Get it on Google Play
Download on the App Store

मुक्काम पहिला : पेशावर 6

येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः ।। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः ।। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः ।। असें ज्या जगांतील अद्वितीय वैयाकरणाचे वर्णन आहे, तो अष्टाध्यायीकर्ता पाणिनी येथेच जन्मला असे म्हणतात ! इतकेच नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारा जमदग्निसुत प्रतापी परशुराम या पुरीचा जनक समजला जातो. पूर्वी परशुपुर किंवा पुरुषपूर म्हणून हे शहर विख्यात होते, असाही कित्येक जनांचा समज आहे. पुराणवस्तुसंशोधनखात्याने लाविलेल्या शोधांवरून परिक्षित राजाच्या सर्पसत्राची भूमि तक्षशिला नगरी हीही येथून जवळ असलेल्या तक्षिला गांवांतच असली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित् शिकंदराच्या (अलेक्झांडर) वेळचा 'पौरस' राजाही हल्लीच्या पेशावरचा स्थापनकर्ता असू शकेल. इतकें मात्र निश्चितीने म्हणतां येते की, अल्बीरुणीने निर्दिष्ट केलेले * परशुशावर' हे गांव किंवा अबुल फझलने आपल्या ग्रंथांत उल्लेखिलेले * पेशेवर' अथवा हल्लीचे पेशावर शहर ही सर्व एकच होत. दिल्लीपति अकबराने पेशवराच्या ऐवजी 'पेशावर' हे नाव बदलून ठेवले आणि ते यथार्थही होते, व आजही यथार्थ आहे. 'पेशावर' याचा अर्थ सीमानगर म्हणजे सरहद्दीवरील शहर असा आहे. वायव्यसीमाप्रांताधिका-यांची राजधानी, सरहद्दीवरील मोठे लष्करी नाके, वैमानिक दलाचे ठाणे, इराण, अफगाणिस्तान व मध्य आशियांतील इतर देश यांच्या सर्व व्यापाराची मोठी उतार पेठ, रेल्वेचे