्याने देवगण्याचे प्रसंगो पात राक्षसगण्याशी भांडण होईल इतकेंच, परंतु त्यांना एकमेकां पासून भय बाळगण्याचे मात्र बिलकूल कारण नाही. परंतु मनुष्य हा मात्र राक्षसाचे भक्ष्य असल्याळे राक्षसगणी मनुष्यगण्याचा केव्हां स्वाहा करील त्याचा नेम नाही म्हणूनच आमच्या शहाण्या आर्य पूर्वजांनी मनुष्यगणाचा राक्षसगणाशी विवाह वर्ण्य केला आहे. चि. चिमूताईचा मनुष्यगण असल्याने तिचे राक्षसगणाशी पटणार नव्हते. सांगावयाचा मुद्दा इतकाच की, २७,२५०३ पैकी आणखी वर फुकट जाऊन बाकी उरले १८१६६११. 
यापुढे पत्रिकेंतला नाडीविचार आला. आध, मध्य, अन्त्य अशा तीन नाड्यांपैकी कोणती तरी एक नाडी प्रत्येकाच्या पत्रिकेत लग्नसराई असते. एकनाड आल्यास वधूवरांचा विवाह होत नाही. 

आमचें विवाहशास्त्र केवळ फलज्योतिषाच्याच नव्हे तर वैद्यकाच्या देखील भक्कम पायावर कसे उभारले आहे ते नाडीविचारावरून माझ्या लक्ष्यात आले. सुग्रजाविज्ञानासारखी शास्त्रे पाश्चात्य राष्ट्रांत अलीकडे कोठे डोकावू पाहात आहेत. परंतु आमच्या ऋषींनी त्यांचा साद्यंत विचार करून नाडीपरीक्षा देखील विवाहशास्त्रांत घुसडल्यास हजारों वर्षे आज लोटली आहेत. ( आमचे हेड सुपरवायझर रा. ठोमरे हे कालच एका विद्वानाच्या व्याख्यानास जाऊन आले. ते सुद्धां असेंच सांगत होते. ) चि. चिमूताईची मध्यनाडी येत असल्याने मध्यनाडीवाले वर विचारकक्षेबाहेर घालवावे लागले आणि आतां १८,१६६३२ पैकी राहिले १२,१११३०. यांतील ई मनुष्य विचारांत घेऊन उपयोगी नाही, कारण असला व्यंग पुरुष आपला भगिनीपति असावा असे कोणाला वाटेल ? तेव्हां बाकी राहिलेल्या १२,१११ पुरुषांपैकी एकादा वर आमच्या चि. चिमूताईस पाहिला पाहिजे. इतक्या माणसांची चौकशी करणे झणजे आकाशांतील ताऱ्यांची, दासोपंतांच्या ओव्यांची, ब्रिटिश लष्करी अंमलदारांस मिळणाऱ्या भत्त्यांची किंवा अशाच असंख्य वस्तूंची गणती करण्यासारखें बिकट काम होय. 

अरे हो ! या १२,१११ त मी स्वतः ह्मणजे नवऱ्या मुलांचा भाऊहि आलों की ! मग माझें नांव वगळावयास नको कां! त्याचप्रमाणे या संख्येत पाळण्यांत लोळणाऱ्या लेकरांपासून अर्ध्या गोवऱ्या स्मशानांत गेलेल्या थेरड्यांपर्यंत सर्व वयांचे पुरुष आले आहेत. त्यांपैकी २० ते ३० दरम्यानचेच लोक आम्हांस पाहिजे आहेत. 

मनुष्याची वयोमर्यादा सरासरी १०० पर्यंत धरिली तर दशकमानाने त्यांचे दहा गट पडतील. यापैकी एकाच गटांतील पुरुषांचा विचार करणे अवश्य असल्याने वरील संख्येस १० ने भागून ती संख्या १२११२. येथपर्यंत खाली आणिली. हा अर्थात् एकबोटे आम्हांला नको. बाकीच्या १२११ लोकांच्या दारांत जोडे फाडणे फारशा अवधीचे काम नव्हते. रोज सकाळी एक व संध्याकाळी एक घर याप्रमाणे फिरल्यास फक्त १ वर्षे ८ महिने ५ दिवसांत ही कामगिरी उरकण्यासारखी होती.ही पावणेदोन वर्षांची मुदत विशेष दीर्घ आहे असे मानण्याचे कारण नाही. कित्येक मुलींचे बाप मुलीचे लग्न जमविण्यास खटपट सुरू करून ते जुळून येईपर्यंत आणखी तीन तीन कन्यारत्नांचे जनक होऊन गेलेले मी पाहिले आहेत. 

माझ्या वरच्या गणितांत माझे मित्र प्रो. दिघे यांनी तर्क शास्त्राच्या दृष्टीने बऱ्याच चुका दाखविल्या आहेत. त्यांचे म्हणणे असें की, समानगोत्री लोकांत कित्येक मंगळ्ये वर निघत असतील, एकनाड आणि विषमगण यांचा संयोग एकाच कुंडलीत झाला असेल; अशा त-हेने अतिव्याप्तीच्या दोषाने माझें गणित दूषित झाले आहे. परंतु गणितामध्ये इतर शास्त्रांच्या चुका आम्ही बिल कूल ग्राह्य धरीत नाही. आमचे दोन मजूर नेहमी एका मजुराच्या दुप्पटच काम करितात, चकाट्या पिटीत बसत नाहीत. आमच्या कुरणांत सोडलेल्या गायी लहानमोट्या कधीहि नसतात आणि त्रैराशिकाच्या प्रमाणांतच गवत खाण्याचे काम करीत असतात. 

लग्नसराई. आम्हां गणित्यांचे अ, ब, क हे कधीहि आजारीबिजारी न पडतां एकमेकांच्या ठराविक प्रमाणांत भिंती बांधण्याचे काम उरकतात व कित्येक वेळां तोट्यांची रूपें धारण करून भरलेले हौद रिकामे करीत असतात. तात्पर्य इतकेंच की, गणितांत तर्कशास्त्राला जागा नाही. 
प्रत्यक्ष व्यवहारांत देखील आमचे वर केलेले गणितच अनुभ वास उतरते. 


वाहवा ! गणितशास्त्राच्या या मौजा मारण्यांत मी निमग्न झालो असतां या समोरच्या मिरवणुकाने माझ्या विद्यानंदांत व्यत्यय आणिला आहे. आपण जरा ही मिरवणूक पाहूं या! हे पहा सुरनळे, ही दारूची झाडें, या चंद्रज्योती आणि या पेट्रोमॅक्स बत्त्यांच्या झगझगीत माळा ! यांच्यायोगें मिरवणुकीतल्या स्त्रीपुरुषांचे चेहरे कसे स्पष्ट दिसत आहेत ते! बाकी यांतल्या काही काही मंडळींना मात्र जरा अंधारांतूनच चालाल तर बरे दिसाल अशी सूचना देण्याचे माझ्या मनात येत आहे. परंतु वाद्यांच्या या कर्णकठोर गडगडाटांत माझे खंगत भाषण ऐकून घेतो कोण ? कारण हा पहा इंग्रजी वाद्यांचा सुस्वर बँड एकसमयावच्छेदें कितीतरी पद्यांच्या श्रवणाचा लाभ आपल्याला करून देत आहे ! ती बासपाइप पहा 'मूर्तिमंत भीति उभी ' वाजवीत आहे. काळी सनईसारखी क्लेरि ओनेट ‘सुवरा स्वकुलतारक ' चे सूर काढीत आहे. बिगुलांतून गझलाचे आलाप निघत आहेत आणि कन्सर्टिनवाल्याने आतां आले मला अवसान' वर झोड उठविली आहे. आणखी हे दोन इसम बँडवाले कधी झाले ? परवांच तर जमीन चोपायला आठ आणे रोजावर लावले होते, आणि आज पहा तीन रुपये रात्र दरावर ब्यांडांत सामील झाले आहेत ! 

यांच्या तोंडांत जरी ही वायें दिली जाहेत व मधून मधून हे जरी गाल फुगवून वाद्य वाजविण्याचा आव आणीत आहेत तरी त्यांच्या वाद्यां ची फुक मारण्याची भोंकेंच बंद केलेली असली पाहि जेत; कारण त्यांतून आवाज निघत नाही. पहा, हे पडघम आणि ढोलवाले इसम, लोखंडी गजावर 
दुसरा गज आपटून टिण टिण करणारा पोरगा, या राक्षसी झांजा आपट णारा हा दाढीवाला, हे बण्डवाला. सगळे मिळून एकंदर पंधरा असामी आहेत. या सगळ्यांचे भरजरी काळे युनिफॉर्म पोषाक मात्र पाहून घ्या. आणखी तो, जाण्याच्या दिशेकडे पाठ आणि मिरवणुकाकडे तोंड करून दोन्ही हात सारखे खालींवरती, मागेपुढे करणारा पांढऱ्या 
पोषाकाचा व तुर्की टोपीचा मनुष्य त्यांचा कॅप्टन आहे. त्याने छातीला बिल्ले लावले आहेत. त्यांतला एक गुळ गुळीत ढब्बू पैसा दिसत आहे. कोठे चालेना तेव्हां भोंक पाडून छातीला लटका वून दिला असेल झाले ! या कॅप्टनच्या हातवाऱ्यांवरून कोणाची अशी कल्पना होईल की, याच्या अंगांत आलेले आहे, परंतु तसला प्रकार काही नसून आपल्या बॅन्ड्वाल्यांस अंगविक्षेपांनी डायरेक्ट करण्याची त्याची बण्ड.उपा बतावणी चालली आहे. बाकी एकहि जण त्याच्या आविर्भावांकडे लक्ष देत नाही ही गोष्ट वेगळी. 

कॅप्टनसकट सोळा बन्डवाल्यांना बत्तीस रुपये बिदागी तरी ठरली असली पाहिजे.. शिवाय. प्रत्येकास पैशापैशाची पानसुपारी व दोनदोन आण्यांचा नारळ द्यावा लागेल तो वेगळाच म्हणजे हे चौतीस रुपये चार आणे केवळ मानपानाखातर गुंडांच्या  घरांत फुकट घालवणार ! कदाचित् या वरातीतील वराला दरमहा चौतीस रुपये देखील पगार मिळत नसेल. अवघ्या दोन तासांच्या कटकटीसाठी हे गुंड लोक साधारण ऐपतींच्या मनुष्याचा एक महिन्याचा पगार खाऊन टाकणार आणि जातीजातीतले तंटे उप स्थित झाले म्हणजे ह्यांनाच यथास्थित ठोक देणार ! कसा आहे आम्हां हिंदूंचा कोडगेपणा ! 

बॅन्डवाले कंटाळून आपल्या तोंडांत वाद्यांऐवजी विड्या कोंबू लागले की, या दोन ताशेवाल्यांचे ककड कड्कड़ झालेच सुरूं ! जणूं या ताशांच्या कातडी पाठी म्हणजे काफरांचे देह आहेत अशी भावना धरून हे त्यांना बेतालपणे बडवीत अस तात; आणि आम्ही भारतीय संगीताच्या श्रेष्ठत्वाचा पोकळ अभिमान बाळगति आफ्रिकेतील रानी लोकांच्या अभिरुचीला सुद्धां शहारे आणणाऱ्या या जंगली वाद्यास आमच्या मंगलकार्यात खुशाल धांग डधिंगा घालू देतो. अमक्या गोमाजीचे लग्न मोठ्या कडाक्याने झालें असें सगळ्या पुणे शहराला वाटविणे हा कदाचित् ताशा लावण्याचा उद्देश असेल. 

बाकी काही असले तरी या कडकडाटामुळे आपल्या पिढी जाद म्हाताऱ्या ग्यानबा वाजंत्र्याला मात्र विश्रांति मिळते खरी ! तो पहा मुंडासे घातलेला ग्यानबा, सनई काखोटीस मारून आणि चंची सोडून कसा तंबाखू चोळीत चोळीत सावकाश मिरवणुकी बरोबर चालला आहे; आणखी हा त्याचा थोरला मुलगा रोड्या, संबळीला मुळीच दुखवावयाचे नाही अशा प्रेमळ भावनेने तिला 

लग्नसराई. टिपऱ्यांनी नुसता आंजारीत गोंजारात स्थितप्रज्ञासारखा शांतपणे जात आहे; हा साडेतीन हात लांबीचा सूर या अडीच हात उंचीच्या काशीनाथनें धरला आहे, पण या दमेकरी पोराच्याने एवढा सूर कसा फुकव णार ? जरी या वाजंत्र्यांनी वाचे मनापासून वाजविली तरी त्यांचा बिन्दुखर या महावाद्यांच्या नादसागरांत कोणीकडल्या कोणीकडे लुप्त होऊन जाणार ! म्हणून त्यांचा अंगचोर पणा खपून जाण्यासारखा आहे. बाबांनो तुम्ही मिर वणुकीत उपयोगी नाही, ग्यानबा सनईवाला. केवळ पंगा वाजविण्याकडे इतःपर तुमचा उपयोग होणार आहे. 

देशी वाजंत्र्यांनी मिरवणुकींना म्हणण्यासारखी शोभा येत नाही असा त्यांच्या विरुद्ध आक्षेप आहे; त्यांत थोडेसें तथ्य आहे. या ग्यानबाचें लालभडक मुंडासें, त्याच्या मुलाची गांधी टोपी आणि या सूरवाल्याची केसाळ टोपी यांत कांहीतरी एकरूपता दिसते काय ? मला वाटते बॅन्डवाल्यांचे अनुकरण करून वाजं 
मा. 
आमा 
अंगचोर 
३८ 
चिमणरावा, चहाट. 


त्र्यांनी मोठे ताफे तयार केले आणि छानदार मराठीशाही पगड्या, बंदाचे अंगरखे व तंग तुमानी असा युनिफॉर्म घालून जर हे लोक मिरवणुकीच्या अग्रभागी वाजवीत जातील तर मोठी शोभा दिसेल व आमच्या मंगलकार्यांत घुसून बसलेले हे उंटाचे पिलू बाहेर हाकलले जाईल. 

हो, बरी आठवण झाली. या संघटनाच्या काळांत ब्राम्हणांच्या लग्नांतील वाजंत्री निराळी, मराठ्यांची निराळी असा भेद कशाला हवा ? खरे पाहतां, मराठ्यांच्या वाजंत्र्यांचे काम एका अर्थी अधिक बरे वाटते. कसून काम करावयाचे हे त्यांस माहीत असते त्यांचे डफ किंवा ढोलगेवाले ज्या आवेशाने आपले वाद्य ठोकीत असतात तो आवेश गुरव किंवा न्हावी वाजंत्र्यांत दिसत नाही. मराठ्यांचा महार डफवाला डफाला शत्रु समजून ठोकीत असतो तर गुरव संबळवाला, लाडक्या लेकीच्या अपराधाबद्दल बाप जसा तिला जपून जपून चापट्या देतो त्याप्रमाणे, हलक्या हाताने संबळीवर टिपऱ्यांचा प्रहार करतो. महार सनईवाल्यांचे संगीताचे ज्ञान जरी रंगभूमीवरील ताज्या नाटकांतील पदें वाजविण्याच्या इतकें आजतागाईत नसले तरी लावण्यांच्या जुन्या चाली ते जितक्या ठसकेबाज रीतीने वाजवितात तितक्याच अंगचोरपणाने गुरव वाजंत्री नवीन पदें फुकतात. मुसलमानांचा इंग्रजी बैन्ड किंवा रण कर्कश ताशा जर ब्राम्हणांना चालतो तर महार वाजंत्री का चालू नयेत ? वाद्यांत देखील हे जातिभेदाचें भूत कशाला नाचावयास पाहिजे ? आता मी वाचकांच्या पुढे ठराव मांडतों की इतःपर हिंदूंच्या मंगलकार्यात परकीय वायें वाजविली जाऊ नयेत. हे तत्त्व झाले, त्याचा तपशील असाः-गुरव वाजंत्री आणि महार वाजंत्री अशा दोघांचे ताफे कामाला ठेवून त्यांजकडून आळी पाळीनें अगर ते कबूल असल्यास मिलाफाने वायें वाजवून घ्यावीत. 

हा ठराव मी चि. चिमूताईच्या लग्नांत अमलांत आणणार होतो, पण आमचा पडला वधूपक्ष ! व्याह्यांनी लगेच धाक घातला, * तुम्ही हे महार वाजंत्री आणून आमची शोभा करण्याचा विचार केला आहे की काय ? या महारांना परत घालवा आणखी चांगला मिलिटरी बॅन्ड घेऊन या, त्याशिवाय मुलगा घोड्यावर बसणार नाही. ___" नको बसायला, " मी म्हटले, “ जांवईबुवा, घोड्यावर बसणार नाहीतच मुळी; आम्ही मोटारीतूनच त्यांचा वरघोडा काढ ण्याचे ठरविले आहे." 

" हे पहा चिमणराव, तुमचा विनोद असा वेळी अवेळी आम्ही चालवून घेणार नाही. मी साफ सांगतों जर आमच्याशी सोयरीक करायची असेल तर हे डफवाले परत जाऊन त्याच्या ऐवजी बन्डवाले आलेच पाहिजेत. नाही तर दुसऱ्या दहा मुलींचे बाप आतां लोटांगणे घालीत येतील आमच्या बाळासाहेबांकरितां." 

या वेळी मी वर मांडलेला ठराव व्याह्यांस पाठ म्हणून दाख विला परंतु त्यांतील तत्त्व आणि तपशील ही दोन्ही त्यांना मान्य झाली नाहीत आणि शेवटी बॅन्ड आणण्याची पाळी मजवर आली. त्यांतल्या त्यांत आनंदाची गोष्ट अशी की, माझें तत्त्व वरातीच्या वेळेपर्यंत त्यांच्या मनावर बिंबले गेले आणि त्यांनी बॅन्ड आणण्याचे साफ नाकारिलें. मात्र तपशील अमान्य असल्याने महार वाजंत्र्यास वाजविण्याची संधि त्यांनी दिली नाही. असो. आपण पुन: या मिरवणुकांकडे नजर टाकू या. वायें वाजविणारे इसम, पेट्रोमॅक्स बत्त्या वाहणाऱ्या बाया, दारूवाले आणि तांगेवाले या बाजारबुणग्यांची संख्या कमीतकमी पन्नास पंचावन तरी दिसत आहे आणि व-हाडी मंडळी मात्र तीस चाळीसपेक्षा अधिक नसावी असे वाटते. वाद्यधारी आणि व-हाडी यांच्या टोळ्यांच्या मधून फुलांनी शृंगारलेल्या मोटारीतून हे डझनभर पोरांचे लेंढार कशाला बुवा जात आहे ? पण ती पहा त्यांत खेचून बसलेली नवरानवरीची मुंडावलिविभूषित जोडी ! आपापल्या मुलांची मोटारीची हौस फेडून घेण्याकरितां पतिपत्नींच्या पहिल्याच वाहनारोहणप्रसंगी त्यांच्या एकांतावर घाला घालणाऱ्या आंबटशोकी बायाबापड्यांच्या व्यवहारज्ञानाची तारीफ करावी तितकी थोडी आहे ! हे पोरांबाळांचे लेंढार आपल्या भोवती जम लेले बघून नवरदेवांच्या डोळ्यांपुढे कोणती सुखस्वप्ने पडत असतील त्यांचा अंदाज न केलेला बरा. 

मिरवणुकीत इतक्या बाया आणि बुवे चालले आहेत परंतु शोभिवंत कळा एकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे का ? लग्नाची मेजवानी आज दुपारी सगळ्यांनी झोडली आहे; पण एक वर्षभर उपासातापासांत काढलेल्या दरिद्रयांसारखी सगळी माणस दिसत आहेत. कपडे तरी किती गचाळ ! या विद्यार्थ्याचा कोट धुळवड खेळण्याचे दिवशी जो असतो तोच मिरवणुकीत ! हा जनुभाऊ ड्रायव्हर मोटार सहिसवर आहे, तो मोटारच्या लायसेन्सचा खाकी पोषाक तसाच घालून मिरवणुकीबरोबर चालला आहे, आणि हे सगळ्या ब्राम्हण कुटुंबाचे हौशी - निर्वाणीचे सांगाती' बापुराव कुटल्याशा प्रेत. यात्रेला गेले होते, त्या वेळचे उपरणे बांधलेले तसेंच डोक्याला ठेवून विडी फुकीत चालले आहेत. एवंच पुरुष मंडळींनी तर मंगल. कार्यातील पोषाखाच्या बाबतीत कांहीं धरबंद ठेविला नाही. 

या बायका मंडळींनी मात्र वेण्याऐवजी अंबाडे, सांखळ्यांऐवजी जोडे किंवा वहाणा आणि गळ्यांतल्या दागिन्यांच्या मोठ्या ओझ्याच्या जागी एकदोनच ठळक माळा, असले वाढत्या दारिद्रयाचे आनुषंगिक फेरफार खेरीज करून आपली पूर्वापार वहिवाट कायम ठेविली आहे. ती बायकांच्या घोळक्याच्या मध्यभागी एखाद्या सम्राज्ञीप्रमाणे 
गंभीर मुद्रा धारण करून राजहंसीप्रमाणे मंद पावले टाकीत जाणारी वरमाय पाहिलीत काय ? तिने पांघरलेला चाकोलेट रंगाचा शेला जरी कदाचित् उसना मागून आणलेला असला तरी त्याच्या खऱ्या स्वामिनीपेक्षां हिनेच तो अधिक शोभिवंत ऐटीने परि धान केला आहे. विहीण बाईंच्या नाकांतली नथ कदाचित् जपानी मोत्यांची असली तरी तशी पाणीदार मोठी नथ पेशवाईत सुद्धां क्वचित्च दृष्टीस पडली घरमाय. 

परंतु तो त्यांचा फाटका भांग पाहून असें खात्रीने वाटते की, पांढरपेशा बायकांनी डोकीवरून पदर घेण्याच्या चालीचा पुनरुद्धार केला पाहिजे. विहीणबाईंचा काळा रंग पाहून बायकांनी नाटकांतल्या सारखा सफेता वापरावा असे वाटल्याशिवाय रहावत नाही. वर माईच्या किंचित् मागून आदबीने आपली पायरी ओळखून चाल णारी ही मुलीची आई दिसली का ? वरातीचा थाट पाहून तिचे डोळे दिपल्यासारखे दिसतात. सुरनळ्यांतील दारू जितकी उंच उडेल तितक्या प्रमाणांत वरमाईच्या तोंडावरचा तजेला आणि मुलीच्या आईच्या तोंडावरचा खजीलपणा वाढत आहे. तसेच ही लवंगी मिरचीसारखी तिखटपणा दाखविणारी वराची बहीण बघून घ्या. मात्र एवढे नक्की वाटते की या मिरवणुकीच्या थाटाला साज तील अशी या व-हाडी बायकांची रूपें बिलकूल नाहीत. 

मिरवणुकीतील ही काळीबेंद्री, रोडकी, भिकार पोषाखाची माणसें पाहून मला आणखी एक ठराव समाजापुढे मांडावासा वाटतो. शनिवार-बुधवार शिवाय इतर रात्री नाटकमंडळ्यांना कांहीं काम नसते. नाटकांतल्या पात्रांना जर सुरेखसे पोषाख करून मिरवणुकीबरोबर नटूनमुरडून ठुमकत चालावयास बोलावले तर लग्नमिरवणुकींना अधिक शोभा येईल. असल्या कुब्जेऐवजी नाट कांतली शालू नेसलेली, भरगच्च दागिने घातलेली, तालावर चाला वयास शिकलेली अभिनयनिपुण बिहीण, पंधरा सोळा वर्षांची तिच्या तालमीत तयार होत असलेली उपवर करवली, भारदस्त गल मिशावाला, केशरी गंध, पुणेरी पगडी - जोडा, बंदांचा अंगरखा, रेशमी धोतर, जरीकांठी उपरणे परिधान करून गंभीर चेहऱ्याने भारदस्त पावले टाकीत जाणारा ढेरपोट्या व्याही; सामाजिक खेळां तल्या व्हिल नचा पोषाख केले ला पाणजांबई; आणि यांना शोभ. तील अशी भिन्न भिन्न वेष घेतलेली यांची स्त्रीपुरुष आप्त आणि नोक रमंडळी: असा वसि पंचवीस पा त्रांचा चित्रविचित्र तांडा नाटकमंड ळ्यांतून मिरवणु कीपुरता भाड्याने आणिला तर लग्ना स शोभा येऊन ललितकलेचा उद्धार केल्याचे पुण्य पदरी पडेल. पुष्कळ नाटक मंडळ्यांची सांपत्तिक स्थिति लक्षांत आणितां एकक जेवण आणि नारळ इतक्यावर एक संच भाड्याने मिळण्यास हरकत पडणार नाही असे वाटते. 

 ही मिरवणूक संपताक्षणीच पाठोपाठ दुसरी एक मिरवणुक येतच आहे. पुष्कळ वेळां मिरवणुकींचा इतका तोबा उडतो की, यां लग्नाची मंडळी त्यांत आणि त्या लग्नाची मंडळी यांत, असा घोटाळा होऊन ठिकाणावर पोचेपर्यंत त्यांच्या चुकीचा उलगडा होत नाही. एकदां कसब्याच्या गणपतीला दोन अक्षती एकदम गेल्या होत्या एक कुबेरांच्या घरची आणि दुसरी भणग्यांच्या येथील. भणगे मंडळी अक्षत देऊन प्रथम देवळाबाहेर पडली, तेव्हां कुबेरांच्या बॅन्ड वाल्यांना वाटले की, आपले मालक हेच आहेत, म्हणून ते भण ग्यांच्या मंडळीस वाजतगाजत नेऊ लागले. भणग्यांचें घर येतांच वन्हाडाने मागल्या पावली आंत प्रवेश केला आणि पाठीस डोळे नसलेले बॅन्डवाले आपल्या झोकांत तुत्तड तुत्तड करति कुबेरांच्या घरापर्यंत जाऊन तेथे, 'गॉड सेव्ह दि किंग' हे भरतवाक्य वाजविण्यास अर्धवर्तुळ करून उभे राहिले, तेव्हां त्यांच्या लक्षात आले की आपण भलत्याच व-हाड्यांची सेवा केली. मग बिचारे पुनः धावपळ करीत कसब्याच्या गणपतीपर्यंत जाऊन पोहोंचले, व खोळंबा केल्याबद्दल मालकांच्या शिव्या खाऊन त्यांना घेऊन निघाले. 
आणखी गरिबांची ही फार मोठी सोय आहे. एका घोड्याच्या खाण्यांत जसे गाईचे पोट भरते तसेच थोरामोठ्यांच्या कार्यात गरि बाला आपले कार्य साजरे करून घेता येते. एकादें थोरामोठ्या लग्न निघाले की, गरीब वधूवरांनी समोरच जानोसे द्यावे; त्यांच्या अक्षतीच्या पाठोपाठ आपली अक्षत, त्यांच्या वरप्रस्थानामागून आपलें वरप्रस्थान, वरातीमागून वरात असा सारखा पिच्छा पुरवावा. त्यांचे  वाजंत्री असतात, दारूवाले असतात ते आपलेच आहेत असे सग ळ्या गावकऱ्यांना वाटवावे. वाटल्यास सगळ्या गांवाला भोजनाचें आमंत्रण द्यावे. आपल्या घरी बैठकीची मात्र तजवजि ठेवावी. समोरच्या घरी जेवणाची तयारी दिसताच आपल्या निमंत्रितांना सोवळी नेसण्यास सांगावे आणि जागेच्या संकोचामुळे समोरच्या घरी पाने मांडण्याची व्यवस्था केली आहे अशी विनंती करावी. आपले निमंत्रित समोरच्या घरी गेले तरी त्यांना मज्जाव होणे शक्य नाही. कारण वधूपक्षीयांना ही माणसें वरपक्षांतली आहेत असें वाटेल, आणि वरपक्षीयांना वधूपक्षाकडली आहेत असें वाटेल. अशा रीतीने त्यांची आगंतुकी उघडकीस येणार नाही आणि गरि. बांच्या लग्नांतील मेजवानी थाटाने साजरी होईल. 

लग्नांच्या मिरवणुकीत आणि समारंभांत नुसती व-हाड्यांची किंवा वाजंत्र्यांचीच चुकामूक होते असे नाही. क्वचित् प्रसंगी वधूवरांच्या चुकामुकी होऊन भलत्या वराशी वधूंची लग्ने लागल्याचेहि दाखले मजजवळ आहेत. एकदां अशी गम्मत झाली की, ज्येष्ठाचा महिना सरत आला होता. झिमझिम पाऊस पडत होता आणि शेवटच्या मुहूर्ताची गर्दी असल्याने चार पांच रुखवती एकामागून एक चालल्या होत्या. अगदी पहिल्या स्वारींतला नवरदेव ज्या वेळी पहिल्या वधूगृहाशी आला तेव्हां वाजंत्र्यांना उभे राहाण्याची सूचना चुकीने मिळाली. वरराज परगांवचे असून लग्न पत्रव्यवहाराने जमलें होते. त्यामुळे भावी जावईसासऱ्यांची तोंड ओळख झालेली नव्हती, वरराज नवनि पद्धतीचे असल्याने त्यांनी आईबापादिकांचे लचांड जवळ बाळगिले नव्हते. ते घोड्यावरून उतरले व तडक बोहल्याचा मार्ग पत्करते झाले. इकडे घटका भरत आली होती, त्यामुळे भटजीबोवांनी मोठ्याने मंगलाष्टके म्हणण्यास प्रारंभ करून लग्नाचा बार उडविला ! लग्न लागून माळ पडल्यावर त्या मुलीच्या आईबापांनी ठरविलेला पण विधीने दुसऱ्या एक मुलीसाठी निप जविलेला वर मिरवणुकींच्या गर्दीतून वाट काढीत दाराशी प्राप्त झाला. 

एरवी भांडणच व्हावयाचें परंतु या वरासाठी ठराविलेली वधू रिकामीच होती; तिच्या घरची वाट उशीर लावलेल्या नवरदेवास दाखविण्यांत आली आणि दोन्ही लग्ने यथासांग पार पडली. कोणा चीच लग्नाची तयारी फुकट गेली नाही. चुकामुकीने एकत्र झालेली ही दोन्ही जोडपी हल्ली सुखाने नांदत आहेत. लग्न हा करार नसून संस्कार आहे या हिंदु ब्रीदाला या मुलींचे आईबाप किती बरें जागरूकपणे चिकटून राहिले ? । 

या उगाच गप्पा नव्हेत बरें ! खऱ्या गोष्टी आहेत. एका ब्राम्हण गृहस्थाने या लग्नघाईत आपली मुलगी एका फरारी होऊन आलेल्या, ब्राम्हण म्हणून मिरवणाऱ्या, तोतया परजातीय गुन्हे गारास कशी पिवळी करून दिली; पुढे. त्या मनुष्याची तोतयेगिरी उघडकीस येऊन त्याची रवानगी तुरुंगांत कशी झाली व तो परत आल्यावर ती खरी आर्य तेजाची मुलगी त्याच्याबरोबर संसार कर ण्यास कशी कबूल झाली त्याची आठवण पुण्यांतल्या लोकांना ताजी आहे. निदान ते तरी मजवर गप्पिष्टपणाचा आरोप करणार नाहींत. 
नरी मी भावबंधनांतल्या धुंडिराजासारखा गोष्टीवेल्हाळ असलो तरी त्याच्यासारखा प्रामाणिक गप्पिष्ट आहे. मी खोट्या गप्पा कधी मारीत नाही, खऱ्या थापा देतो. परंतु वेळी अवेळी गप्पा मारण्याचा मला इतका नाद आहे की, त्याचे उदाहरण दिले तरच तुम्हांला खरी कल्पना येईल. एकदां गुंड्याभाऊ आणि मी असे दोघे मुंबईस कशाला तरी गेलो होतो. आमचा मुक्काम नातूच्या चाळीत एका ठिकाणी झालेला होता. त्या चाळीत एका बि-हाडी मृत्यु झाल्याने गुंड्याभाऊ आणि मी यांजवर मर्तिकाचे सामान आणण्याची कामगिरी सोपविण्यात आली, कारण चाळी तल्या बहुतेक पुरुषांस ऑफिसांत जाण्याची घाई होती. 

पांढरे कापड, कामट्या, सुतळी, व मडकें विकत घेऊन आम्ही परत येत असतां वाटेंत आंग्रयाची वाडी लागली. गुंड्याभाऊ म्हगाला " चिमण्या, आत्तां आपण बिहाडी गेलो तर सगळी प्रेत यात्रा आटोपेपर्यंत आपल्याला चहा मिळण्याची पंचाईत पडेल. चल, आपण हॉटेलांत जाऊन चहा घेऊ." 
मी म्हणालों, “ त्यापेक्षां आंग्र्याच्या वाडीत म्हसकराचें बिहाड आहे तेथे आपण जाऊं आणि चहा घेऊन पुढे जाऊं." 

गुंड्याभाऊचा रुकार मिळून आम्ही म्हसकराच्या बि-हाडी गेलों, त्याची स्वारी आंतून कडी लावून घेऊन अद्याप घोरत पड. लेली होती. आम्ही बरोबर आणिलेलें सामान व्यवस्थेनें खोलीच्या बाहेर लाविलें व दारास धक्के मारून म्हसकराला दार उघडावयास लाविलें. आम्हां दोघांना पाहून त्याला किती तरी आनंद झाला ! कारण, म्हटलेच आहे: 
"मित्रं प्रीतिरसायन नयनयोरानन्दनं चेतसः ॥" हे काही खोटें नाहीं, मॅट्रिकचे परीक्षक प्रश्नपत्रिकेंत खोटें कशाला लिहितील ? म्हसकराने तोंडच्या उद्गारांनी आणि हाताच्या मुष्टिप्रहारांनी आपला आनंद व्यक्त केला आणि तिघांसाठी चहाचे आधण ठेविलें. नंतर आम्ही मुंबईस कां आलों, सिनेमा, नाटक वगैरे काय पाहिले, काय काय जिनसा खरेदी केल्या इत्यादि विष यांवर गप्पा मारण्यांत आम्ही तिघे गर्क होऊन गेलों 

__ हळूहळू खोलीपुढे गर्दी होऊ लागली. कित्येकजण तोंडांत बोटें घालीत, कित्येक आश्चर्य व भीतियुक्त चर्येने तेथें थबकत आणि सर्वजण ' कोण रे ? ' ' कोण रे ? ' असा प्रश्न एकमेकांस करीत होते. मुंबईत कोणी कोणाची पर्वा करीत नाहीं, जो तो आपल्याच उद्योगांत निमग्न असतो, एकाच चाळीत रहाणारे शेजारी देखील एकमेकांची ओळख करून घेत नाहीत, अशी वर्णने मी ऐकत होतो. पण त्या सगळ्या गप्पा ! आम्ही दोन नवखे इसम म्हसकराच्या घरी बसलेले पाहून खोलीच्या दाराशी घोळका करून ' कोण रे ? ' अशी चांभारचौकशी करणाऱ्या लुडबुड्या मुंबईकरांचा मला फार राग आला. 

___ इतक्यांत एक वृद्ध गृहस्थ वाट काढीत खोलीत शिरला आणि म्हसकरापुढे उभा राहून त्याने हाताने प्रश्नचिन्हाची खूण केली. 
" हे ना ? हे आमचे पुण्याचे स्नेही, दांडेकर आणखी जोग म्हणून आहेत." 

" पण गेलं आहे कोण ? तुमचं कुटुंब तर कोकणांत गेलं अन् इथें आजारी बिजारी तर कोणी नव्हतं, " म्हातारा म्हणाला. . 
" म्हणजे ? ' म्हसकर त्रासिक आवाजांत म्हणाला. 

" बाहेर येऊन पहा, " असे म्हणत वृद्ध गृहस्थाने म्हसक रास खोलीच्या दाराशी नेलें. मीहि गंमत पाहण्यास दाराशी जातों तो मी आणिलेले मर्तिकाचें सामान खोलीच्या बाहेरच्या अंगाशी ठेविले होते ते दिसले. 

" अरे हो म्हसकर, मी अगदीच विसरलो. मींच में सामान आणले आहे. नातूंच्या चाळीत डेथ् झाला........" माझें वाक्य तेथें पिकलेल्या हंशांत अर्धवटच राहून गेले. 
तात्पर्य, वेळी अवेळी गप्पागोष्टी करण्यांत माझा हातखंडा कसा आहे त्याचे हे उदाहरण सांगितले. आतां मूळ मुद्दयाची गोष्ट चि. सौ. कां. चिमूताईच्या लग्नाची हकीकत सांगणे ही होय आणि तिजकडे मी वळतो.