मुक्काम पहिला : पेशावर 5
मैल मैल लांबीचे काफिले
होत. तेव्हा त्यांना कोणीही लगाम घालण्याचा प्रयत्न केला की ते चवताळणारच! आणि हाच प्रकार सध्या झाला असल्याने या शिनवरी लोकांनी डाका व जलालाबादमधील रस्त्यांत पुंडाई मांडली आहे. | ही अव्यवस्था दूर होऊन पूर्ववत् रहदारी सुरू व्हावी म्हणून अफगाण सरकारचे प्रयत्न जारीने चालू आहेत शिनवरी लोकांस वठणीवर आणण्यासाठी काबुलाधिपति जातीने जलालाबादपर्यंत आले होते; त्यांनी विमाने, मशिनगन्स यांचाही उपयोग केला; त्यामुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली आहे असे म्हणतां येते. कारण तीन दिवसांपूर्वीच एक 'काफिला ' काबूलहून येथे आला. काफिला म्हणजे उंटवाल्या व्यापारी लोकांचा तांडा. हा काफिला किती मोठा असतो याची कल्पना प्रत्यक्ष पाहिल्याविना यावयाची नाही. पांचशे सहाशें उंट एकामागून एक चालत असतात, बरोबर त्यांचे रक्षकही असतातच, पण अशा या मालिकेने मैल मैल रस्ता अडल्यास नवल नाही. कित्येक काफिले दहा पंधरा मैल असतात असे म्हणतात. प्रत्यक्ष पाहिलेला असा हा काफिला केवळ अडीच तीन मैल लांबीचाच होता. हा काफिला या धामधुमीत डाक्याजवळ अडकला होता. तो आला तेव्हा रस्ता खुला झाला असेल अशी साहजिक कल्पना झाली. परंतु पुन: दंगाधोपा होण्याची भीति असल्यामुळे दुसन्या आणखी काफिल्यांना जलालाबादवरूनच मागे फिरविलें असे त्यांनी सांगितले. म्हणजे तेथे अद्याप पूर्ण शांतता नांदत नाही हे उघड आहे. येथे आल्यापासूनच्या रिकामपणाच्या काळांत पेशावर शहरासंबंधाने बरीच माहिती मिळाली. आजची ही पठाणांची वस्ती पाहून की काय कोण जाणे, येथील जुन्या परंपरेच्या हिंदु मंडळींत हिला 'राक्षसनगरी' म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु