प्रस्तावना.
ज्याच्या लेखकानें कोणताहि नवीन उपक्रम सुरू केला नाही, ज्याच्या प्रसिद्धीने महाराष्ट्र वाङ्मयांत कोणत्याहि प्रकारची क्रांति घडून येणार नाही आणि समाजांत खळबळ उडणार नाही असे हे पुस्तक दोनतीन वर्षांत पहिल्यानेच प्रसिद्ध होत असलेले पाहून वाचकांस हायसे वाटेल असा भरंवसा आहे.
चिमणरावाच्या चव्हाटाची छापखानी प्रत तयार करण्याच्या कामी माझे तरुण मित्र राजाराम यशवंत राऊत यांनी रात्रीचा दिवस करून निरपेक्षपणे सक्त मेहनत घेतली त्याचप्रमाणे श्रीराम विजय छापखान्याचे उत्साही व्यवस्थापक मित्र रा कृष्णराव मराठे यांनी कामाविषयी आपुलकीची भावना दाखवून हस्तलेखांतील दोष सुधारण्यासकट छपाईचे काम शुद्ध रीताने व त्वरित केलें आणखी तरुण चित्रकार सीताराम गंगाधर जोशी यांनी हौसेनें व काळजीने भावनादर्शी चित्रे काढून दिली त्याचप्रमाणे रा. दि. ना. पुरंदरे यांनी कित्येक खर्डे तपासले याबद्दल या सर्व तरुण स्नेह्यांचे मनापासून आभार मानितों.
महत्वाची सूचना : हे पुस्तक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रिंटेड पुस्तकांपासून टंकलिखित करण्यात आले आहे त्यामुळे ह्यांत काही शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात. ह्या चुका मानवी हस्तक्षेपाने आम्ही कालौघात सुधारू पण तो पर्यंत वाचकांनी आम्हाला माफ करावे.