आपण चुकतो आहोत का विचार करा
मिनिटे द्या आणि हे शांततेत वाचा एवढी विनंती..
परवा नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे सर यांच्याशी बोलताना ते एक वाक्य बोलले ते म्हणाले युद्धाच्या आधी सैन्य थकवायच नसत हे ऐकुन माझ्या अंगावर काटाच आला.. म्हणून आज हा तुमच्याशी हा संवाद.. खर आहे युद्धाच्या आधी सैन्य थकवयच नसत
नाहीतर ऐन युद्धाच्या वेळी आपला पराभव होण्यापासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. आज संपूर्ण प्रशासन दिवस रात्र काम करत आहे, त्यात रुग्णालयातील डॉक्टर, पोलिस, जिल्हा प्रशासन हे सगळेच. समोर कोरोना च अतिशय भीषण संकट उभ आहे, आणि त्याच्याशी युद्ध करण्याची हे सगळे लोक तयारी करत आहेत, आणि युद्ध लढत ही आहेत, पण आपण त्यांना ती तयारी करू देतो आहोत का? आपण त्यांना कशात गुंतवून ठेवलं आहे ? कोरोना ची तयारी करायची सोडून त्यांना आपल्या गाढव पणा मुळे आपण कुठली काम करायला लावतो आहोत हे बघा .. लोकांची दुकाने बंद करणे, लोकांना घरी जायला सांगणे, विलागिकरण केलेल्या आणि पळून गेलेल्या लोकांना शोधून आणणे, बाहेर गावाहून आलेल्या लोकांना धरून आणणे, गर्दी का घरी हकलने हे सगळे कामे जी खरंतर आपण स्वतःहून केली पाहिजे ती आपण त्यांना करायला लावत आहोत, तुम्हाला असं नाही वाटत का आपण त्यांना त्यांचं कामाचं करूच देत नाही आहोत...
आणि आपण युद्धाच्या आधीच सैन्य थकावतो आहे म्हणून ..
मित्रांनो हे सैन्य जर थकल तर आपल्याकडे हे युद्ध लढायला दुसरी फळी आहे का ????
नाही ना.. उद्या जर हा आजार पसरला तर तुम्ही मी हताशपणे घरातून बघत बसण्या शिवाय काही करू शकणार नाही... पूर, भूकंप, इतर आपत्ती, मध्ये तुम्ही मी कोणीही मदतीसाठी जात होतो आणि जातोच पण हा भयानक संसर्गजन्य आजार आहे, आपण मदतीसाठी कोणीच जाऊ शकणार नाही, त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, आपल सैन्य थकवू नका आपल्या कडे दुसर सैन्य नाही.. स्वयम् शिस्त पळूयात,
चीन इटली ची परिस्थिती भयानक आहे,
इटली देशाची लोकसंख्या 6 कोटी आहे आणि 5 हजार 500 लोक आता पर्यंत मेले आहेत, आपल्या नुसत्या महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी च्या आसपास आहे,
आपण लॉक डाऊन केलं म्हणून आनंदित होत आहोत, पण इटली च्या आकडेवारी नुसार तिथे 20 हजार लोकांना कोरोना ची लागणं ही लॉक डाऊन नंतर झाली आहे, कारण का?? तर हेच आपल्या सारखा निष्काळजी पणा , काळजी घेऊयात आणि अजुन तरी शहाणे हाऊयात,
भाजी घ्यायला गर्दी इतकी... अहो नाही मिळाली एक आठवडा भाजी तर तेल मीठ भाकरी खाऊयात की.. काही मरत नाही आपण, सकाळी सगळे अजुन ही गर्दी करून रस्त्या रस्त्या नी चालायला जात आहेत, बंद दुकान आणि बंद कॉलेज रोड कसा दिसतो हे बघायला येणारे काही महाभाग आहेत, काय बोलायचं आता
हे थांबवा आपण खूप मोठ्या संकटाच्या तोंडावर उभे आहोत, जागे व्हा.. आणि आपण आपली स्वयम् शिस्त पाळा सरकारी यंत्रणांना त्यांची त्यांची काम करू द्या. आणि घरी थांबा
दरवेळी देशासाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावं लागत, आज तुम्ही घरात बसून राहणे ही देशभक्ती ठरणार आहे
गर्दी टाळूयात प्रशासनाला सहकार्य करूयात, आपल्या भविष्याची पुढची पान ही काळवंडलेल्या इतिहासाची लिहायची की आदर्श सुवर्णाक्षरांची हे ज्याचं त्यांनी ठरवा..