मुक्काम पहिला : पेशावर 3
निघतात. सायंकाळीं जलालाबाद येथे मुक्काम होऊन दुसरे दिवशी सकाळी प्रवास सुरू झाला म्हणजे तिस-या प्रहरी काबूलला पोहोचता येते, अशी माहिती मिळाली खरी; पण त्याच वेळी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयीं अफगाण वकिलाला विचारल्यावर फारच गंमतीचे उत्तर मिळाले. मुंबईच्या अफगाण वकिलातीसाठी येत असलेल्या तिजोरीवर सरहद्दीवरील रानटी लुटारूंनी हल्ला केला अशी ती बातमी होती. पण त्या वकिलाने तत्काळ एक नोटांचे पुडके काढून दाखविले आणि म्हटले की, " हे पहा आमचे पैसे ! ते आम्हांला बँकेतून मिळतात. आमच्या राज्यांतून एक रुपयाही बाहेर जात नाही. कारण राजेसाहेबांची सक्त ताकीदच तशी आहे. | मी त्यावर त्यांना विचारले की, " मग वर्तमानपत्रांतल्या बातम्या खोट्याच तर ? वकिलाने उत्तर केलें, "समजा, आम्हांला कांही पैसे पाठवावयाचे असले तर बरोबर रखवालदार दिल्याविना का कोण पाठवील ? इतके का आमचे अधिकारी वेडे आहेत ? हे पैसे कालच आले. आणखी पुढील आठवड्यांत येतील. वर्तमानपत्रे,अफगाणिस्तानची बातमी म्हटली की, कांही तरी तिखटमीठ लावून लिहितात. | अशा प्रकारचे बोलणे झाल्यावर मी विषय बदलण्यासाठी असा प्रश्न केला की, * हिंदु म्हणून मला तेथे कांही त्रास होईल काय ? ? त्यास असे उत्तर मिळाले की, * मुळीच नाही. फारच प्रेमाने आमचे लोक आपले स्वागत करतील. शिवाय . आमच्या देशांत पुष्कळ पंजाबी हिंदु व शीख आहेतच. साहेबांना मात्र तेथे कोणी विशेष मानीत नाहीत. इतकी माहिती मला पुरी झाली. तेवढ्यावर संतुष्ट होऊन पेशावरला जावें व तेथे पुढची माहिती मिळवावी असे मी ठराविलें..